गेल्या बऱ्याच दिवसांपासून वृत्तपत्र वाचताना एक गोष्ट लक्षात आली.. काही किंवा जे लक्षात आले ते मराठी शब्द व रचनांचा हिंदी पद्धतीने रुप पालटून वापरात आणण्याचं वृत्तपत्रासारखं माध्यम प्रयत्न करीत आहे. याचं आश्चर्य वाटतं.. उदाहरणादाखल काही शब्द खाली देत आहे :-
योग्य मराठी शब्द। हिंदी करण झालेला मराठी शब्द
-------------------- --------------------------------------
१)सुरक्षितता सुरक्षिता
2)पारदर्शकता पारदर्शिता
3)शहाणपणा शहाणवी (हा शब्द मी तरी
कोणत्याही मराठी साहित्यात
वापरलेला पाहिला नाही.,कोणी
पाहिला असल्यास अवश्य
संदर्भासहीत सांगावे.)
जसजसे आणखी शब्द सापडतील तसतसे या यादीत समाविष्ट करीन.आपणासही असे शब्द सापडल्यास ही यादी वाढवण्यास मदत करावी ही विनंती. मला वाटतं योग्य मराठीचा वापर हाच यावरील उपाय असावा. सर्व मराठी शब्द वापरात आणावेत नाहीतर मराठीचं रुपडं एवढं बदलेलं की ती ओळखणं कठीण जाऊ शकेल.
या लेखात हिंदी भाषेबद्दल कोणताही आकस नसून आपली भाषा योग्य रितीनै वापरात यावी,एवढीच अपेक्षा आहे.
विचारपूर्वक एखादा शब्द किंवा
विचारपूर्वक एखादा शब्द किंवा शब्दप्रयोग मराठीत आणणे आणि केवळ आळशीपणाने किंवा मुळातच तेवढी गुणवत्ता/वाचन/अभ्यास नसल्यामुळे वापरणे यात फरक आहे. >>>> १०० %
'अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज' यात
'अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज' यात तुम्हाला 'अंदाज' हा शब्द खटकला हे मान्य, पण 'बोल्ड' पण तितकाच खटकला का? प्रामाणिकपणे सांगा. आता हे वाक्य मराठीत कसे लिहाल, ते पटकन सांगा.
माझ्या आधीच्या प्रतिसादात 'ओव्हररेटेड' साठी सुयोग्य मराठी शब्द कुठला, हे विचार करूनही ठरवता आले नाही, म्हणून शेवटी तोच शब्द वापरला.
तुम्ही 'एलिटिसिझम' शब्द वापरला, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सहज कळले मला. मग अश्या वेळी तुम्ही 'अभिजातता' हा मराठी शब्द वापरावा असा अट्टाहास का धरायचा? (अट्टाहास की अट्टहास याच्यावर, इथेच मायबोलीवर, झालेली चर्चा लक्षात आहे.)
शक्यतो भाषेची मोडतोड करू नये, याच्याशी सहमत आहे. पण भाषा सुटसुटीत, साधी सोपी सरळ असणे हे माझ्या दृष्टीनेतरी, भाषा सौंदर्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने असा आग्रह फार कुणी धरत नाही, असा अनुभव आहे.
वावे पोस्ट पटली.
वावे पोस्ट पटली.
वृत्तपत्रांकडुन गुणवत्ता/वाचन/अभ्यास असणे अपेक्षितच आहे.
यात 'तुम्ही तरी शुद्ध मराठी कुठं बोलता?', 'मी तर लोक असेही बोलताना ऐकले आहे' वगैरे प्रतिवाद / समर्थन मला तरी पटत नाही.
वृत्तपत्रांबाबत सहमत. तिथे
वृत्तपत्रांबाबत सहमत. तिथे असंदिग्ध लिहून चालत नाही. मी बोलीभाषेबद्दल बोलत होतो.
उ.बो., बोल्ड नाहीच खटकला मला.
उ.बो., बोल्ड नाहीच खटकला मला. 'अंदाज' जरी खटकला, तरी 'अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज' यातून काय म्हणायचं आहे हेही मला कळलं. स्वच्छ मराठीत लिहायचं तर अभिनेत्रीने अंगप्रदर्शन केलेलं असणार
यात नकारात्मकता आली. 'बोल्ड'ला धाडसी हा मराठी प्रतिशब्द असला तरी याबाबतीत तोही नकारात्मक वाटेल कदाचित.
'अंदाज'ला मराठीत संपूर्णपणे वेगळा अर्थ आहे, तसंच 'हैराण'च्या बाबतीतही आहे.
भाषा सुटसुटीत, सरळ, सोपी असावी हा तुमचा आग्रह मला माहिती आहे. माझ्या 'अक्षवृत्तांत' लेखाखाली तुम्ही या अर्थाचा प्रतिसाद दिला आहे.
