Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 March, 2024 - 23:01
त्याच त्या चुका त्यांच्या तुही करतोय
रांजन पापाचे पूर्वसुरीसारखेच भरतोय
एक दिवस त्यांच्यासारखी हालत होईल
जागीर मानलेली जनताच लाथ देईल
तू लाख भूल दे त्यांना जातीपाती, धर्माची
उमगलय भाकरीच शमवी आग पोटाची
माहीत आहे बेगडी कळवळा तुला देवाचा
तुला कसं उमगावं देव भूकेला भावाचा ?
ओळखली देवाने तुझ्या दुष्टबुध्दीची चाल
ऐकले देवळातून धूम ठोकली त्यानेही काल
दिखाऊ भक्ती तुझी , गेलास जरी मंदिरी
तो देवही सोडून राऊळ , गेलाय दीना घरी
त्यांच्या दारी कधीतरी जाऊन बस क्षणभर
कळून येईल तुला तोच राम, कृष्ण, शंकर
अरे वाल्यासारखा तो तुझा करील उध्दार
फाटका संसार त्याचा पण मन आहे उदार
मंदिरं पाण्याचीही हवीत, तूझं दुमत नसावं
का पाण्यावाचून देवानही पारोसं बसावं ?
ते आकसलेलं जीवन वाचलं तर माणूस वाचेल
नाहीतर तिर्थस्थळीही राज्य दुष्काळाचेच असेल
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते आकसलेलं जीवन वाचलं तर
ते आकसलेलं जीवन वाचलं तर माणूस वाचेल >>>> छान !
राजकारणातील देव आणि देवाआडून
राजकारणातील देव आणि देवाआडून राजकारण...
छान!!
सहमत छान लिहिलत
सहमत
छान लिहिलत
छान आणि नेमक लिहिलय. आवडलं
छान आणि नेमक लिहिलय. आवडलं
छान.
छान.
छान.
छान.
कविता छान आहे दसा. विदारक आहे
कविता छान आहे दसा. विदारक आहे.
सामो
सामो
साद
SharmilaR
आंबा
अवल
पॅडी
कुमार सर
सर्व काव्यप्रेमींचे मन:पुर्वक आभार....
कवितेतून तुम्हांला वाटणारी
कवितेतून तुम्हांला वाटणारी कळकळ जाणवते दत्तात्रेयजी..!
छान कविता..!
कवितेतून तुम्हांला वाटणारी
कवितेतून तुम्हांला वाटणारी कळकळ जाणवते> +१.