मराठ्यांचे गद्दार....

Submitted by ASHOK BHEKE on 28 February, 2024 - 00:27

मराठ्यांचे गद्दार....

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याची आई भवानी पुढे शपथ घेतली. छत्रपती शिवरायांनी शत्रू मोजण्यापेक्षा फितुरांना मोजा, असे सक्त आदेश दिले होते. फितुरांना इंगा दाखविला की, शत्रू अर्धा गळून पडतो ही महाराजांची शिकवण. फितुरांवर शिवरायांची बारीक नजर होती. त्यांना वेळप्रसंगी देहदंड देखील देऊ केले. परंतु फितूर हे लोभापायी उत्पन्न होत गेले. स्वराज्यनिर्मितीत यांनी अनेक वेळा काटे पेरले परंतु छत्रपती शिवरायांनी त्यावर मात केली. गद्दार या शब्दाचा उगम फार इतिहासातील आहे. आपल्या राजाशी किंबहुना स्वराज्याच्या विरोधात जाऊन शत्रूच्या हितासाठी काम करणारे गद्दार हा विजयातील मोठा काटा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तम गूण म्हणजे त्यांना असलेली माणसांची पारख. या गुणामुळे महाराजांनी आपल्या पदरी उत्तम माणसं बाळगली त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करून फारच कमी म्हणजे अगदी बोटावर मोजता येतील एव्हढीच लोकं शत्रूकडे गेली. परंतु छत्रपती सभाजी महाराजांचा वध हा फितुरीमुळे झाला. तेथे गद्दार गणोजी शिर्के पैदा झाला नसता तर संभाजी महाराजांना दख्खनेत हरविणारा कोणी नव्हता. मराठ्यांचा दूसरा छत्रपती केवळ दहा वर्षे जिवंत राहिला असता तर नक्कीच समुद्रातला जंजिरा आणि पोर्तुगीज सत्तेचा माज उतरविला असता. कुणाची हिम्मत होती स्वराज्यात येऊन छत्रपतींना बेड्या ठोकायच्या... वेळोवेळी गद्दार हे स्वराज्याच्या वाटेत काटे म्हणून आले. छत्रपतींच्या सैन्यात शेकडो मुस्लिम सैनिक,सरदार, हवालदार, सरहवालदार होते. परंतु काहीजण वगळता त्यांनी स्वराज्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. आपण ब्राम्हण आहात आमच्यासाठी वंदनीय आहात असे सांगून सुध्दा कृष्णजी भास्कर कुलकर्णी यांनी अफझलखान भेटीनंतर शिवरायांवर दोन वार केले होते. शिरस्त्राण असताना राजांच्या कपाळावर त्या तलवारीचे पात सपकण स्पर्शून गेले. जर राजांनी त्यावेळी सावधानता बाळगली नसती तर वेगळेच पाहायला मिळाले असते. पेशवे काळात नारायणराव पेशवेंची हत्या हा घरातील फितुरीचा एक भाग होता. राघोबादादा शूरविर योध्दा. अटकेपार झेंडे लावणारा. परंतु सत्तेसाठी त्याने आपल्या पुतण्याचा घात केला.
आज काहीजण मराठ्यांचे गद्दार दिसून येत आहे. मराठा आरक्षणाचा महाकाय वृक्षाच्या छायेत आपली भविष्यातल्या लेकराबाळांना सावली मिळावी आणि त्याची मधुर फळे चाखता यावीत या उद्देशाने मराठा समाजाचा लढा अंतिम टप्प्यावर मनोज जरांगे पाटील यशाच्या दिशेवर मार्गस्थ असताना त्यांच्या वाटेत काटे पसरविणारे गणोजी आणि आनंदीबाई सारखे पैदा झाले आहेत. ज्यांचे काहीच मराठा समाजासाठी योगदान नाही. ते जरांगे पाटीलावर नाही नाही ते आरोप करीत सुटले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी शंभर जरी चुका केल्या तरी मान्य आहेत. ज्याने कोपर्डी प्रकरणात आरोपीवर हल्ला करणार्‍या मराठा युवकांना अटक केल्यावर दोन वर्षे घराचे तोंड न पाहिले. आपल्या स्वत:ची शेती विकून मराठा युवकांसाठी खर्च करणार्‍या मराठा योध्दा महत्वाचा की, त्यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या भोंदू गद्दारांचे ऐकून घ्यायचे. गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. पण योग्य दिशा ही मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाला गवसली. त्यांच्या धडक बेधडक कृतीमुळे मराठा योध्दा मोठा झाला आहे. त्यांची महानता अनेकांच्या डोळ्यात खुपू लागली आहे. अशा वेळी मराठा समाजात गद्दार निर्माण होणारच. आज ठिकठिकाणी काहीनेते मंडळींच्या चिथावणीमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन होत आहेत. आज जरांगे पाटील एकटे पडल्याचे चित्र प्रसारमाध्यमातून दाखवीत आहेत. गद्दारांच्या पत्रकार परिषदाना अधिक वेळ दिला जात आहे. कोणी उपटसुंभ मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकीत आहे. परंतु आजही मराठे कितीही गद्दारी झाली तरी ठामपणे मराठा योध्याच्या बाजूने उभा आहे. मराठा समाजातील मत विभाजन करण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे. शत्रू हा मराठ्यांच्या मुळावर उठला असला तरी महाराजांच्या शिकवणींनुसार आज फितूर मोजण्याची गरज आहे, त्यांना इंगा दाखविला की, शत्रू उमदळून पडल्याशिवाय राहणार नाही. आज जरी ते भुंकत असले तरी त्यांची पिढी त्यांना माफ करणार नाही. आपल्या घराण्याला समाज हा गद्दार म्हटल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांच्या गद्दारांनी लक्षात घ्यायला हवे.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< परंतु छत्रपती सभाजी महाराजांचा वध हा फितुरीमुळे झाला >>

