ऑनलाईन कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्ट कामाबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by राज1 on 13 June, 2024 - 05:30

ऑनलाईन कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्ट कामाबद्दल माहिती हवी आहे किंवा कोणी ही कामे करत असल्यास कृपया सांगा

Group content visibility: 
Use group defaults

आत्तापर्यंत आंतरजालावर यासंदर्भात जितकी माहिती, अनुभव वाचले आहेत त्यानुसार अशा प्रकारची कामे १००% FRAUD असतात. त्यामुळे जरा जपून!!!

अशा प्रकारची कामे १००% FRAUD असतात >> +१००

ह्या पेक्षा तुमच्यामधे असलेल्या काही कौशल्यांचा वापर अर्थार्जनासाठी करता येतो का ते पहा असे सुचवेन.

शुभेच्छा!

राज1,
तुम्ही राहता तेथे कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्ट ची कामे करणारी शॉप्स किंवा ऑफिसेस असतील तेथे चौकशी करा

मिलिंद,
एवढी वर्षे मी हीच कामे ऑफिस मध्ये करत आलो आहे,
मला मुलाला वेळ देता यावा या साठी ही कामे मी बघत आहे, त्याचा शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, तो घराबाहेर पडत नाही. घरी असलो की त्याच्या साठी वेळ काढता येईल

राज1 जी, मी आपला धागा वाचत आलो आहे, मला पूर्ण कल्पना आहे.

ज्या जाहिराती येतात त्यांना संपर्क करण्याऐवजी ओळखीतून अशा प्रकारची कामे मिळवता येतील का ते पाहू शकता.

सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
अशी कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्टची कामे करणारे मायबोली वरचे कोणी किंवा त्यांचे मित्र, मत्रीण किंवा ओळखीचे असल्यास Please सांगा (पुण्यातील) कारण अशी कामे करणारे माझ्या ओळखीचे कोणी नाही व जिथे अशी कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्टची कामे चालतात ती तिथे बसूनच करावी लागणार होती व मुलासाठी मला वेळ द्यायचा तर ऑनलाईनच अशी कामे करावें लागणार.