जुने थांबे आता कसे आणायचे?

Submitted by चंद्रहास शास्त्री on 19 June, 2024 - 12:45

जुने थांबे आता कसे आणायचे?

या पावसाचे गाणे कसे गायचे
अजून राहिले पुरते भिजायचे

इंद्रधनूसवे मनातले काही असे
शब्द अक्षर पुन्हा गिरवायचे

काही प्रवासी थांबलेले जरी इथे
काही ओथंबलेले तसे असायचे

वाटेतली जुनी झाडे उभी तिथे
पालवीचे नवे वस्त्र ते नेसायचे

थांबायचे, पहायचे की बोलायचे
की पुढे पुढे तसेच जात राहायचे

जुने थांबे आता कसे आणायचे
या पावसाचे गाणे कुणी गायचे

© चंद्रहास शास्त्री

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कविता.

शीर्षक उगीचच जुने आंबे कसे साठवायचे असे वा च ताना वाटत आहे. मातांच्या रिक्वेस्ट येतात सल्ले बाफ वर आटवून अमेरिकेत कसे पाठवू. फ्रि ज मध्ये फ्रीझर मधे किती दिवस टिकेल ह्याव अन त्याव.

पुढील लेखनास शुभेच्छा. माबो वर स्वागत.

छान