बोलणारा ओततो कानात काही...!

Submitted by ह.बा. on 29 May, 2024 - 01:09

ऐकलेले ऐकण्यासाठीच असते
चाखल्या वाचून चव कळणार नसते

बोलणारा ओततो कानात काही
कीड सारी बुद्धीवर पसरून बसते

आपल्या दुःखात व्हावे मग्न आपण
का बघावे आपल्यावर कोण हसते?

पावलाचा हा जुना इतिहास आहे
अनुभवा पर्यंत ते हमखास फसते

ज्या ढगांच्या आत नाही ओल मित्रा
त्या ढगांचीही इथे मैफिल बरसते

गाळ काढुन बाप करतो तळ नितळ मग
लेकरू विहिरीतले पाणी उपसते

- ह. बा. शिंदे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

Thik

Thanks