व्ही फॉर -एक
----------------
दिप्या एक गँगस्टर होता . मोठा भाईचा उजवा हात !
त्या दिवशीची सकाळ उजाडली तीच भयानक खबर घेऊन... मोठा भाई त्यांच्या गॅंगचा डॉन होता . त्याची हत्या करण्यात आली होती.
भाईच्या गावचा उरूस होता . त्यासाठी तो गावाला चालला होता . पहाटेची वेळ . रस्त्याच्या बाजूला वाऱ्यावर प्रसन्न डोलणारी शेतं . फिकट निळ्या आकाशात विहरणारे पक्षी … पण त्याला काय माहिती होतं की - त्याचाही प्राणपक्षी असाच, थोड्याच वेळात, उडून जाणार आहे ते ! त्याच्याबरोबर दहा पोरं होती. तीन आलिशान गाड्या होत्या . सगळ्या प्रकारची हत्यारं होती . परदेशी बनावटीची . अगदी महागाची .
पण आर टोळीने डोकं लढवलं होतं
त्यांना सगळी टीप होती . वाटेत दगड टाकून रस्ता अडवला होता . त्याची गाडी दगडांपाशी अडली . त्यांना लक्षात यायच्या आधीच , गाडी थांबताच झाडांमध्ये लपलेल्या शूटर्सने अंदाधुंद गोळीबार केला होता . भाईला , त्याच्या पोरांना ,बॉडीगार्डसना कळलंसुद्धा नाही . ज्या वेगाने गोळीबार केला होता त्याच वेगाने शूटर्स मागच्या मागे गायब झाले .
मोठा भाई गेला होता. ऑन द स्पॉट ! आणखी दोन पोरं गेली होती आणि चार जण जखमी होते.
XXX
गुन्हेगारी वर्तुळात ती खबर वणव्यासारखी पसरली.
पोस्टमॉर्टेम झालं . सगळे सोपस्कार पार पडले . भाईचं शव गावाला आणण्यात आलं . भालेवाडीला . ते त्याचं मूळ गाव होतं . खूप गर्दी होती . गावकऱ्यांची, त्याच्या भावकीतली, त्याच्या सगळ्या पोरांची आणि राजकीय मंडळींचीसुद्धा..
पोरं पिसाळली होती . त्यांना बदला घ्यायचा होता - इन्स्टंट ! पण ती पोरं आदेशाची वाट बघत होती . अन आता आदेश देणार कोण ? …
सरण रचलं जात होतं.
दिप्या ते बघत होता . भाईचा आणखी एक खास माणूस होता- नाना . जुनाजाणता ,वयस्कर . तो त्याच्या जवळ आला . त्याच्या कानाशी लागला आणि त्याने परिस्थिती सांगितली . तो म्हणाला. ' पोरांना आत्ताच्या आत्ता बदला घ्यायचा आहे. तरुण रक्त आहे ! उतावीळ आहेत . डोकं नाही त्यांना . पण असं चालत नसतं . विचार करून कामं करावी लागतात . आता जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे . आजपासून तू नवा भाई आहेस !'
परिस्थिती नेहमी ,एकदा वर एकदा खाली ,एकदा वर एकदा खाली अशीच असते. दिप्याला वाटलं ,आता आपण भाई झालो. ही आनंदाची गोष्ट आहे. पण दिप्याचा भाईवर खरा जीव होता ,त्याचं दुःखही होतंच . हे म्हणजे -दुःख करावं की आनंद ? त्याला कळेना .
तेवढ्यात एक पोरगा आला . तोसुद्धा त्याच्या कानाला लागला . तो म्हणाला ,'सॉरी भाई एक बॅड न्यूज आहे ! ... ‘
आता अजून काय लफडं ? ... दिप्याला वाटलं . त्याने नुसती मान हलवली .
पोराला कळलं . . तो नजर चुकवत म्हणाला ,' रियाचं लग्न ठरलंय ... ‘
समोर सरण पेटलं होतं. लालभडक ! त्याच्या लसलसत्या ज्वाला वरच्या दिशेने धावल्या ! ...
पण ते ऐकताच ,त्याची आच त्याच्या मनाला लागली . जणू तोच त्या आगीत सापडला होता . त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं .
XXX
क्रमश:
छान सुरुवात !
छान सुरुवात !
व्ही फॉर - दोन च्या प्रतीक्षेत.
दया कुछ तो गडबड है !
दया कुछ तो गडबड है !
भाग आणि क्रमश:असं न न टाकल्याने गडबड झालेली दिसतीये .
मंडळी क्षमस्व .
आबा आभार
कथा फार मोठी नाही
रोज एक भाग टाकण्याचा प्रयत्न आहे
छान सुरुवात
छान सुरुवात
छान सुरुवात..!
छान सुरुवात..!