१) ठाकरे शिव सेने आणि भाजप अशी लढत खूप कमी ठिकाणी आहे
कारण ,साटेलोटे आहेच ,फडणवीस ह्यांना पण माहीत आहे उद्या पर्वा शिव सेने ची गरज पडू शकते समजा अजित पवार नि दगा दिला तर किंवा एक नाथ शिंदे सुटले तर , दर वेळी ed ची धमकी चालणार नाही
आधी ठाकरे ह्यांचा राग भाजप वर होता आता शिंदे गटावर आहे ,शिंदे गटाचा बकरा करून दिल जमे करणार
उदाहरण सांगतो ,सुशांत सिंग वेळी गुप्तेश्वर पांडे म्हणून बिहार चे पोलीस होते,सर्वात जास्त त्यांनी प्रकरण रेटले पण त्यांना तिकट मिळाले नव्हते ,ते पण राजीनामा देऊन
आता पण मुद्दाम एकनाथ शिंदे ह्यांची गोची केल्याचे दाखवले जात आहे ,तसेच ठाकरे ह्यांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी ने जास्त खड खड केली नाही पण ती यादी योजून होती असे स्पष्ट दिसते ,जर २०१९ बघतील तर तेव्हा राज्य मिळत होता तरी शिव सेनेला पाठिंबा द्याल काँग्रे शिवसेने ने नखरे केले होते ,मग आज खूप बॅक फूट वर का ?
२) विधानसभा मध्ये अडजस्टमेन्ट
आता जागा कमी असल्या तरी नंतर जागा भरू असे आश्वासन नक्की दिले असणार कारण आमदार खासदार एवढ्या वेळात पक्ष सोडून गेले असते
लोकसभेत मध्ये लोकल मुद्दे जास्त होणार नाही ,पण ह्या वेळी पुलवामा झाले नाही ,मोदी लाट नाही महाराष्ट्रात ,किती पण हिंदू मुस्लिम केले तरी लोक कंटाळलेत ,पेट्रोल च्या किमती वगैरे पण जास्त फरक नाही
परत तलाठी भरती चे रान उठवले होते
३) बारामती ची जागा
ती शरद पवार ह्यांनाच जिंकावी लागेल ,पण समजा अजित दादा जिंकले तर बाकी सर्व जागा शरद पवार जिंकतील ,कोणी पण पैलवान चितपट होणार नाही
४) एकनाथ शिंदे गटाची वाताहत होणार ,एक तर त्यांचे विरोधक खूप आहेत ,पक्षांततर्गत पण आणि आता भाजप सोडून त्यांचा कोणी वाली नाही ,त्यामुळे त्यांना चूप बसून राहावे लागणार
बघा
बघा
शिंदे गटाच्या जागा (माझ्या)
शिंदे गटाच्या जागा (माझ्या) अपेक्षेपेक्षा जास्त आल्यात.
चिन्हांचा घोळ हे ही एक कारण असू शकेल. बऱ्याच लोकांनी जुन्याच चिन्हावर मतदान केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेला सध्या तरी शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर अजित पवार गटापेक्षा जास्तच आहे.
बाकी भाजप ने मशाल विरुध्द धनुष्य बाण, घड्याळ विरुध्द तुतारी वाला अशी लढत लाऊन स्वतःसाठी सेफ एक्झीट ठेवली हे मान्य.