Submitted by SharmilaR on 17 May, 2024 - 15:28
राजा
एक होता राजा
त्याच्या ताब्यात होती प्रजा
केलाच कुणी विरोध तर
द्यायचा त्याला सजा.
छंद त्यांचे आगळे
शौक त्यांचे खास
वाट्टेल ते करून
सत्तेत टिकणं हाच त्याचा ध्यास.
मंगळसूत्रा च्या शपथा
धर्माच्या नावे लावून आगी
अन वाणी खोटी नाटी
तरी तो मात्र सर्वसंग परित्यागी.
छप्पन इंचावरती
कोटींचा कोट
तरी हाती आहे झोला
त्यात तुमचेच की हो व्होट!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा