
(भाग १ - https://www.maayboli.com/node/84650 )
(भाग २ - https://www.maayboli.com/node/84653)
(भाग ३ - https://www.maayboli.com/node/84655)
पाऊस गेल्यावर परत सूर्य चमकायला लागला होता. पण आता त्यात उबारा राहिला नव्हता. तलावाच्या पाण्यावर मात्र एक सोनसळी झळा पेटली होती. नुकतीच न्हायलेली सृष्टी जणू चंदेरी साज ल्यायली होती.
उदयननं एक गॅसस्टोव्ह आणला असावा. कारण टेंटबाहेर त्यावर कॉफी उकळत होती! कॉफीच्या नुस्त्या वासानेच दोघंही खूष झाले. "जुग जुग जिओ, मेरे लाल, तुम्हे सौ सालकी उमर मिले", नाटकी पद्धतीनं चित्रांगदानं त्याला धन्यवाद दिले. अवंतिका टेंटमधून चार कागदी कप घेऊन आली. "हे चांगलं आहे! म्हणजे कॉफी बनवायची मी, आणि थॅन्क्स उदयनला! किती भिजला आहात दोघेही! चित्रांगदा, पटकन कपडे बदल आणि मग कॉफी पी. ये, मी तुला कपडे देते." अवंतिकाबरोबर चित्रांगदा टेंटमधे गेली.
उदयन अर्जुनला म्हणाला, "भाई, कॉफी पिऊन घे. पण चल तसाच, आपण गाडी घेऊन येऊ."
कडक कॉफीच्या दोन घोटांत अर्जुनला तरतरी आली. "गाडी कशी आणायची? रस्ता आहे?"
"येस, त्यांनी आता इथपर्यंत यायला गाडीरस्ता केलाय. गेल्यावेळी मी आलो होतो तेव्हा नव्हता. आमचा टेंट आणि सामान आणलं तेंव्हा कळलं."
अर्जुनला बरं वाटलं. पुन्हा सगळं सामान डोहून आणण्याची एनर्जी आता त्याच्यात राहिली नव्हती.
उदयननं अवंतिकाला आवाज दिला, "अवंतिका, आम्ही जाऊन येऊ का दहा मिनिटांत?" तिनं आतनंच होकार दिला.
जाताना उदयननं विचारलं, "पाऊस बराच होता. पण तुम्ही वाचलेले दिसताय?"
अर्जुनंन त्याला स्टोरी सांगितली. त्यांची कथा ऐकून उदयन खोखो हसला. "येवढ्या क्लोज होतात, मग फर्स्ट किस घेतला की नाही?" अर्जुननं लाजून नकारार्थी मान डोलावली.
"क्या यार, मौकेपे चौका लगावायचा ना. आणि चित्रांगदा तर तुझ्यावर फिदा आहे!"
अर्जुन यावर विचारात पडला. बोलता बोलता ते ट्रकपाशी पोहोचले होते.
उदयननं ट्रक चालू केला. पण निघण्यापूर्वी त्यानं ग्लोव्ह कंपार्टमेंट उघडले. त्यात शोधशोध करून एक पॅक काढला आणि अर्जुनाच्या हातात दिला. त्याला काही कळलं नाही.
"कॉन्डॉम्स आहेत. ठेव तुझ्या जवळ."
चटका दिल्यासारखा अर्जुन दचकला. "नको, नको! हे कशाला?"
उदयन शांतपणे म्हणाला, "भाई, हा इन्शुरन्स आहे."
"नाही पण याची गरज काय आहे? असं काही होणार नाहीये." अर्जुनचा आवाज चढला होता. त्यानं तडक तो पॅक समोर डॅशबोर्डवर टाकला.
"आय अंडरस्टॅन्ड. आय रिक्वेस्ट यू टू कीप इट विथ यू. नाही वापरला तर मला परत दे", उदयन मंद हसत म्हणाला.
त्यानं ट्रक मार्गी लावला. अर्जुनच्या रागाचा त्याला अंदाज आला.
