ती रानातनं आली
डोक्यावर घेतलेली जळणाची लाकडं
एका कोप-यात टाकली
चावडी समोरून येताना हातात काढून घेतलेल्या वहाणा खाली टाकल्या
शेरडं बांधली
घर झाडलं
डोईवरच्या पदराखाली बाहेर डोकावणा-या केसांच्या बटा दाबल्या
पाणवठ्यावरून डोईवर हंड्यांची भरलेली उतरंड आणली .
कंदीलाची काच पुसून कंदील लावला
चुलीवरची चिमणी पेटवली
चुल पेटवली
कालवण ठेवलं आव्यावर
भाक-या थापल्या
दिवसभर रानात राबूनही
डोलत्या मळ्याच चैतन्य चेह-यावर
रापलेल्या हातापायात पीकाची सळसळ
तिच्या हातानं रांधलेल्या स्वयंपाकाला ओल्या रानमातीचा सुगंध
तो
जीव टाकल्यागत घरी आला
लय दमलो, बैलांची पेंड दे म्हणाला
तिनं घमेल्यात पेंड काढली गोणीतनं
त्यानं बैलांपुढं ठेवली
तीनं त्याला पाणी दिलं , च्या दिला
थोडं चावडीकडं फिरायला गेला
पोरं, म्हातारी जेवून निजली
तासाभरात परत आला
ती उपाशीपोटी
त्याला वाढलं
तो जेवला गोधडीवर आडवा झाला
ती जेवली
भांडी घासली
आवराआवर केली
मग निजायला गेली
परंपरेनं
© दत्तात्रय साळुंके
ती आणि तो
Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 May, 2024 - 00:19
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता..!
सुंदर कविता..!
ग्रामिण भागातल्या शेतकरी स्त्रीचे दैनंदिन जीवन अतिशय समर्पक शब्दांत उतरवलेयं..
ग्रामीण शेतकरी स्त्रीचे जीवन जवळून पाहिलयं त्यामुळे कविता पोहचली..
तेच तेच, पुन्हा पुन्हा, दररोज
तेच तेच, पुन्हा पुन्हा, दररोज.
आयुष्य केव्हढं कंटाळवाणे. अर्थहीन. त्याचे जिवंत चित्रण. अगदी मर्ढेकरांच्या जात कुळीचे. गणपत वाणी. निदान तो स्वप्ने तरी बघत होता.
हे माझे आकलन.
कुणाला पटो न पटो.
ग्रामीण असे नाही. शहरातही तेच. हे वैश्विक आहे.
चावडी समोरून येताना हातात
चावडी समोरून येताना हातात काढून घेतलेल्या वहाणा खाली टाकल्या>> हा रेफरन्स नाही समजला.
केशवजी धन्यवाद....
केशवजी धन्यवाद....
>>>>हे स्री दास्याचं निर्देशक आहे. तिनं चावडीवर बसलेल्या पुरुषांसमोर चप्पल घालून चालू नये असा प्रघात आहे. त्याचवेळी पुरूष चप्पल घालून जातात.
सुंदर कविता..!
सुंदर कविता..!
रूपालीताई
रूपालीताई
कुमार सर
खूप धन्यवाद
सुंदर कविता.
सुंदर कविता.
तिनं चावडीवर बसलेल्या पुरुषांसमोर चप्पल घालून चालू नये असा प्रघात आहे
>>>> माझी आजीने सांगितलेलं, त्यांच्या गावात पाटलाच्या घरापुढून जाताना पण चप्पल काढून हातात घ्यावी लागायची.
आबा खूप धन्यवाद...
आबा खूप धन्यवाद...
द सा - खूप दिवसांनी माबो वर
द सा - खूप दिवसांनी माबो वर परतलो आणि आपण रंगवलेलं...नव्हे जीवंत केलेलं ग्रामीण जीवन बघितलं..! अफलातून लिहलेय..!!
>> डोलत्या मळ्याचं चैतन्य चेह-यावर... रापलेल्या हातापायात पीकाची सळसळ... विशेष भावले..!
पॅडी आता तुमच्या सुंदर
पॅडी आता तुमच्या सुंदर कवितांची सगळी तूट भरून काढण्यासाठी येऊ द्या दणादण.
खूप धन्यवाद....
द सा -
द सा -
सुंदर कविता.
सुंदर कविता.
साद... अनेकानेक धन्यवाद....
साद...
अनेकानेक धन्यवाद....