तातडीचे - AI Data Science साठी देशात / परदेशात समर इंटर्नशिप कुठे करावी?

Submitted by रघू आचार्य on 10 April, 2024 - 05:10

समर इंटर्नशिप चा काय फायदा होतो?
कोणकोणत्या कंपन्यात समर इंटर्नशिप आहे? कोणती कंपनी चांगली आहे?

परदेशात कुठे समर इंटर्नशिप करावी?
रशिया मधे उपलब्धता आहे. पण रशियन या क्षेत्रात कसे आहेत?
कृपया माहिती द्यावी ही नम विनंती.
लवकर माहिती मिळाली तर उपयोग होईल.
अन्यथा इतर गरजूंना पुढे कामाला येउईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pl don't send young people to o Russia in a hurry. >>>

Correct. There were report of boys from India (especially Kashmir) sent to Ukraine-Russia war zone for fighting. There boys had gone to Russia for jobs. May be... they were cheated by recruiting agencies..

नॉर्थ अमेरिकेत बहुतेक समर इंटर्नशिप चे अ‍ॅप्लिकेशन आदल्या वर्षी नोव्हेंबर / डिसेंबर मधे सुरु होतात. फेब / मार्च पर्यंत मुलाखती होऊन एव्हाना इंटर्नशिप च्या ऑफर्स फायनल झालेल्या असणार.

भारतात रहाणार्‍या विद्यार्थ्यांना परदेशात इंटर्नशिप करायची असेल तर व्हिसा चे सोपस्कार करायला वेळ लागणार. बहुतेक कंपन्या त्या कटकटींना तयार नसतात. आजकाल इंस्टाग्रॅमवर बरेच लोक टॉप पेयिंग इंटर्नशिप इन < देशाचे नाव> असे व्हिडिओ टाकत असतात . अशा जाहिरातींना भुलू नका

म्हणजे भारतातून बाहेर परदेशात इंटर्नशिपकरता जायचय का?
बहुत बडा जंपं रेहनेका भाईसाब ये. इथे भारतातल्या भारतात किंवा अमेरिकेतल्या अमेरिकेत इंटर्नशिप मिळणे अवघड जाते बर्‍याच वेळा. दुसर्‍या देशात जाऊन इंटर्नशिप करायचे डिस्कशन करुन काय आणि कोणाला फायदा होणार नेमका?

देशातल्या देशात कॉलेजेस मध्ये कंपन्या येतात. कॉलेजेसचे टाय अप्स असतात कंपन्यांशी त्यांच्या मार्फत मिळू शकतात. डायरेक्ट ऑनलाईन पण अप्लाय करता येतं आणि तशा ही मिळाल्या/मिळतात. कोणाची ओळख रेफरन्स असेल तर मात्र चान्सेस फार वाढतात. मी काम केलं त्या २-३ कंपन्यांमध्ये फक्त ओळखीनीच कित्येक इंटर्न्स आलेले होते. मॅचिंग बॅकग्राऊंड (म्हणजे मेजर/ब्रँच ह्या अर्थानी) असला की पुष्कळ होतं.

इंटर्नशिप म्हणजे शेवटी हँड्स ऑन अनुभव आणि त्याला खुप महत्व असते. पुढे नोकरी मिळण्याकरता फारच फायदा होतो त्यानी.

र.आ. भारतातही यावर अगदी अद्ययावत काम चालते. त्यामुळे परदेशात शोधणे हॅसल असेल आणि भारतात मिळू शकत असेल तर तशी असलेली चांगली. हे इतके नवीन फील्ड आहे की रोल चे वर्णन काहीही असो, हे काम करणार्‍याला खूप संधी व स्वातंत्र्य असेल असे वाटते. हे मी Gen AI बद्दल विशेषतः सांगतोय.

तुम्ही पारखून घ्यालच, पण परदेशात अधिकृत चॅनेल्स मधून काम होत असेल (कॉलेजमधे केले जाणारे हायरिंग, विद्यापीठांच्या वेब साइट वर लिस्ट केलेली ओपनिंग्ज व त्यातून झालेली निवड, ओळखीच्यांनी त्यांच्याच कंपनीत केलेले थेट रेकमेण्डेशन ई). तर मस्त. पण नाहीतर इतर कोणातर्फे आलेल्या ऑफर्स किती विश्वासार्ह असतील सांगता येत नाही.

