Submitted by Meghvalli on 18 March, 2024 - 04:54
मी कृष्ण "मेघ", आकाशी विहरुन झाले।
बरसुन आसमंती ते विरणे जगुन झाले।।
भिरभिरला हळुवार नभातून थंड शांत वारा।
गहिवरला नकळत "मेघ",आकाश फिरुन झाले।।
डोंगर दऱ्यां शी माझे आजन्म मैत्र आहे।
त्या दाट हिरवळीशी हितगुज करुन झाले।।
त्या वाळवंटास शुष्कतेचा का जडला विकार।
मुसमुसुन माझे तेव्हा कितीदा रडून झाले।।
आशेनै पाहात होता मज तो बळीराज एकटक।
फोडून वक्ष धरणीचा त्याने स्वप्न पेरुन झाले।।
सोमवार, २६/२/२०२४ , ७:५० PM
अजय सरदेसाई (मेघ)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>आशेनै पाहात होता मज तो
>>>>>आशेनै पाहात होता मज तो बळीराज एकटक।
फोडून वक्ष धरणीचा त्याने स्वप्न पेरुन झाले।।
आवडले
त्या वाळवंटास शुष्कतेचा का
त्या वाळवंटास शुष्कतेचा का जडला विकार।
मुसमुसुन माझे तेव्हा कितीदा रडून झाले।।>> विशेष आवडले
छान आहे