----- वध हा शबदप्रयोग का केला? एखाद्या क्रूर राक्षसाचा वध, अन्यायकारी राजाचा वध... अशा अर्थाने वध वापरतात.
संभाजी महाराजांची विश्वासघाताने हत्या किंवा खून असे चालेल.

काही लोक गांधी हत्येसाठी पण वध हा शब्द प्रयोग वापरतात Sad जसे काही गांधी यांनी देशावर फार मोठ्ठा अन्याय केला (देशाचे ५५ कोटी रुपये देण्यासाठी आग्रह, किंवा दिल्लीतली घरे निर्वासितांसाठी... अरे महत्वाचे देशाचे दोन तुकडे... या पैकी कुठल्याही कारणासाठी हत्या झालेली नव्हती)

मी मराठा नसूनही जरांगेचे कौतूक करत होतो. ज्या पद्धतीने स्वतःला त्रास होऊन ही जरांगे हे आंदोलन चालवत होता, मराठा समाजाला एकत्र आणले होते हे निश्चित कौतुकास्पद होते. पण नुकतीच त्याची शिवराळ भाषा ऐकली आणि आता ह्याच्याबद्दल काही वाटेनासे झालंय. आता याचाही अण्णा हजारे होतोय का ते पहावे लागेल.

प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच कुळ ज्या समाजात आहे त्या समाजाला मागास म्हणा असं तो जरंग्या आम्हाला सांगत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. मराठा समाज पुढारलेलाच आहे. आर्थिक दृष्ट्या कदाचित समाजाचा काही भाग दुर्बल असला, तरी सांस्कृतिक दृष्ट्या त्यांची प्रगती झाली आहे. शिक्षणाचं महत्व समाजात तळागाळापर्यंत पोचलं आहे. त्यांच्यात स्वतःचा विकास करून घेण्याची क्षमता नक्कीच आहे. म्हणून त्यांना आरक्षणाची गरज नाही.

ज्यांना आरक्षण आहे असा कुठला समाज गेल्या ५० वर्षात सुधारून इतरांच्या बरोबरीला आला? (जो समाज स्वतःला इतरांच्या बरोबरीचं मानतो तो आरक्षणाची भीक घेणार नाही.).

सध्या आरक्षणाची भीक मागत फिरणारा तो भिकामांगा जरांगे मराठा समाजालाच कलंक आहे. त्याला मराठेच कसं सहन करतात आणि त्याच्या बरोबर स्वतःचा वंश, कुल वगैरेचा विचार न करता भीक मागतात ते काळत नाही.