इंटर्नशिप म्हणजे शेवटी हँड्स ऑन अनुभव आणि त्याला खुप महत्व असते. पुढे नोकरी मिळण्याकरता फारच फायदा होतो त्यानी. >> +१

म्हणजे भारतातून बाहेर परदेशात इंटर्नशिपकरता जायचय का? >> असे काहीही ठरवलेले नाही. इथे वाचून त्याप्रमाणे माहिती काढणार आहे.

कॉलेजेसचे टाय अप्स असतात कंपन्यांशी त्यांच्या मार्फत मिळू शकतात. >> कॉलेजमधूनच आलेले आहेत. बाहेरून पण करता येतं, पण कॉलेजच्या सुट्या आणि त्यांचा ताळमेळ बसेल का ही शंका आहे. हे क्षेत्र नवीन असल्याने आजूबाजूला माझ्यासारखेच आहेत. काही विचारले की पाचही बोटं तोंडात घालून दाखवतात.

भारतातही यावर अगदी अद्ययावत काम चालते. >>> हो. एका रशियन कंपनीसाठी नाव शॉर्टलिस्ट झाले आहे. घरी विचारून सांगायचे आहे. रशिया या क्षेत्रात कितपत पुढारलेला आहे याबद्दल शंका आहेत म्हणून इथे चौकशी करायचं ठरवलं.

सर्वांचे प्रतिसाद वाचतोय.

कॉलेजमधे सँडविच कोर्स आहे.रेग्युलर कोर्स मधे इंटर्नशिप होतेच, पण समर इंटर्नशिप अशीही नवीन टूम आहे. यात कॉलेजचा सहभाग फक्त मुलांची नावे कळवण्याइतपतच असतो. टाय अप नसतो. फक्त या कंपन्या याच कॉलेजमधून मुलं घेतात. खर्च आपला आपण, व्हिसा , राहण्याची सोय आपली आपणच करायची असते. भारतात पण खूप कंपन्या आहेत. पण सुटी संपली तरी त्यांचा प्रोग्राम संपत नाही असं समजलं.

फक्त या कंपन्या याच कॉलेजमधून मुलं घेतात. खर्च आपला आपण, व्हिसा , राहण्याची सोय आपली आपणच करायची असते. >> बिनपगारी इंटर्नशिप असेल तर फक्त व्हाइट हाउस किंवा सुप्रीम कोर्टात किंवा तत्सम प्रेस्टिजियस ठिकाणी मिळत असेल तर विचार करावा. बहुतेक नावाजलेल्या आणि विश्वासार्ह कंपन्या इंटर्नस ना देखील रहाण्या जेवणाचा खर्च निघेल एवढा पगार देतात . उगाच परदेशात काम करायची संधी मिळते म्हणून पदरमोड आणि व्हिसा ची यातायात करुन दोनेक महिने बिनपगारी काम करण्यात काही फायदा नाही .
त्यापेक्षा सुट्टीच्या दिवसात कोर्सेरा, यु डेमी अशा ठिकाणी ऑनलाइन कोर्सेस करता येतील.

कॉलेजात कोर्सवर्क मधे किंवा प्रॉजेक्ट वर काम करुन जे ज्ञान आणि अनुभव मिळतो ते सर्व आणि प्रत्यक्ष नोकरीत करताना लागणारे ज्ञान आणि स्किल्स यांच्या व्हेन डायग्रॅम मधे फार कमी ओव्हरलॅप असतो. प्रत्यक्ष नोकरी करताना लागणारे स्किल्स शिकायला मिळणे हा इंटर्नशिप चा मोठा फायदा आहे . कंपनीच्या फ्लॅगशिप प्रॉजेक्ट / प्रोड्क्ट वर काम नाही मिळाले तरी मीटिंग कोऑर्डिनेट करणे, आपल्या टीम व्यतिरिक्त इतरांबरोबर काम करणे, आठ पंधरा दिवसांनी स्टॅटस रिपोर्ट लिहिणे असे सगळे शिकायला मिळते. ८-१० आठवडे सल दिवसाचे आठ साडे आठ तास काम करणे हे सुद्धा जड पडते बर्‍याच लोकांना

बरं बरं. आता जरा अंदाज आला.