"अर्जुन, हा प्रसंग तुझ्यासाठी नवा आहे. ही हवा वेगळी, ही जागा वेगळी. आज तू पहिल्यांदाच एका मुलीबरोबर एका टेंटमधे झोपणार आहेस. एकटा! ही ट्रीप तू आणि चित्रांगदानं मनापासून एन्जॉय करावी असं मला वाटतं. पण एन्जॉय म्हणजे काय ही तुमची डेफिनिशन असेल. ऑल आय से इज - रिलेशनशिप्स आर मोस्ट इंपॉर्टंट. त्यांना धक्का लागेल असं काहीही वागू नकोस, करू नकोस. ॲन्ड इफ धिस हेल्पस्, सो बी इट. आज पावसात तुझ्याकडे जर जॅकेट नसतं तर काय प्रसंग ओढावला असता? तसचं हे आहे. इट्स अ जॅकेट, इट इज ऑल्सो अ लाईफसेव्हर इफ युझ्ड राईट."
त्याच्या बोलण्याच्या टोनमुळे, त्यातल्या समजूतदारपणामुळे अर्जुन शांत झाला.
"आय नो यू बोथ आर व्हेरी सेन्सिबल पीपल. तुम्ही काहीही अयोग्य वागणार नाही याची मला खात्री आहे. पण जगात अपघात होत असतात, नाही का? तुम्ही चांगले ड्रायव्हर असाल तरी अथवा खराब असाल तरी. म्हणूनच आपण इन्शुरन्स काढतो ना? माणसाचंही तेच आहे रे. बी प्रिपेअर्ड."
समोर कॅम्पसाईट दिसायला लागली होती.
"थॅंक्स उदयन, सॉरी मी.... मला आता कळलंय तुला काय म्हणायचं आहे."
उदयन म्हणाला, "नो प्रॉब्लेम यार! जस्ट रिमेंबर, बेटर टु बी सेफ दॅन सॉरी... आणि, एन्जॉय..."
अर्जुननं तो पॅक उचलला.
---
टेंट उभा राहिला. तोपर्यंत अवंतिकानं बारबेक्यूची तयारी करुन ठेवली होती. अर्जुन कपडे बदलून आला तवर उदयननं फायरपिट मध्ये बरोबर आणलेलं फायरवूड रचलं. मग सगळ्यांनी मिळून त्याला आग लावली. त्यावर ग्रिल चढवला. हे होईपर्यंत समोरच्या डोंगरापलिकडे सूर्व्यादेव डुबला होता. त्या सूर्यास्ताच्या रंगांनी आकाश उजळून निघालं होतं. तळ्याच्या पाण्यात ते रंग परिवर्तित होत होते. हलकीशी धुंद त्या पाण्यावर पसरू लागली होती. राखाडी रंगाची झाडी आता निळाई पांघरून दाटून येणाऱ्या अंधाराची प्रतिक्षा करू लागली होती. अवंतिका, चित्रांगदा आणि अर्जुन या सगळ्या उद्योगात उदयनची मदत करत होते. हे सगळे सोपस्कार या तिघांनाही नवीनच होते. त्यात एक वेगळाच आनंद होता. शहराच्या सुखसोईंपासून दूर निसर्गाजवळ असूनही इतक्या साधनांमुळे सगळं कसं सोयीस्कर होतं याची गम्मत वाटते होती. हळूहळू सर्व सिद्धता झाली, आणि मंडळी हातात एखादं पेय घेऊन जरा सुखावली. पेटलेल्या लाकडांचा विविक्षित वास आसमंतात भरला होता. निश्चळ सृष्टीत तडतडणाऱ्या लाकडांचा आणि फरफरणाऱ्या ज्वाळांचा आवाजच काय तो येत होता.
ती शांतता भंग करत अवंतिका म्हणाली, "उदयन जानू, काय जागा दाखवलीस यार, बहार आली."
असं म्हणून तिनं त्याच्या गळ्याला मिठी मारली आणि एक कडकडीत चुंबन घेतलं. बघताबघता लोकांवर त्या माहौलचं जे गारूड झालं होतं, ते दूर झालं.
