पुस्तक प्रकाशन

Submitted by बिपिनसांगळे on 25 March, 2024 - 00:37

२५ मार्च २०२०
या दिवशी कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले .
त्यानंतर अनेक लोकांनी त्या काळात सेवा किंवा समाजसेवा केली ,
पण त्यांच्यामध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी विशेष कार्य केलं . प्रेरणादायी !अगदी हटके !
अशा २७ लोकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेनं ,
एक पुस्तक निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता पूर्ण झाला
देव पाहिलाय आम्ही
असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते कार्य कथा रूपात मांडण्यात आलंय .
त्याचं प्रकाशन आज संध्याकाळी होत आहे - २५ मार्च २०२४
६. ३० , न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड पुणे

यामध्ये दोन कथा लिहिण्याची संधी मला मिळाली आहे .

धुलीवंदनाच्या शुभेच्छा !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचक मंडळी
खूप आभार

मला संधी मिळाली हा भाग वेगळा
तो महत्त्वाचा नाहीये .

त्या लोकांनी जे काम केलं आहे
त्या कार्याला खरा सलाम आहे !

उदा .
सिरमने कोरोना लस तयार केली . आणि त्याची टेस्ट जेव्हा माणसावर करायची होती ... पहिल्यांदाच
कोण तयार होणार ? थेट विषाची परीक्षा !

तेव्हा जो तयार झाला त्या तरुणाची कथा मी लिहिली आहे
तो खरा हिरो !

आणि तसेच बाकीचेही इतर सगळे नायक / नायिका

हे एक उत्तम DOCUMENTATION झाले आहे

त्याचं कौतुक करणं आवश्यक आहे

धन्यवाद

अगदी खरं आहे
कोणतंही औषध बाजारात येण्यापूर्वी त्याची चिकित्सालयीन चाचणी केली जाते, बहुतेकदा चाचणीचा पाहिला टप्पा हा सुदृढ स्वयंसेवकामध्ये केला जातो.
त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक.

खूप लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत
मी कोणाकोणाची नावं घेऊ ?

पण खूप आभार .

पण लोक पाहत असतात . कौतुक करत असतात .
तेही मी फारसा सक्रिय नसताना . हे जाणवलं की बरं वाटतं .

पुन्हा - माझं अभिनंदन केलं आहे त्याचा आनंद तर आहेच .
पण ते कथानायक खरं ग्रेट आहेत .

त्यांचं काम डोंगराएवढं
अन माझं अस्तित्व
त्याच डोंगरावरच्या
एखाद्या खड्याएवढं

त्यांचं काम डोंगराएवढं
अन माझं अस्तित्व
त्याच डोंगरावरच्या
एखाद्या खड्याएवढं>>
बिपिनजी,
खूप अभिनंदन, या कार्याचा एक भाग आपण आहात.
खूप खूप शुभेच्छा, असेच छान छान आपण लिहावं आणि आपल्याला नव्या संधी मिळाव्या .
आणि प्रचंड respect, इतक्या नम्रपणे सगळ्यांचं कौतुक आणि शुभेच्छा स्वीकारल्या आपण..

गौरी
खूप आभारी आहे .

तुमच्या प्रतिक्रियेने संकोच वाटला .

अभिनंदन आणि शुभेच्छा.

ज्यांनी प्रेरणादायी काम केलं आहे त्या सर्वांना दंडवत, रीस्पेक्ट.

Pages