भाषा सुटसुटीत असावी हे मला मान्यच आहे. पण याचा अर्थ असा नाही की सुमार दर्जाची भाषा आपण चालवून घ्यावी.
वावे, मुद्दा पटला.
वावे, मुद्दा पटला.
आमच्या घरात दररोज अश्या
आमच्या घरात दररोज अश्या मराठीची उदाहरणे ऐकायला येतात. सुरुवातीला 'असं नाही असं' वगैरे म्हणून मी स्वतःच ते वाक्य रिप्लेस करायचे. पण माता आणि मातृभाषेविषयी वैताग निर्माण होऊ नये म्हणून सध्या 'तुला असे म्हणायचे आहे का?' असे विचारते. आत्तापर्यंत तरी 'हो' असे उत्तर आणि करेक्टेड वाक्य येते.
ताजे उदाहरण 'मी अमुकला या नावाने बोलावणार आहे' - मैं फलाने को इस नाम से बुलानेवाला हूं' चा शब्दशः अनुवाद.
हे आधीच कोणी लिहीलंय का माहित
हे आधीच कोणी लिहीलंय का माहित नाही पण वाक्यात 'म्हणून'च्या जागी 'सो' वापरणे. हे इंग्लिशचं आहे पण भावना समजून घ्या.
अंदाज शब्दाच्या मराठी अर्थाचा
अंदाज शब्दाच्या मराठी अर्थाचा बळी देउन, हिंदी अर्थ बसवून काहीच्या काही तिडीक आणणारं वाक्य केलय. कोणत्या शाळेत या व्यक्ती पाट्या टाकतात काय माहीत.
>>> 'अंदाज'ला मराठीत
>>> 'अंदाज'ला मराठीत संपूर्णपणे वेगळा अर्थ आहे, तसंच 'हैराण'च्या बाबतीतही आहे.
हो, मीही हाच मुद्दा मांडणार होते. जे शब्द अगोदरच निराळ्या अर्थाने रुळले आहेत, त्यांची नव्याने मोडतोड सहज पचत नाही खरी.
'काय आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे?' असल्या वाक्यरचनाही!
मिरींडा सहमत... भाषेत इतर
मिरींडा सहमत... भाषेत इतर भाषांतल्या शब्दांची, वाक्प्रचारांची भर पडणे, ते रुळणे वेगळे आणि एखाद्या भाषेत असलेलेच शब्द चुकीच्या अर्थाने वापरणे, इतर भाषेच्या प्रभावाने अर्थ समजून न घेता काहीही वाक्यरचना, क्रियापदे वापरणे वेगळे ...
नवीन शब्द येऊन भाषा समृद्ध व्हायलाच मदत होईल.. पण दुसऱ्या प्रकारात आहे ती भाषा ही बिघडत जाते असं वाटतं
हल्लाबोल केला - यात हल्लाबोल
हल्लाबोल केला - यात हल्लाबोल हा शब्द हिंदीतून मराठीत आला आहे.
अमुक तमुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते । अमुक तमुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. या राहिले आहेत ने धुमाकूळ घातला आहे, कानांना टोचते ते.
सौन्दर्य । सुंदरता
क्रौर्य । क्रूरता
सुलभीकरण । सोपीकरण ( हा शब्द तर धन्य आहे !)
पाककृतींच्या कार्यक्रमात सर्रास जिंजर , गार्लिक, कोकोनट, बैंगन, कर्ड, स्प्रिंकल, ग्राइंड वगैरे वापरले जाते. हिंदी नसले तरी इथे लिहिले कारण या सर्व शब्दांना मराठी शब्द आहेत आणि हे शब्द ऐकताना बोलणाऱ्याला फोडून काढावे असे हिंसक विचार मनात येतात.
कामात व्यग्र असणे । व्यस्त असणे
आणि अमुक एक पोस्टला एक लाईक \ बदाम बनतोच ( हे ही एक डोक्यात जाणारे वाक्य आहे)
अलीकडेच एका मराठी अभिनेत्रीची मुलाखत ऐकली त्यात तिचे, आम्ही busy असल्याने मुलांसाठी वेळ नसल्याने "मुले ठेवलीच नाहीत" हे ऐकून तिच्या कानाखाली ठेऊन द्यावी असे हिंसक विचार पुन्हा एकदा मनात आले. म्हणजे मुलं नसण्याला आक्षेप नाही, ती ठेवायला किंवा न ठेवायला आहे. मराठीत 'कोणालातरी ठेवणे' याला फार वेगळा अर्थ आहे हे तिला बहुदा माहीत नसेलच. मुले होऊच द्यायची नाहीत, जन्मालाच घालायची नाहीत असेसुद्धा म्हणता येऊ नये ? इतकी का अवास्तव अपेक्षा आहे ही ?