सुटी संपली तरी प्रोग्रम चालूच राहतो म्हणजे ती ग्रॅड (ग्रॅजुएट झाल्यानंतरची) इंटर्नशिप असावी. सुटी फक्त २.५ महिने असते त्यामुळे खरं तेवढ्या वेळात येऊन काय नेमकं काम द्यायचं हा ही प्रश्न पडतोच कंपन्यांना. सहसा आपापल्या क्षेत्राच्या डिपार्ट्मेंट मध्ये फायलिंग, लिस्ट बनवणे असे मायनरच कामं देतात. ग्रॅड झाल्यावर मात्र जोरदार अप्लाय करुन चांगली शोधायला हवी इटर्नशिप. त्याचा खुप जास्त फायदा होतो. कारण ग्रॅड ट्रेनी ला माहिती, मचुअर्रिटी आणि वेळ जास्त असतो. त्यांना ट्रेन करुन त्यांच्याकडून बर्‍यापैकी ठोस अशी कामं करुन घेता येतात. आणि ती कामं रेझ्युमे वर लावून नोकरीच्या अ‍ॅप्स करताही फायदा होतो.
समर इंटर्नशिप मिळाली तर चांगलच आहे पण स्पेसिफिक क्षेत्रात टारगेटेड असा अनुभव मिळेलच असं नाही. जनरल कंपनीत काम करायचा अनुभव येवढच काय ते हाती लागू शकतं. थोडक्यात टूम हाच योग्य शब्द आहे त्या करता. Happy फार आटापिटा करायची गरज नाही.

अगदी याच क्षेत्रात काम करत नाही.
पण इंटर्न आले की त्यांना जे काम कोणालाच करायची इच्छा नसते असं काम दिलेलं आहे. अर्थात त्यांना त्यातून शिकायला वगैरे मिळतंच. आणि ग्राऊंड रिअ‍ॅलिटी ही समजते की एआय की काय कॅच फ्रेजेस असतील तरी ते चालवायला स्क्रिप्टं लिहावी लागतात, बिल्ड बनवताना काही ऑटोमेशन लागतं. ही कामंं एआयशी निगडीत नसली तरी आवश्यक असतात. डायरेक्ट नव्या माणसाला एआय इंजिनवर काम मिळत नसावं, त्या कंपनीत, त्या प्रॉडक्टवर इंटर्नशिप मिळाली तरी.

भारतात AI मध्ये काम करणारे स्टार्ट अप्स आहेत. विशेषतः हैदराबाद, बंगलोर मध्ये आहेत. अशा ठिकाणी इंटर्नशिप करता आली तर बघा.

सर्वांचे मनापासून आभार.
खरोखरच उत्तम सल्ले मिळाले आहेत.
सगळेच सल्ले पटले. पहिल्या वर्षी काहीही काम देतील हे अमितव चे म्हणणे बरोबर वाटले.
रशिया मधे पाठवून काही उपयोग नाही या शंकेला पाठिंबा मिळाला. त्यामुळे रुखरुख लागून राहणार नाही.
तिसऱ्या वर्षी समर इंटर्नशिप करावी या मतापर्यंत आलो आहे.

अमा, अश्विनी के, मेधा, अमितव, वैद्यबुवा, फारएण्ड, अनघा पुणे सर्वांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे. द्विधा मनःस्थितीत असताना मायबोलीवर विचारावे असे वाटले होते. मायबोलीने निराश केले नाही. इतक्या कमी वेळात नेमके समजले.

पुढेही कुणाला गरज पडली तर हे सल्ले उपयोगी पडतील.

अगदी खर आहे... मायबोलीवर खरच खूप चांगले आणि उपयुक्त सल्ले मिळतात..म्हणूनच मीही माझ्या मुलाच्या internship बद्दल इथे सल्ला विचारला होता.

Flagship प्रॉडक्ट वर काम मिळालं नाही तरी जे ऑफिसच्या वातावरणात काम कराल त्याचा फायदाच होतो. परझव्हिअरंस/ सातत्य हे माझ्या मते इतर कशाही पेक्षा घोटून घोटून शिकण्याचे स्किल आहे. ते अंगी बाणवायला सुरुवात होते. शिवाय ओळखी आणि इतर सॉफ्ट स्किल्स मिळतात. त्यामुळे फार आटापिटा नाही केला तरी करायचीच नाही असं मात्र करू नका. शिवाय काम करून कमाई कशी होते, हे एक शिकवण लागते. आणि त्या वयात स्व कमाई ही लाखमोलाची असते.