आणि जर एखादं मुलं परीक्षेत अभ्यास न केल्यामुळे नापास झालं तर त्याला खोटे गुण देऊन पास करा असं म्हणत नाहीत.
त्याच प्रमाणे मराठा समाज जर स्वतःच्या कर्माने मागास झाला असेल तर त्यांना आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही.

इतर जातींना दशकेंदशके आरक्षणाचा फायदा मिळत असताना मराठ्यांना आपल्याही पोरांना तो मिळावा आस वाटत असले तर चुकीचे काय?

इतर जातींना दशकेंदशके आरक्षणाचा फायदा मिळत असताना मराठ्यांना आपल्याही पोरांना तो मिळावा आस वाटत असले तर चुकीचे काय?>>>> जरुर द्या. पण भाषेचे काय? मानसिकतेचे काय? परजातीविषयी एवढा प्रचंड द्वेष की आम्ही तीन मिनीटात ब्राह्मणांना संपवुन टाकु ही जाहीर घोषणा. संपव बाबा एकदाचे आम्हाला म्हणजे डायरेक्ट आरक्षण मिळेल. जगातल्या सगळ्या देशांचा व्हिसा पण काढ आणी तिथले पण वेचुन घे.

ब्राह्मणांनी कोणता तुमच्या विकासात खोडा घातलाय की डायरेक्ट संपवण्याची भाषा? आणी गंमत म्हणजे यांच्या नेत्यांचे सिए, डॉक्टर वगैरे ब्राह्मणच असतात. जरांगेंनी राजकारण बाजूला ठेऊन विकास, आरक्षण याकडे लक्ष द्यावे. ज्या फडणविसांनी सारथी सारख्या योजना आणल्या त्यांना अरे तुरे, आई बहिणीवरुन शिवीगाळ आणी ज्या माणसाने ४० वर्षे स्वतला मराठ्यांचा नेता म्हणवुन घेतला त्याला आरक्षणाविषयी चकार शब्द बोलायचा नाही. उलट वा ! काय साहेब तुमची एनर्जी म्हणून कौतुक करायचे. बाकी सार्‍या पक्ष नेत्यांना गावबंदी, मात्र रोहीत पवार ला हारतुरे. का? लोक वेडे आहेत का न समजायला?

एवढ वर्षे मराठा नेतेच सत्तेत होते, त्यांना का कोणी जाब विचारत नाही आरक्षणाविषयी? विलासराव देशमुखांचा तर व्हिडीओच आहे की ते म्हणतायत आरक्षणाची गरज नाही. मा. सुसु ताई पण म्हणाल्या होत्या की आरक्षणाखेरीज बाकी प्रश्न पण महत्वाचे आहेत.

जरांगेंनी जरा स्व. विनायक मेटेंचे व्हिडीओ बघावेत म्हणजे भाषा कशी बोलतात ते कळेल.

रात्रीचे चांदणे, मराठ्यांना कोणी शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं का? बहुसंख्यशिक्षण संस्था मराठा नेत्यांच्या आहेत. लोकप्रनिनिधींमध्ये मराठ्यांचे वर्चस्व आहे.

मराठ्यांना आता मागास, दुर्बल वाटण्याची कारणे त्यातला बहुसंख्य वर्ग शेतीवर अवलंबून असणे, पिढ्यान पिढ्या वाटण्यांमुळे शेती अव्यवहार्य होणे (एक कारण) , १९९० नंतरच्या आर्थिक खाऊजा धोरणाचा फायदा कृषीक्षेत्राला तितकासा न मिळाल्याने / इतरांच्या तुलनेत ते मागे राहणे
ही आहेत. या समस्यांचे निराकरण आरक्षणाने कसे होईल?

आर्थिक दुर्बलांना शिक्षण शुल्कात सवलत आधीपासून आहे. नोकरीतल्या आरक्षणाने भलं होईल म्हणावं तर सरकारी नोकर्‍या आहेत कुठे?

