कृष्ण सखा

Submitted by काव्यधुंद on 2 March, 2024 - 22:24

कृष्ण सखा अन् कृष्ण सोबती
कृष्णच उरला अवतीभवती

बालपणी अंधार भेदला
बाळकृष्ण मज मनी भावला

निरागस हासे खोड्या करुनी
कृष्णच भरला ध्यानीमनी

गोपांमध्ये सावळवर्णी
कृष्णनाम रत माझ्या कानी

पराक्रमाची सोज्वळ मूर्ती
कृष्णरुपावर माझी भक्ती

नात्याहून कर्तव्य परायण
कृष्ण कृष्ण हे नीत पारायण

विश्र्वरुप दावूनी जगाला
महाभारते कृष्ण शोभला

प्रजेस माने कुटुंबासम
कृष्णराज्य आनंद वैभव

चुकली नाही ललाट रेषा
क्लेश पाहुनी सुटली आशा

त्यातून तरला कृष्णच उरला
कृष्ण जगी हा अशा शोभला

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults