Submitted by द्वैत on 30 May, 2024 - 12:50
असेच काही घडले होते वळणाआधी
तेच नव्याने पुन्हा पुन्हा का घडते आहे
शुभ्रपांढरे पीस तरंगे वाऱ्यावरती
हाती आले आले म्हणता उडते आहे
दुःख अनामिक पिंजत बसतो दिवसाढवळ्या
मावळतीला दिशा शोधतो खिन्न कोपरा
स्मरते केवळ एक चांदणी लुकलुकणारी
तीच नेमकी नभांत काळ्या दडते आहे
पिढयापिढ्यांनी अर्घ्य वाहिले प्रारब्धाला
तरी सुटेना पीळ वडाच्या पारंबीचा
सुरू राहते तीच गुलामी नक्षत्रांची
आणि पाऊल उंबऱ्यापुढे अडते आहे
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह..! शेवटचे कडवे भिडलेच.
वाह..!
शेवटचे कडवे भिडलेच.
धन्यवाद
धन्यवाद
अप्रतिम..
अप्रतिम..
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
क्या बात है!
क्या बात है!
शेवटच्या दोन ओळी ..... पूर्ण
शेवटच्या दोन ओळी ..... पूर्ण कवितेचं सार!! छानच.