ढुंकून कोण पाही
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
41
मुजरा अखेरचा हा
सोडून जात माबो*
वदलो जरी असे मी
ढुंकून कोण पाही........ ||१||
खरडून चार कविता
ललिते अणीक गोष्टी
रिझवावयास गेलो
ढुंकून कोण पाही........ ||२||
डोकावलो जरासा
वीचारपूस करण्या
पण ह्या वि. पू. त माझ्या
ढुंकून कोण पाही........ ||३||
संतापलो अता मी
डु. आयडीच घेतो
आलो नव्या दमाने
ढुंकून कोण पाही........ ||४||
कवितेस मीच माझ्या
वा! चांगली! म्हणालो
ओळख नवी तरीही
ढुंकून कोण पाही........ ||५||
गटबाज लोक हे अन्
उल्लेख टाळती का
मारून बोंब गेलो
ढुंकून कोण पाही........ ||६||
शोधू नवेच स्थळ ते
बकरे नवे मिळो मग
पण हाय ह्या स्थळीही
ढुंकून कोण पाही........ ||७||
*मायबोली
विषय:
प्रकार:
शेअर करा
धन्यवाद
धन्यवाद मंडळी!
भाऊ, समजूत घालणारी चारोळी पोचली. पण मी नाही हो मायबोली सोडून कुठे जात!
>> ढुंकूनही ना कोण पाही.. अस पहिजे ना?.
भाई, 'पण लक्षात कोण घेतो' आठवा!
पण मी नाही
पण मी नाही हो मायबोली सोडून कुठे जात >> छे छे छे..तुलाच भावना नाही पोहचलि
------- हे
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
नको नको
नको नको म्हणतांना सर्वानी वळूनवळून पाहीले!
!!!!
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
(No subject)
...
हे वाचलंच
हे वाचलंच नव्हतं, मृ फॉर्मात!
(No subject)
*************** युद्
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
>>गटबाज लोक हे अन् उल्लेख
>>गटबाज लोक हे अन्
उल्लेख टाळती का
मारून बोंब गेलो
ढुंकून कोण पाही........
एकदम perfect आहे
मृ, शब्दाशब्दास टाळ्या!
मृ,
शब्दाशब्दास टाळ्या! वाह वाह! लैच भारी.
Pages