आपल्या सर्वानाच जेव्हा प्रवास करायचा असतो तेव्हा शोधाशोध करण्यात फार वेळ जातो. बरेचदा आपण जिथे सगळं जग जातं तिथे जातो तरीही हे काम टाळता येत नाही. त्यामुळे रोज काय करायचे याची मुलभुत माहिती मिळाली तर जरा काम कमी होते व त्यात सोयीनुसार बदल करता येतात.
त्यामुळे या धाग्यात तुमच्या प्रवासाची itinerary लिहावी. यात रोज काय पाहिले याचबरोबर कुठुन बुकिन्ग केले, कुठे राहिलात, काय केलेले योग्य झाले किंवा अयोग्य झाले (+/-) अशा गोष्टीपण लिहिले तर उत्तम.
यानुसार आम्ही हल्लीच (मे १७ ते ३०) दरम्यान पहिली Europe ट्रीप केली ज्यात आम्ही ४-४ दिवस ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड व रोमला गेलो. त्याची योजना प्रत्येक दिवसानुसार लिहीत आहे.
आम्ही आमच्या गावाहुन म्युनिकला विमानाने गेलो व थेट विमानतळावरुनच ऑस्ट्रियाच्या साल्सबर्गला जाणारी ट्रेन घेतली. एकदा बदलावी लागली पण मधे अर्धा तास होता व पुढचा प्लॅटफॉर्म अगदीच जवळ होता. दोन तासात पोचलो. https://www.oebb.at/en/ वरुन बुकिंग केले. डायरेक्ट साल्सबर्गला विमान तिकीट फार महाग होते म्हणुन म्युनिक.
ऑस्ट्रियामधे साल्सबर्गला राहिलो. ट्रेनस्टेशनपासुन जवळच राहिलो Wyndham मधे. ३-४ मिनिटे स्टेशनपासुन चालत.
दिवस १ - मुख्य गावात फिरलो. चालतच गेलो. साऊंड ऑफ म्युझिकची ४ तासाची टूर घेतली. व्हायटारवरुन बूकिंग केले तरी चालेल , एकच किंमत आहे. गावात खूप पहायला आहे गावाच्या मध्यात. एक लोकल आर्टिस्ट्सचा सुंदर बाजार आहे. फिरायला खूपच सुंदर होते.
दिवस २ - सकाळी ७ ची बस घेऊन hallstatt ( हॉलस्टॅट) गावाला गेलो. एक बस व एक छोटी फेरी बदलावी लागते. स्टेशनच्या बाहेरच बस स्टँड. व स्टेशनमधे तिकीट रूम. अगदी सोपं. त्यांना विचारायचं, तिथुनच तिकीट घेतलं. ते सांगतील की ऑनलाईन बस , ट्रेन स्केड्युल कसं पहायचं? हॉलस्टॅट खूप खूप सुंदर गाव. नदीच्या कडेकडेने हिंडलो. थोडे गल्लीबोळात हिंडलो. हो तिथे फक्त गल्लीबोळच आहेत. salt mine पाहिली ज्याला ३ तास लागतात. वरुन अप्रतिम नजारा. संध्याकाळी परत. https://www.salzwelten.at/en/hallstatt
दिवस ३ - पुन्हा साल्सबर्गमधे हिंडलो. मोझार्टचे घर, जन्मस्थळ, इतर सुंदर दुकाने, बाग, गोंडालाने वर जाऊन साल्सबर्गचा सुंदर नजारा पहाणे https://www.salzburg.info/en/travel-info/arrival-traffic/cable_railway , नंतर मार्केटमधे सगळी दुकाने पहाणे व खरेदी.
दिवस ४ - ट्रेनने स्विसला. इंटरलाकन. ७ तास लागले. एकदा ट्रेन बदलली झुरिकला. अगदी सोपं. मधे पुरेसा वेळ असला की झालं. https://www.sbb.ch/en
Interlaken West railway station जवळ राहिलो. जरा पाऊस होता पण फार थंडी नव्हती. मे अखेरीस अजुन कमी पाऊस असेल.
दिवस ५ - गावातच हिंडलो. आधीच ३ दिवसाचा Berner Oberland Pass घेतला होता. फार मस्त , उपयोगी पास.
https://www.berneseoberlandpass.ch/prices-tickets/ वाचा.
तिथे २ प्रचंड लेक आहेत. त्यात २ क्रुज घेतली. पासमधे फुकट आहेत. फारफारफारफार सुंदर. हे गावात स्टेशनजवळ tourist info सेंटरमधे जाऊन विचारले तेव्हा त्यांनी सुचवले.
दिवस ६ - युंफ्राऊ पर्वत ढगाळला होता. पाऊस होता म्हणुन आरे गॉर्ज केला. प्रचंड सुंदर आहे. https://swissfamilyfun.com/aare-gorge/ स्वत:चे स्वतः करता आला. पासमुळे सवलत.
दिवस ७ - युंफ्राऊ ला सकाळी ८ ची ट्रेन घेऊन गेलो. tourist info सेंटरमधे तिकीटे घेतली. त्यांनी मस्त मॅपवर लिहुन दिले कसे जायचे ते. अगदी सोपं. स्वतः करता येतं. टूरमधे पैसे घालवायची गरज नाही पडली. ते तर अप्रतिम आहेच. https://www.jungfrau.ch/en-gb/jungfraujoch-top-of-europe/ (पासमुळे ५०% सवलत)
दिवस ८ - सकाळची ९ ची ट्रेनने रोम. २ दा बदलावी लागली. मिलानला ट्रेन बदलायला १५ मिनिटेच वेळ होता म्हणुन
चुकली पण पुढे अर्ध्यातासात बदलुन मिळाली. https://www.sbb.ch/en वरुन बुकिन्ग केले.
दिवस ९ - फक्त रोम सेंटरमधे हिंडलो व ज्या टूर बूक केल्या होत्या (vatican museum, St. Peter's Basilica, Colosseum) त्यांच्या गाईडला भेटायच्या जागा कुठे आहेत हे शोधुन ठेवले. त्या जरा लांब असतात, खूप लोक चुकतात व त्यामुळे टूर निघुन जाते व पैसे वाया हे ऐकल्यामुळे. रोम असे निरुद्देश भटकायला फारफारफार मजा आली.
उदाहरण -
https://www.viator.com/tours/Rome/Skip-the-Line-Vatican-Museums-and-Sist...
दिवस १० - ट्रेनने स्वतः Pompeii Day Trip from Rome व Mount Vesuvius केली. तिथे Pompeii स्टेशनच्या बाहेरच एका प्रायव्हेट कंपनीची टुर घेतली ज्यांनी दोन्ही दाखवले. जरा महाग पडले पण सोपं पडलं.
मला वाटते सरळ खालुन बुक केलेली बरी. फार महाग नाही.
https://www.viator.com/tours/Rome/Pompeii-Day-Trip-from-Rome/d511-3731VE...
दिवस ११ - सकाळी ८ ला बसिलिका टूर… अप्रतिम. ही वेगळी केली व vatican museum वेगळी केली. व नंतर गाव फिरलो. दुपारी Colosseum टूर. बाकी त्या भागात नुसतेच गाव पहाणे.
दिवस १२ - ३ तासाची वॅटिकन टूर सकाळी ८. नंतर गाव पहाणे, जरा खरेदी.
दिवस १३ - परत घरी.
अशाच तुमच्या ट्रीपच्या योजना वाचायला आवडतील.
देश वेगळे असले युरोपातले तरी
देश वेगळे असले युरोपातले तरी चलन एकच आहे. शिवाय इतकी चांगली माहिती सांगणारी , व्यवस्था देणारी केंद्रं आहेत त्यामुळे शक्य झालं. भारतात मात्र लोक अजूनही यात्रा आयोजकांकडे जाणारे खूप आहेत. कारण सविस्तर माहिती देणाऱ्या साईट्स आणि विडिओ फारसे नसतात. त्यांत तुटक तुटक माहिती असते. मराठीत जवळपास नाहीच. तरीही आम्ही स्वतंत्रपणेच जातो. साधारणपणे पाच किंवा सात दिवसांचीच सहल आखतो. कोणती स्थळे पाहायची, त्यांच्या वेळा, सुटीचा दिवस तसेच मुख्य शहरांपासून चे अंतर ही माहिती इंडिया टुरिझम सेंटर्स छापील पत्रकात देतात. काम सोपे होते. भारतातले पर्यटन धार्मिक ऐंशी टक्के आहे मनोरंजन आणि साहसी वीस टक्के आहे. विविध वयोगटातील व्यक्ती बरोबर असल्यास गोंधळ होतो आणि कुणाचेच समाधान होत नाही. हे लक्षात ठेवून वेळेचं आयोजन करतो. पण आमचं आयोजन कुणाला दिल्यास त्यांना पटत नाही. ते आयोजित सहलींतच जातात. ठिकाणं पाहाण्यापेक्षा आपल्याबरोबर इतर प्रवासी कोण येणार आहेत त्यांच्याशी ओळख करून घेण्यात, गप्पा हाणण्यातच त्यांना स्वारस्य असते. शिवाय रात्रीचे खेळ आणि स्तुती करून घेणे.
मस्त धागा. उपयोगी ठरेल.
मस्त धागा. उपयोगी ठरेल.
छान धागा.
छान धागा.
रोम असे निरुद्देश भटकायला
रोम असे निरुद्देश भटकायला फारफारफार मजा आली.>>
खर आहे बऱ्याचदा स्वतः च स्वतः चे अनुभव घ्यायला जास्त मजा येते.
तुमचा लेख वाचून युरोप ट्रीप करायची अशी मानाने परत एकदा उचल खाल्ली.. बघू मुहूर्त कधीच निघतो