चित्रांगदा पण आपल्या जागेवरून उठली, आणि तिनं गाणंच चालू केलं "जुम्मा चुम्मा दे दे.."
पहिल्यांदा सगळे हसले, पण नंतर जॉइन झाले... अवंतिकानं लटका नखरा दाखवला आणि मग उदयननं तिला किस करून गाणं संपलं... आणि मग एकीकडे नाच-गाणी आणि दुसरीकडे बार्बेक्यू आयटम्स - फिश कट्स, प्रॉन्स, चिकन, बटाटे, मश्रूम्स, काही विचारू नका...
"जादू तेरी नजर...” उदयन गायला अवंतिकेसाठी
"सात समुंदर पार...” हे गाणं अवंतिका उदयनसाठी गायली.
मग चित्रांगदानं अर्जुनला "एक लडकीको देखा तो ऐसा लगा.." हे गायला लावलं!
चित्रांगदानं अवंतिकाला दिदी करून "दिदी तेरा देवर दिवाना" गायलं
मग उदयननं आणि अवंतिकानं "कागज कलम दवात दिला" गायलं.
आणि मग अवंतिकेनं आग्रहानं अर्जुन आणि चित्रांगदेला "पहला नशा, पहला खुमार.." हे गाणं गायला लावलं. ही गाणं, कथा त्या सगळ्यांचीच होती! त्यामुळे सगळेच मिळून धुंद होऊन गायले... त्याची खुमारी काही वेगळीच होती.
रात्र झाली होती. पोटं भरली होती. दिवसभराचे श्रम आता बोलू लागले होते. हळूहळू एकेक करत सगळे शेकोटी भोवती बसायला लागले. आकाशात शेकडो चांदण्या लुकलुकत होत्या. शेकोटीच्या प्रकाशाचं एक वलय त्यांच्याभोवती तयार झालं होतं. इतर आसमंत अंधारात बुडला होता. पुन्हा एक गहिरं वातावरण तयार झालं होतं. उदयन अवंतिकेला कवेत घेऊन बसला होता. चित्रांगदा अर्जुनाच्या शेजारी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन बसली होती.
शेकोटीची धग कमी होत होती. थंडी ताव धरत होती. अवंतिका शहारली आणि उदयनला म्हणाली, "जानू, लेट्स कॉल इट अ डे, व्हॉट अ लव्हली डे इट हॅज बीन.., गाईज, तुम्हीही झोपा आता" उदयन आणि अवंतिका उठू लागले तसं चित्रांगदा म्हणाली, "गुड नाईट, अवंतिका, उदयन, इट हॅज बीन ट्रूली अ ब्लेसेड डे, थॅन्क्स फॉर ऑल धिस. अर्जुन थोडावेळ बसू या नं आणखी? चालेल?" अर्जुन हो म्हणाला. उदयन म्हणाला, "अर्जुन, आणखी एक लॉग टाक फायरमध्ये. तुम्ही बसताय तर लागेल. गुड नाईट गाईज, स्लीप वेल."
अर्जुननं शेकोटीत एक लाकडाची ढलपी वाढवली. जरा हलवून डुलवून आग वाढवत असतानाच चित्रांगदा शेकोटीच्या जवळ सरकली, आणि आपले हाताचे तळवे शेकू लागली. शेकोटीचं काम आटपून अर्जुन तिच्या शेजारी येऊन बसला. त्याच्या मनात तीच जुनी धास्ती जागी झाली की आता काय होणार. तिनं आपले गरम झालेले तळवे त्याच्या गालांवर ठेवले.
