Submitted by Srd on 23 May, 2024 - 10:07
Paytm UPI वापरतो. तीन अकाउंट आहेत घरात. त्यांचे UPI id
*****फोन नंबर @ paytm या प्रकारचे होते.
सध्या app update केल्यावर वरील id बदलण्याचा संदेश येतो आहे.
याबाबतयेथे माहिती मिळवली .
१) स्टेट बँकेशी जोडलेल्या एका फोन नंबरचा नवीन UPI ID **फोन नंबर @ ptsbi मिळवला ते ठीक.
२) प्रश्न असा आहे की इतर दोन फोन नंबर kotak Mahindra Bank account शी संलग्न आहेत ते पण बदलावे लागतील का? त्यांनी दिलेल्या चार बँकांशी कोटक जुळत नाही. त्या बँकांततून kotak असा व्यवहार झाला तर वेळ लागेल ना इंटरनेट फास्ट नसले तर?
सध्या बदलला नाही पण नंतर बदल करावाच लागेल का? कारण ***** @paytm पत्ता बंदच होणार म्हणे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरं तर upi वापरूच नये. बदलणं
खरं तर upi वापरूच नये. बदलणं दूरच. देशात गरीबी वाढत आहे, लोकं चोऱ्या करायचे नवीन उपाय शोधत आहेत. सरकार बँका लुटायला बघत आहे. पैसे कुठेच सेफ नाहीत. आलेला पैसा खर्च करावा. घरीच फळभाज्यांची बाग करावी, शेती भाती करावी. तिखट मीठ घेण्यापुरते पैसे सोबत ठेवावे. कशाला बँका आणि upi पाहिजे?
Paytm वर RBI ने बंधनं
Paytm वर RBI ने बंधनं आणल्यावर मी त्यांचा fasttag बदलला. Wallet balance ने online खरेदी केली.
UPI बॅंक रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून करता येते. पण अशा खात्यात फक्त 10-15 हजार ठेवावेत. भीम ही वापरु शकता UPI साठी. Paytm वर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे ते न वापरणं चांगलं असं माझं मत.
शक्यतो त्या त्या बॅंकेचं
शक्यतो त्या त्या बॅंकेचं यूपीआय अॅप असतं ते वापरावं. सोपं आहेच आता सगळीकडे. त्या युपीआय च्या अॅप मध्ये पैसे जास्त ठेवू नयेच. त्या अकाउंट ला पैसे ट्रान्स्फरही नेटबँकिंग ने केले तर उत्तमच.
गुगल वर तसाही माझा फारसा भर्वसा नाही पण त्याला (म्हण्जे गुगल सर्वीसेसला) तसा दुसरा पर्याय ही नाही. समव्हेअर समटाईम गुगल वापरावं हे लागतंच.
त्या बँकांततून kotak असा
त्या बँकांततून kotak असा व्यवहार झाला तर वेळ लागेल ना इंटरनेट फास्ट नसले तर? >> इंटरनेट स्लो म्हणजे किती स्लो असतं?
कितीही स्लो असलं तरी व्यवहाराला लागणार्या वेळाचं इंटरनेट स्पीड हे कारण कधीही कसं होऊ शकेल? एकतर व्यवहार होईल किंवा होणार नाही. स्लॉपी कोड असेल तर फारतर अर्धवट होईल. पण स्लो कधीही होणार नाही. म्हणजे इंटरनेट स्पीडने स्लो होणे अशक्य आहे. स्लो व्हायला बाकी हजार कारणं असतील त्यातलं नेट स्पीड हे कारण असूच शकत नाही. जुगाडू लोक स्पीड नाही म्हणून त्यावर ढकलत असतील फार तर, ते सेकंडरी कारण असेल तरी प्रायमरी शक्य नाही.
नाही अमित. इंटर्नेट स्लो असलं
नाही अमित. इंटर्नेट स्लो असलं तर काही वेळा आपल्या बॅंकेतुन पैसे कट होतात ते पुढच्याच्या बॅंकेत जात नाहीत. कधी कधी स्कॅनर उघडत नाहीत. भारतातले खरे खुरे प्रॉब्लेम आहेत हे.
आपले पैसे गेले आणि दुसरीकडे
आपले पैसे गेले आणि दुसरीकडे आले नाही, म्हणजे व्यवहार चुकीचा झाला, अर्धवट झाला. स्लो कसा झाला?
>>एकतर व्यवहार होईल किंवा होणार नाही. स्लॉपी कोड असेल तर फारतर अर्धवट होईल>> हे मान्यच आहे. आता त्यात मॅन्युअल इंटरवेंशन झाल्यने तो पूर्ण होणे आणि म्हणून स्लो असं काही असेल तर त्याला स्नो नाही म्हणता येणार.
Hi internet slow or going off
Hi internet slow or going off altogether is a real problem here. Even in a swiggy transaction i selected items to buy then swiped to pay by debit card. In the meantime home internet went off altogether . Transaction cancelled. When it came back in five ten minutes I had to redo the entire transaction from selecting food onwards. Some times OTP is sent to phone sms sometimes to email and sometimes automatic call fromthe bank in all this the transaction gets Half done or cancelled.