Submitted by किरण कुमार on 16 February, 2024 - 11:38
चांदण्या डोळ्यात साऱ्या साचवाया लागलो
ती बघाया लागली अन् मी जगाया लागलो
स्वैर झाली कुंतले अन् घट्ट झाली ती मिठी
गंध, गजरा, मोगरा मी पांघराया लागलो
ते गुलाबी ओठ हलके टेकले ओठावरी
हाय श्वासातुन तिच्या मी दरवळाया लागलो
पैंजणांनी बंड केले शांत रात्री त्या किती
नाद झाला एक ज्यातुन मी उराया लागलो
स्वप्न मोठे पाहण्याला दाट अंधारात त्या
या प्रकाशी काजव्यांना मी धराया लागलो
कोणता हा खेळ आहे, खेळतो का मी असा ?
जिंकण्या ती , ऐनवेळी मी हराया लागलो
गुंतले ते पाश काही खोल हृदयी एवढे
पिंजऱ्याच्या पाखरासम फडफडाया लागलो
- किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली.
आवडली.
छान..
छान..
मस्तच. खूपच सुंदर.
मस्तच. खूपच सुंदर.
धन्यवाद गझलप्रेमी मित्रांनो .
धन्यवाद गझलप्रेमी मित्रांनो ..../\....
छान.....
छान.....
छान.....
दोनदा...
अरे वाह मस्त. -दिलीप बिरुटे
अरे वाह मस्त.
-दिलीप बिरुटे
सुंदर गझल !! कुंतले हा शब्द
सुंदर गझल !! कुंतले हा शब्द विशेष आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>गंध, गजरा, मोगरा मी
>>गंध, गजरा, मोगरा मी पांघराया लागलो
व्वा..... खुप सुंदर!!
ते गुलाबी ओठ हलके टेकले
ते गुलाबी ओठ हलके टेकले ओठावरी
हाय श्वासातुन तिच्या मी दरवळाया लागलो
वाह क्या बात है!
मोहरुन टाकणारी गजल