Submitted by abhishruti on 5 June, 2024 - 23:57
असे बसावे पाय सोडुनी शांत निळ्या सागरी
अशी असावी आर्त हुरहुर सहवासाची उरी
असे असावे निर्मळ हासू कोमल ओठावरी
अशी असावी मान कलती खंबीर खांद्यावरी
असे उडावे केस मुलायम शीतल वाऱ्यावरी
अशी पडावी धून लाजरी हलके कानावरी
असे रहावे डोळे मिटुनी, बिलगून पहाटप्रहरी
अशी करावी अलगद स्वारी स्वप्नलाटांवरी!
असे असावे हात तुझे नित माझ्या हातांवरी
अशी असावी साथ तुझी ही जन्मजन्मांतरी
-- अभिश्रुती
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त कविता..!
मस्त कविता..!
आवडली. हळूवार.
आवडली. हळूवार.