-----
सगळ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून त्यांच्या २७ टक्के हि श्श्यात वाटा घेऊ देणं योग्य वाटतं का? शिवाय हे आरक्षण लोकप्रतिनिधींसाठीही मिळू घातलं आहे. अशाने स्था स्व संस्थांत ओबीसींचं म्हणून जे काही प्रतिनिधित्व आहे, तेही मराठेच घेतील.
---
एवढं होऊन मराठ्यांचा जातिश्रेष्ठत्वाचा , वर्चस्वाचा बाणा उतरणार आहे का? तुमच्या सात पिढ्या आल्या तरी आमची बरोबरी करू शकणार नाहीत असं म्हणायला तुम्ही आकाशातून पडला आहात का? मग तुमच्यात आणि " आमच्यात देवाचा अंश, आम्ही तुमच्यात आणि देवात मध्यस्थ , आम्हांलाच धार्मिक अधिकार, " म्हणणार्‍यांत फरक काय राहिला?
--
मराठा क्रांति मोर्चाच्या वेळी एक मुद्दा कोपर्डी बलात्कार खून प्रकरणाचा होता. जिजाऊच्या लेकी सुरक्षित नाहीत, असा उद्घोष चालला होता. आरोपी मराठा असते, तर तो मुद्दा घेतला असता का? फक्त मराठ्यांच्या मुलीच जिजाऊच्या लेकी का? ज्या महाराजांचा वारसा तुम्ही सांगता त्यांनी असा भेदभाव केला होता का?

(इथे तुम्ही हे फक्त रात्रीचे चांदणे यांना उद्देशून नाही.)

नारायण राणे , नितीश राणे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या समर्थकांनी जरांगेंना भाषेवरून सल्ले देणं फार क्युट आहे.
-
--

नारायण राणे , नितीश राणे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या समर्थकांनी जरांगेंना भाषेवरून सल्ले देणं फार क्युट आहे. >> त्यनिमित्ताने बिळातून बाहेर येणं झालं Wink

बर्‍याच वर्षापूर्वी कुठल्यातरी मराठी वृत्तपत्राच्या विशेष लेखामध्ये मराठ्यांन्ना सावधान करणारा एक लेख होता. लग्नातील व ईतर कार्यक्रमातील अवाढव्य, दिखाऊ व अवास्तव खर्च (ज्यांना परवडत नाही अश्यांकडून आणी तेही कर्ज काढून), सोन्याचे दागिने वगैरे दिखाऊपणा ह्यावर खर्च, शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष वगैरे सावधान करणारे मुद्दे मांडून सर्वकष प्रगतीसाठी नियोजनबद्ध जीवनक्रम अवलंबावा असे त्यात सुचवल्याचे आठवते. तसे न केल्यास संभाव्य दुष्परिणामांची कळकळीची सुचनाही होती. ते आठवले....

माझी 'मराठा' बद्दलची व्याख्या 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने एकत्र जमलेले ते सर्व मराठे' अशी असल्याने एका 'मराठ्याने' दुसर्‍या मराठ्यावर चिखलफेक करणे, अपशब्द वापरणे हे अयोग्य आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे खाजगीकरण करणे एक मराठा म्हणून कदापी मान्य नाही.

उठसूठ छत्रपती शिवरायांचे नाव घेउन स्वत:च निवाडे करुन त्यांच्या किर्तीला धक्का लावण्याचे काम मराठा म्हणून वेगळी चूल मांडू पाहणार्‍या वृत्तीला वेळीच पायबंद घालावयास हवा....

नारायण राणे , नितीश राणे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या समर्थकांनी जरांगेंना भाषेवरून सल्ले देणं फार क्युट आहे.
---नारायण राणे , नितीश राणे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या समर्थकांनी जरांगेंना भाषेवरून सल्ले देणं फार क्युट आहे.
--- >>>> Proud एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरु मारलेच पाहीजे हे समर्थन फार क्युट आहे. Proud

बाय द वे, मी बिळात राहो नाहीतर छपरावर. काही लोकांना याने फारच त्रास होतोय असे दिसते, असो !

आपले ठेवायच झाकुन या रितीमध्ये उद्धव ठाकरेच्या लोकांनी तिवारी या माणसाचे केलेले टक्कल आठवले.

राणे काहीतरी बोलले म्हणून त्यांना जेवणावरुन पोलिस स्टे शन मध्ये नेतांना केलेला बलाचा वापर दिसला. ( त्यावेळेस सत्ता होती म्हणून पोलीसांना हाताशी धरले. आता सत्ता गेलीय तर फाट फाट तोंडाचा पट्टा गिरणी सारखा चालू असतो. वरतुन भुवयाउडवु कलाकाराचा नाच पण बघायला मिळतो सकाळ संध्याकाळ. )

जित्तुभाय बांद्रावाले यांनी करमुसे यांची केलेली मारहाण आठवली.

