बालपणाच्या लुटुपुटीच्या जगामधले
मला सर्व काही आठवतेय
अगदी जस्सेच्या तस्से,
चिंचा-कैऱ्या, बोरं-आवळे, काचकुयरीची बोंडं
नव्या वह्यांचा वास; जुनाट पुस्तकात-
जिवापाड जपलेली मोरपीसे...
रूसवे फुगवे पैजा गमजा
मिजास मस्ती मारामार्या
कित्येक निर्हेतूक लांड्या-लबाड्या,
खोड्या चहाड्या...शिव्या-शिट्या
खत्रुड मास्तरांनी चालवलेले दांडपट्टे
हाता-पायांवर सपासप छड्या...!
आज मोठाधाटा शहाणासुरता होऊनही
बालिश कित्त्यांची उजळणी
करतोय हुबेहूब नक्कल,
स्वत:चे खरे सिद्ध करण्याच्या नादात
वेठीस धरतो सगळ्यांना
युक्त्याप्रयुक्त्या; लढवतो नवनवी शक्कल...
मात्र; लहानपणी कशी कोण जाणे
रात्रीमधून अशी काय जादू घडत असे,
नव्या दिवसाची नेहमीच
कोरी असायची पाटी
आधल्या दिवशीच्या तंट्या-बखेड्यांमधले
काहीसुद्धा ध्यानीमनी राहत नसे...
अशात अनेकदा पोटतिडकीने
रात्रीमधून नितळ निर्मळ व्हायचा
प्रयत्न करून पाहीला भरपूर,
तर उतला मातला
अहंकाराचा लंगडा घोडा
खिंकाळला बेफाम उधळला चौखुर...
त्या अजाण, बाळबोध दिवसांत
झाले गेले विसरायची-
नितांतसुंदर किमया कशी बरे होई,
आज या थोराड आडदांड वयात
नेमके तेवढेच एक मला -
अज्जीबात आठवत नाही....!
***
आवडली....
आवडली....
१) ये दौलत भी लेलो ये शौहरत भी लेलो
भले मुझसे छिनो मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागजकी कश्ती वो बारीशका पाणी....
२) https://youtube.com/shorts/KtDgnHjt_Sg?si=CLzflefTgB7sPPKh
द सा - काय बोलू..???
द सा - काय बोलू..???
१) >>>> जगजीत सिंह यांनी अजरामर केलेले हे शब्द..!! काळजावर कोरल्या गेलेयत....कितीही वेळा ऐका...मन भरत नाहीच...
२ ) >>> गुरु गौर गोपाळ दास यांची रचना ही प्रचंड आवडली...!!!
लिंक शेयर केल्याबद्दल मन:पूर्वक आभार....
खूप छान.
खूप छान.
सामो - शत शत आभार..!!
सामो - शत शत आभार..!!
https://youtu.be/ARawxuCI3lc
https://youtu.be/ARawxuCI3lc?si=I6yD6SNAmv-2TY3V
द सा… WOW !!!
द सा… WOW !!!
दसा फार सुंदर कविता हो.
दसा फार सुंदर कविता हो.