Submitted by पॅडी on 29 March, 2024 - 23:42
भल्या पहाटेचा गजर असते
चहा नाश्ता वेटर असते
निरोपाचे हसता पालवताना
मी रिसेप्शनिस्टची नजर असते…
त्वरा; मुलांच्या शाळेची घाई होते
मग धुणी - भांडेवाली बाई होते
अंगांग ठणकते दुपारी तेव्हा
मी अडल्या देहाची दाई होते…
तिन्ही सांजेला पवित्र तुळस होते
देवघराच्या मंदिराचा कळस होते
टिचक्या ऐन्यात काया न्याहाळताना
मी वैशाख वणव्यातला पळस होते…
काळोखाचा चेहरा मोहरा असतोस
तू गुलछबू गुल्जार गजरा असतोस
सैरंध्रीची थाळी चाखता मागताना
मी हक्काची बायको -
तू लग्नाचा नवरा असतोस...!!
***
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
फारच सुंदर!! आवडली
फारच सुंदर!! आवडली
साद - खुप खुप आभार
साद - खुप खुप आभार प्रतिसादासाठी...!!
मी _आर्या जी - मनःपूर्वक धन्यवाद...!