चन्द्राचा सूर्य झाला होता.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 21 May, 2024 - 00:49

चन्द्राचा सूर्य झाला होता.
©️ चन्द्रहास शास्त्री

मात्रा - २२

मी तारा तुटताना पाहीला होता
पण त्याने फार ऊशीर केला होता.
तो तसाच सितारा राहीला होता
पण आज चन्द्राचा सूर्य झाला होता.

मागण्याचा हक्क तो संपला होता
देण्याचा भाग मात्र राहीला होता.
तळपण्याचा नित्य नियम झाला होता
पण आज चन्द्राचा सूर्य झाला होता.

चन्द्राचा कवडसा मात्र जपला होता
दवाचा सडा कुणी तो शिंपला होता?
दुपारी रस्ता कोरडा झाला होता
पण आज चन्द्राचा सूर्य झाला होता.

गोदेच्या कुशीत वेळ हरवला होता
आज तो दुपार घेऊन आला होता.
गोदाईला नमन-निरोप दिला होता
पण आज चन्द्राचा सूर्य झाला होता.

मुठेस गोदेने निरोप दिधला होता
हरवलेला सूर आज गवसला होता.
रवीला संज्ञेचा लाभ झाला होता
पण आज चन्द्राचा सूर्य झाला होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users