Submitted by छन्दिफन्दि on 27 February, 2024 - 01:25
खमंग!
शब्दातच अनुभूती !
खमंग वास असतो की चव? की दोन्ही ??
आपले खासम खास महाराष्ट्रीयन खमंग पदार्थ,
खमंग चकल्या
खमंग भाजणी
खमंग गुळपोळी
खमंग तिळगुळ
खमंग थालीपीठ
खमंग काकडी
पाणी सुटलं ना तोंडाला !
अजून कोणते खमंग पदार्थ आठवतायत तुम्हाला?
खमंगला हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात , खूप आठवून पाहिलं पण नाही सुचलं .
असं वाटतं बहुदा खमंग पदार्थ फक्त मराठीच असावेत म्हणून कदाचित त्याला इतर भाषांमध्ये पर्यायी शब्दच नाही, खरं का??
****
खमंग सारखे असे खास फक्त मराठीत असणारे शब्द लिहू यात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान धागा!
छान धागा!
बोटचेपे धोरण, तंद्री लागणे, पळीवाढी भाजी
आणि काही काही म्हणी ज्या खास मराठी मातीतल्या आहेत...उदा
हातच्या कांकणाला आरसा कशाला?
जात्यातले रडतात, सुपातले हसतात
माय मरो मावशी जगो
सुपारी देणे
खमंग = piquant
खमंग = piquant
चक्क
चक्क
piquant : having a pleasantly
piquant : having a pleasantly sharp taste or appetizing flavor.
google translate : तीव्र
तीव्र = strong, intense,
तीव्र = strong, intense, acute
तसच झुळझुळ, खळ खळ , रीप रीप
तसच झुळझुळ, खळ खळ , रीप रीप असे नाद तयार करणारे शब्द ..
डँबिस
डँबिस
धांदरट बावळट ठणाणा कर्कश
धांदरट
बावळट
ठणाणा
कर्कश
>>हातच्या कंकणाला आरसा कशाला?
>>हातच्या कंकणाला आरसा कशाला?<< नाही हो..उलट मला नेहमी च वाटत आले आहे कि ही म्हण अगदी जशी च्या तशी हिंदीतून उचलली आहे.
हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या ? ही ती मूळ म्हण
वळवळ
वळवळ
चळाचळा
धसमुसळेपणा
किणकिणाट
थयथयाट
आदळआपट
अजूनही असतील, हे पटकन आठवले
मेतकूट जमणे, गुर्गुट्या भात,
मेतकूट जमणे, गुर्गुट्या भात, चवळीची शेंग, संध्याछाया.....
खूप शब्द आहेत...मायमराठीचे वैभव वाढविणारे...
खरकटं हुरहूर
खरकटं
हुरहूर
सर्रास फर्मास
सर्रास
फर्मास
वाक्यानंतर येणारे बे हे
वाक्यानंतर येणारे बे हे निरूपयोगी अक्षर जे बेळगाव, नागपूर येथे ऐकू येते.
बे चा पाढा
झिंगाट
झिंगाट
पेताड
पेताड
सैराट
सैराट
कळवळून
कळवळूनहिंदीमधे 'तिलमिलाना' शब्द आहे. पीडा के कारण विकल होना|
चुकामुक
चुकामुक
खमंग तिळगुळ>>>>>हे पहिल्यांदा ऐकल
१/४ साठी “चतकोर”
१/४ साठी “चतकोर”
निगुतीने करणे, काहीही असो मग
निगुतीने करणे, काहीही असो मग त्या पुरणपोळ्या असो नाहीतर कपाड्यांच्या घड्या निगुतीने व्हायला पाहिजेत. माझ्या आजे सासूबाईंचा शब्द होता हा
डँबिस>> बोका
डँबिस>> बोका
धांदरट
उटणटोळ
जातं/ जाते ( धान्य दळण्याचे)
पोळपाट लाटणे
पाठमोरा
पाठमोरा
गोरामोरा
मागोमाग
पाठोपाठ
लगोलग
लगबग
दगदग
तगतग
तगमग
चकमक
कानकोंडा
१/४ साठी क्वार्टर आहे की.
१/४ साठी क्वार्टर आहे की.
चकमक साठी skir·mish आहे.
चकमक साठी skir·mish आहे.
झुंजुमुंजू
झुंजुमुंजू
तिन्हीसांजा
संधिप्रकाश
कातरवेळ
मराठी
मराठी
शिळा झुण्झुर खरकट
शिळा
झुण्झुर
खरकट
कसंतरी होणे
कसंतरी होणे
डोहाळे ओटी
डोहाळे
ओटी
Pages