Submitted by चंद्रहास शास्त्री on 25 April, 2024 - 12:15
गीत नवे
©️ चन्द्रहास शास्त्री
शब्द वेगळे अर्थ वेगळे, सखे, बोलणे निमित्त असते,
कुणां कळते बोललेले ते, ऐकले ते बोलले नसते
लोकांस चंद्र दाखवूनही, कमळ मात्र फुललेले असते
काय करावे लोकांचे या, त्यांना काही कळतच नसते.
आपण दोघे मोहरलेले, आठवणींची सोबत असते
हृदयाच्या या राज्यात सखे, आपल्या विना कुणी नसते.
पहारे असू देत कितीही, त्यांची तमा कोण का करते
बरसणाऱ्या साऱ्या सरींना, तसे जगणे ठाऊक असते.
हिन्दोळ्यावर या श्वासांच्या, गीत नवे स्फुरलेले असते.
गायिले कितीही तरी सखे, कुणीही ऐकलेले नसते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
छान कविता..!
छान कविता..!
धन्यवाद!
धन्यवाद!
आवडली.
आवडली.