लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
पुण्यात गिरीश बापट ह्यांच
पुण्यात गिरीश बापट ह्यांच निधन झाल्यावर वर्ष झाल्यावरही इलेक्शन डिक्लेर केलं गेलं नाही. पण साताऱ्यात उदयराजेंनी भाजप जॉइन करून खासदारकीचा राजीनामा दिला तर तीनच महिन्यात निवडणूक जाहीर केली होती. पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीमुळे निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली नाही का अशी शंका येते कारण काही दिवस आधीच धंगेकरांनी कसबा जिंकले होते. ह्यामुळे निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते का अशीही शंका येते. दरम्यान पंजाबात १० मे २०२३ रोजी इलेक्शन घेण्यात आले होते.
पुण्यातील कोणीतरी देशप्रेमी नागरिक निवडणूक आयोग विरुद्ध कोर्टात गेल्यावर निवडणूक आयोगाला पुण्यात लोकसभेची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते पण निवडणूक घेण्याऐवजी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात गेले.
त्याची बातमी.
https://sarkarnama.esakal.com/amp/story/pune/pune-loksabha-by-election-b...
निवडणूक आयोगाची नीतीमत्ता खालावली असल्याचे हे संकेत आहेत.
मतदान यंत्रे तपासणार्या
मतदान यंत्रे तपासणार्या तांत्रिक समितीतील सदस्यांची पार्श्वभूमी पाहिली, तर तिच्या नि ष्पक्षपातीपणाबद्दल शंका येईल.
the 4 "independent experts" who certify the EVM is secure and unhackable are also the people who invented the VVPAT.
One is bed ridden, another says they didn't invent it, and one, seeminly the main guy, suddenly got a ton of directorships in last 6 months, mostly in Gujarat!