Damaged iPhone १३ मधून डाटा कसा मिळवायचा?

Submitted by Ashwini_९९९ on 21 May, 2024 - 15:03

माझ्या मुलाचा आयफोन 13 पाणी जाऊन पूर्णपणे बंद झाला. त्याच E Sim deactivate करण्यासाठी त्याला otp लागेल..तो ही फोन बंद असल्यामुळे मिळणार नाही...फोन लॅपटॉपला पण connnect होत नाहीये. डेटा कसा परत मिळेल? सर्व्हिस सेंटर वाल्यांनी पण काही होऊ शकत नाही अस सांगितलय..नवीन आयफोन खरेदी सध्या शक्य नाही.
त्याचा 6 महिन्यांचा इंटर्नशिप रिपोर्ट त्याच्या icloud स्टोअरमध्ये आहे.
मायबोलीवर कोणी या विषयातले जाणकार असतील तर प्लिज काही सुचवा .
सगळ्यात महत्वाचा त्याचा internship report आहे.

Group content visibility: 
Use group defaults

iPhone मधले हार्डवेअर स्पेसिफिक माहिती नाही. पण icloud स्टोअर ब्राऊजर मधून एक्सेस करण्यासाठी ओटीपी लागत असेल तर ते शक्य असायलाच हवे. कारण फोन खराब झाला म्हणजे तुमचा नंबर बाद झाला असे नसते. eSim असो किंवा sim card असो. तुम्ही आधार कार्ड घेऊन नेटवर्कच्या जवळच्या सेंटर मध्ये जाऊन त्यांना तुमच्या नावे नवीन सिम द्यायला सांगा त्या नंबरचे. व्यक्ती तीच आहे खात्री झाली की ते लगेच देतात. ते दुसऱ्या फोन मध्ये टाकून ओटीपी मिळवू शकता.

icloud साठी मात्र कदाचित तुम्हाला मॅक बुक किंवा आयपॅड लागू शकते
ते ऍपलचं सगळं भलतंच आहे. कोणत्याही ब्राऊजर मधून एक्सेस होत नाही वगैरे नाटके असतात त्यांची. ते मात्र जरा बघून घ्या.

१) नवीन सिम घेऊन दुसऱ्या फोनमध्ये टाकावे लागेल.
२)iCloud dot com वर मी एक अकाऊंट बनवले आहे Android phone chrom browser वापरून. माझ्याकडे apple id नाही. तरीच अकाऊंट आहे. फक्त फरक एवढाच की फक्त 1GB स्टोरेज मिळाले. Web based access होऊ शकतो.
३) login करताना ओटीपी लागेल तो फोनमध्ये येतो.
सर्व डेटा मिळेल.

Apple ID आणि pwd लक्षात असेलच.
MacBook, iPad नसेल तर मायक्रोसॉफ्ट स्टोअर मधुन windows pc/laptop वर iCloud for Windows डाउनलोड करून इंस्टॉल करावे तोच apple ID आणि pwd देऊन. सेट अप दरम्यान security key फोन वर sms द्वारे ऐवजी इमेल द्वारे मागवता येण्याचा पर्याय आहे का बघावे अन्यथा वर अतुल यांनी लिहिल्या प्रमाणे नवे सिम कार्ड मिळवुन दुसऱ्या फोनवर sms व्दारे मिळवावा. iCloud set up झाले की त्यात iDrive सिंक करता येईल.

आयक्लाऊड.कॉम वर ज्या अ‍ॅपल आयडी नी लॉग फोन वर लॉगइन असेल त्यानी लॉगइन करायचं. टू स्टेप ऑथंटिकेशन एनेबल्ड असेल तर मानव म्हणाले तसं ओटीपी दुसर्‍या एखाद्या अ‍ॅपल डीव्हाईस वर (अर्थात सेम अ‍ॅपल आयडी नी लॉग इन असायला हवा) किंवा मेसेज, इमेल, फोन कॉल नी घेता येइल.

मॅक किंवा आयपॅड असेल (अर्थात सेम अ‍ॅपल आयडी नी लॉग इन असायला हवा) तर काहीही करायची गरज नाही. सगळा डेटा असेलच.

आयक्लाऊड चं विंडोज अ‍ॅप असेल तर तिथेही हीच प्रोसेस आणि मग आयक्लाऊड ड्राईव्ह तुमच्या विंडोज एक्स्प्लोरर मध्ये दिसते. तिथून जो हवा तो डेटा अ‍ॅक्सेस करता येइल.
आयक्लाऊड डेटा वेब वर वापरायला त्याचा अ‍ॅक्सेस फोन वरून आधी एनेबल करायला लागतो. तो नसेल तर तुम्हाला वरच्या प्रोसेस चा काही उपयोग नाही.

व्हॉट्सअ‍ॅप मध्ये काही डेटा असेल तर व्हॉट्स अ‍ॅप लॉग-इन करायला लागेल अर्थात दुसर्‍या डीवाईस वर.

हल्ली व्हॉट्सअँप सुद्धा OTP जुन्याच डीवाईस वरती पाठवते त्यामुळे कदाचित कठीण होईल काम. आधी सिम असलेल्या मोबाईल मध्ये एसएमएस आला की संपायची सर्व प्रोसेस

फोन पाणी जाऊन खराब कसा झाला? ip६८ आहे ना? विचारण्याचं कारण म्हणजे मी पण iphone १५ वापरतोय. पाणी जाऊन खराब होत असेल तर तशी काळजी घ्यायला

इंटर्नशिप रिपोर्ट आय्फोनवरुन लिहिलेला नसावा; दुसर्‍या एखाद्या ट्रस्टेड डिवाय्स (मॅक/पिसी) वर ड्राफ्ट करुन आय्क्लाउड वर अप्लोड झालेला आहे. त्याच डिवाय्स्वरुन अ‍ॅक्सेस करायला सांगा.. ट्रस्टेड डिवाय्सला २एफएची (ओटिपी) गरज नसते...

सगळ्यांचे आभार...सगळ्यांचे सल्ले खूप उपयोगी होते पण आधीच esim deactivate करायला एसएमएस येतो पण फोन बंद असल्यामुळे ते ही जमणार न्हवत...तेव्हा तो नाद सोडून त्यानी परत internship report तयार केला आहे. २५ ला तो सबमिट करायचा आहे म्हणून टेन्शन आल होत त्याला खूप...आता सध्या तरी अँड्रॉइड फोन झिंदाबाद....
आता त्याला बजावून सांगितलंय प्रत्येक महत्वाच्या डॉक्युमेंट चा बॅक अप मेल वर घेऊन ठेवायचा.