राणे आणी त्यांची पोरे भलेही गुंड का असेनात पण बाकी जातींना समुळ नष्ट करु असे त्यांनी बोलल्याचे दाखवुन द्यावे. दररोज दुसर्‍या जातीच्या लोकांना शिवीगाळ केली जातेय हे पण दिसत नसेल तर या माननीय सदस्यांनी डोळ्यावर कातडे तसेच ठेवावे.

भाषा नीट वापरायला पाहिजे, बरीच लोक कारण नसताना ब्राम्हणांना शिव्या देत असतात. पण आणखी किती वर्ष आरक्षण देणार? सध्याच्या काळात सर्वांना शिक्षण उपलब्ध आहे. एकदा आरक्षण मिळालं की आपला त्यावर हककच आहे आस लोकांची वागणूक आहे. ओबीसी नी ओपन मध्ये येऊन संघर्ष करावा. प्रत्येक काही वर्षांनी क्रीमिलेयर मर्यादा वाढवणार. मग आरक्षणातून लोक बाहेर कशी पडणार. एकदा लाभ घेतला तरी परत परत फायदा उठीवणार.

,८ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे आर्थिक दुर्बल असतात हो. .
-----
हे हे हे. नितीश राणे वरून whataboutry ने भरलेला निबंध लिहिला. .

टीप - मी जरांगे किंवा त्या निबंधातल्या गोष्टींचं समर्थन करीत नाही. वेळोवेळी निषेधच केला आहे.

जरांगे जेव्हा इतर नेत्यांबद्दल बोलले तेव्हा भाषा का नाही खटकली?

नितेश राणे कसा का असेना म्हणत त्याची अलाबला घेणं क्यूट आहे.
तो काय बोलतो ते आपल्या WhatsApp वर थोडंच येणार?

रात्रीचे चांदणे,
मराठ्यांनी आरक्षण मागितलं तर चूक काय असं तुम्ही सकाळी विचारता. ओबीसींनी ओपन मध्ये संघर्ष करावा असं दुपारी म्हणताय. पण जरांगेंना ओबीसी मधूनच मराठा आरक्षण हवंय.
आता तुम्ही संध्याकाळी काय म्हणता त्याची वाट बघतो.

एकाला आरक्षण द्यायचा आणि दुसऱ्यांना नाही म्हणून आरक्षण मागितल चूक नाही म्हणालो. पण जर ओबीसी ओपन मध्ये आले तर मराठ्यांना कशाला पहिज आरक्षण?

ओक्के. म्हणजेच तुमची मागणी मराठ्यांना आरक्षण द्या, अशी नसून ओबीसी आरक्षण बंद करा अशी आहे. स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद.

बरं . त्या पोस्टमध्ये मी इतरही मुद्दे मांडलेत. त्यावरही विचार करा. उत्तर द्याच असं म्हणत नाही.

जरांगें ना हात जोडुन विनंती की त्यांनी फक्त नी फक्त आरक्षण यावरच बोलावे. हा बामन, तो मराठा, हा ओबिसी हे बंद करावे . तसेही आरक्षण जर मिळाले आहे तर ते ओबिसी मधुनच हवेय हा अट्टाहास सोडावा. ते ओबिसींच्या का मागे लागलेत कळनां.

आणी सगेसोयर्‍यांना पण आरक्षण द्या हे काय नवीन आहे? जगभरात निदान ७५ टक्के देशांमध्ये तरी पितृसत्ताक पद्धत आहे. मग एखाद्या मराठा किंवा कुणबी बाईने दुसर्‍या जातीत लग्न केले तर त्या बाबाजीला व तिच्या मुलांना सुद्धा आरक्षण द्या असे जरांगे म्हणतायत. मग समजा एखाद्या मराठा वा कुणबी स्त्रीने एखाद्या ब्राह्मण वा बौद्ध वा कोणत्याही इतर जातीत लग्न केले तर त्यालाही ते कसे लागु होईल?

समदे डोक्यावरुन चाललयं.