स्वागत!!

Submitted by BMM2024 on 22 May, 2024 - 14:48

नवी ही अस्मिता नवी भरारी | नवी क्षितिजे नवी झळाळी | या गाण्याच्या नादात उत्तर अमेरिकेतील सारी मराठी कम्युनिटी BMM 2.0 २०२२-२४च्या अंतिम स्थानकावर - २१व्या बीएमएम कायबे २०२४ अधिवेशनामध्ये एकत्र भेटण्याच्या तयारीला लागली आहे. सगळीकडे एकच उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे.

बीएमएम २.० या संकल्पनेवर आधारीत आपण गेली दोन वर्षे बीएमएमचे immigrant-centric to Marathi Settlement in North America centric रूपांतर करत आहोत. १०-१५ जणांच्या कार्यकारिणीचेस्वरुप गेल्या दोन वर्षात २५० स्वयंसेवकांच्या कार्यकारिणीत बदलले आहे आणि ही २५० स्वयंसेवकांची संघटना आज ३० हून अधिक उपक्रम आपल्या मराठी समाजासाठी जोमाने राबवत आहे.
या बीएमएम २.० संकल्पनेवर आधारीत आपण प्रकाश भालेराव व संदीप दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बीएमएम अधिवेशनामध्ये देखील काही आमूलाग्र बदल करत आहेत. १) बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण मंडळाच्या मार्फत तिकीट विक्री करत आहोत. २) उत्तर अमेरिकेतील प्रत्येक कार्यक्रमाची entry आपण मंडळांच्या मार्फतच स्वीकारली आहे. ३) आपल्या समाजातील ज्येष्ठांसाठी (७५+) आपण main hall मध्ये बसण्यासाठी वेगळी जागा राखून ठेवत आहोत ४) बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण भारताबाहेरील मराठी मंडळांच्या नेतृत्वाची बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या अध्यक्षतेखाली परिषद आयोजित करत आहोत ५) बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण एक संपूर्ण दिवस बीएमएमच्या सामाजिक कार्यक्रमांसाठी राखून ठेवला आहे - ज्याला २५० जणांच्या कार्यकारिणीने बीएमएम फेस्ट (BMM Fest) हे नाव दिले आहे!

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामध्ये मनोरंजक कार्यक्रम, मित्र-मैत्रि णींच्या भेटी गाठी आणि मस्त झकास जेवण महाराष्ट्रातल्या तुमच्या घरच्या समारंभांची आठवण नक्कीच करून देईल, पण त्याच बरोबर आपण आपल्या सामाजिक उपक्रमांचा - शाळा, युवा, रेशीमगाठी, उत्तररंग, बी-कनेक्ट, कम्युनि टी outreach, फिलॉसॉफी, मेडिटेशन, women empowerment, outdoors इ. देखील सखोल आढावा घेणार आहोत आणि या सर्व महत्त्वाच्या उपक्रमांना उत्तर अमेरिकेतील - महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठे व्यासपीठ - बृहन्महाराष्ट्र मंडळाचेअधि वेशन - उपलब्ध करून देत आहोत!

बीएमएम अधिवेशनाची ४४०० तिकीटे आता विकली गेलेली आहेत. $५०० ची तिकीटे सोल्ड आऊट आहेत. फक्त डोनेशन्स पॅकेजेस आणि प्रीमियर ($७५०) व स्थानिक रहिवाश्यांसाठीची ($३५० food not included/food trucks arranged) तिकीटे उपलब्ध आहेत. ५००० च्या आसपास संपूर्ण अधिवेशन सोल्ड आऊट होईल.

लवकरच भेटूया तर मग सॅन होजेमध्येजून २७ ते३० दरम्यानच्या २१ व्या बृहन्महाराष्ट्र अधिवेशनामध्ये!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिवेशनाला शुभेच्छा!

उत्तर अमेरिकन मराठी वेगळंच आहे. एकेक वाक्य दोनतीन वेळा वाचावं लागलं. एक वाक्य तर चक्क पाच ओळींचं आहे.

तारखा कळल्या ; पण महिना आधीच्या शब्दाला जोडून आल्याने वाचला गेला नाही आणि मे की जून असा प्रश्न काही वेळ पडला.

अधिवेशनाला प्रतिसाद खुपच कमी होता वाटते. खुपच महाग प्रवेश फी आहे असा सूर आढळला.
मग आता, काहितरी बदल केलाय. आणि चक्क फूड ट्र्क्स वगैरे. :(. कोण फूड ट्र्क्स वर जेवणार? कैच्याकै प्रकार आहे कुठेतरी खर्च वाचवावाढवाय??

तरी प्रयत्नासाठी शुभेच्छा!

अधिवेशनाला शुभेच्छा!

अजय अतुल, महेश काळे, राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे, सुनील गावस्कर ही मंडळी आधीही BMM ला आली आहेत. जरा वेगळे चेहरे आणता येतील का पुढच्या वेळी?