लिहीलंय का माहित नाही पण
लिहीलंय का माहित नाही पण वाक्यात 'म्हणून'च्या जागी 'सो' वापरणे : हे खूपच डोक्यात जाते.
भाषा सुटसुटीत असावी हे मला मान्यच आहे. पण याचा अर्थ असा नाही की सुमार दर्जाची भाषा आपण चालवून घ्यावी - - सहमत.
हो. ती वाट्टेल ते बोलेल
हो. ती वाट्टेल ते बोलेल तुम्ही कोण कानाखाली ठेवणारे?
.... असं लिहिणार होतो. पण तुम्ही वाट्टेल तेच. मग काय बोलणार!
:D:D त्यांचे तोंड, त्या
:D:D त्यांचे तोंड, त्या बोलणार ! भाषेची चिरफाड करून त्यांनी आमच्या कानांत ओतली तरी आम्ही कोण कानाखाली ठेवणारे ? नुसते ( ते ही घाबरत घाबरत ) लिहिले. भाषा जसजशी सर्वसमावेशक होत आहे, तशी माझी एकूण सहिष्णुताही वाढत आहे ही एक समाधानाची बाब आहे.
अमित
अमित
आत्ता इतक्यातच मायबोलीवर कुठेतरी 'मुलं दाव्याला लागतात' असा एक शब्दप्रयोग दिसल्याचं आठवतं.
मराठीत एकतर 'दावणी'ला बांधलं जाणं असतं नाहीतर 'पणाला' लागणं असतं, 'दावा' शब्द सहसा claim या अर्थी वापरला जातो.
मग 'दाव्याला लागणं' म्हणजे काय? तो 'दाँव पे लगना'चा मराठी अवतार असेल का?
'काय आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ
'काय आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे?' असल्या वाक्यरचनाही! >>>
वावेंच्या पोस्टशी सहमत. "अंदाज" चा अर्थ मराठीत वेगळा असल्यामुळे खटकतो. "बोल्ड"ला जर प्रचलित शब्द ऑलरेडी वापरात असता तर तो ही खटकला असता. म.टा. वगैरेंच्या तरूण लोकांकरता पुरवण्या वगैरे असतात तेथे असे कृत्रिम इंग्रजी शब्द असतात.
या रेटने उद्या आपल्याच मोठ्या भावाची ओळख करून देताना "हा आमचा पाजी" म्हणून करतील
मग 'दाव्याला लागणं' म्हणजे
मग 'दाव्याला लागणं' म्हणजे काय? >>> ती मुले वकील असतील आणि आयटी सर्विसेसवाले एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर एकदम पन्नासएक लोक लावतात तसे एखाद्या मोठ्या दाव्याला वकील म्हणून नेमले असतील
हा बीबी मस्त आहे. मनात
हा बीबी मस्त आहे. मनात खदखदणारं लिहिलं गेलं आहे आधीच.
>>> हा आमचा पाजी
>>> हा आमचा पाजी


'हा आमचा प्रताप' आठवलं त्यावरून!
>>> एखाद्या मोठ्या दाव्याला वकील

मोठ्या भावाची ओळख करून देताना
मोठ्या भावाची ओळख करून देताना "हा आमचा पाजी" >> दाव्याला वकील >> दोन्ही
मी आतापर्यंत हिंदी दाँव पे म्हणजे कोर्टातल्या दाव्याला असं समजत होतो. म्हणजे मी लोकसत्ता हिंदी आवृत्तीत काम करण्याच्या लायकीचा आहे.
मुले दाव्याला मी लिहिलय
मुले दाव्याला मी लिहिलय बहुतेक. नीट विचार करुन शब्दरचना केली पाहीजे मान्य.
'हा आमचा प्रताप' >>>
'हा आमचा प्रताप' >>>
मी लोकसत्ता हिंदी आवृत्तीत काम करण्याच्या लायकीचा आहे. >>>
“ या रेटने उद्या आपल्याच
“ या रेटने उद्या आपल्याच मोठ्या भावाची ओळख करून देताना "हा आमचा पाजी" म्हणून करतील” -
सचिनला मराठी खेळाडूसुद्धा जेव्हा ‘पा जी‘ म्हणतात तेव्हा मला असंच हासू येतं.
कहीं ना कहीं चे “कुठे ना कुठे
कहीं ना कहीं चे “कुठे ना कुठे” आणि “खूप साऱ्या” राहिलयं
जसं की आणि जब की वापरताना मी
जसं की आणि जब की वापरताना मी बऱ्याच वेळा ऐकलंय.
Pages