त्याच्या मनातलं द्वंद्व शिगेला पोहोचलं. या निरागसतेचा मी काय अर्थ लावू? या कोमल, निर्मल भावनेला मी का अव्हेरू? कुठली तरी लेबलं लावून मलीन का करू? माझ्या मनाच्या कमकुवतपणामुळे या दैवी क्षणाला लाथाडू का? माझ्या डोळ्यांत गुंतलेल्या या डोळ्यांतल्या स्वप्नील स्निग्धतेला का नाकारू? हे गर्हणीय कृत्य करून मी या सुहृदाचा अपमान करू का? तिच्या या आपुलकीच्या, मायेच्या हातांना मी.. मी आपुलकी, माया, प्रेमानं, सच्च्या भावनेनं प्रतिसाद देऊ शकेन? सामाजिक रुढींनी, त्या बंधनांनी बरबटलेल्या या मनाला ही उदात्त उंची गाठता येईल का? या क्षणात मी स्वत्व विसरून विरघळून जाऊ शकेन? अर्जुनाच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं. आणि त्याला उत्तर त्या डोळ्यांच्या विमलज्योतींत मिळालं. कर कृती, दे प्रतिसाद, हाच तुझा धर्म आहे, तेच या क्षणाचं मर्म आहे.
क्षणाच्या विलंबाने अर्जुनानं तिचे हात हातात घेऊन त्यांचा अलगद मुका घेतला. तिनं त्याला गच्च मिठीत घेतला. तिच्या डोळ्यांत पाणी तरळले. अग्निसाक्ष, पंचमहाभूतांच्या साक्षीने दोन मनांचं मीलन होते होतं.
---
सकाळी आठ वाजल्यानंतर आळोखे पिळोखे देत अवंतिका टेंटबाहेर आली. खरं तर फ्रेश कॉफीच्या वासानंच तिला जाग आली होती. अर्जुनानं सकाळीच पुन्हा तो वन्ही चेतवला होता. बाजूच्या दगडावर एक शुभ्र पुलओव्हर घालून प्रसन्नचित्त चित्रांगदा कॉफीचे घुटके घेत होती. पूर्वेकडून येणारी कोवळी किरणं तिच्या केशकलापाला खुलवित होती. अर्जुन टेंटजवळ आवराआवरी करत होता. अवंतिकेला बघताच चित्रांगदा म्हणाली, "हेय, गुड मॉर्निंग अवंतिका! कॉफी?"
"गुड मॉर्निंग! गुड मॉर्निंग अर्जुन! अरे, तुम्ही लोकं झोपलात की नाही?! हा, हा... येस गरमागरम कॉफी इज व्हॉट द डॉक्टर ऑर्डर्ड..." आणि पहिला घुटका घेताच, "ओहोहो, हेवन!"
"अर्जुन, अरे नंतर आवर! कम, जॉईन अस फॉर कॉफी"
"येतोच"
"काय गं, कशी गेली रात्र?!" अवंतिकेचे डोळे चित्रांगदेला शब्दांच्या पलिकडले प्रश्न विचारीत होते.
चित्रांगदेनं तिच्या नजरेत नजर मिळवत उत्तर दिलं, "येस, काल रात्री वी ब्रोक थ्रू द बॅरिअर आणि चांगले मित्र झालो. सगळे संकेत, संकोच, आडपडदे दूर झाले. असं वाटलं की आम्ही चांगल्या मित्रांतून खऱ्या मैत्रीत पदार्पण केलं. डझ दॅट इव्हन मेक सेन्स?"
अवंतिकेची नजर शब्दांमागचा अर्थ चित्रांगदेच्या नजरेत शोधत होती. तिला उत्तर गवसलं आणि ती आनंदानं म्हणाली, "क्या बात है! येस ॲबसोल्यूटली मेक्स सेन्स! मला काय वाटतं सांगू? हे दोस्तीचं नातं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता बघा, आपण इथे येतो काय आणि या किमयागार वातावरणात आपली दोस्ती होते काय! इट्स अ डिव्हाइन प्रॉव्हिडन्स!"
काम संपवून शेजारी येऊन उभ्या राहिलेल्या अर्जुनाला कमरेत हात घालून तिनं जवळ ओढला. "एकदा तुम्ही खरे दोस्त झालात ना की मग नात्यांची इतर कुठलीही लेबलं लावा - बॉस, गुरू, बायको, काय वाटेल ते आणि बेफिकीर रहा. कुछ नहीं बिगडेगा.. हृदया हृदयी एक झाले अशी अवस्था पाहिजे, बस!"
चित्रांगदाही तिच्या जवळ आली होती. तिच्याही कमरेत तिनं हात गुंफले. "पण तो मौका आला पाहिजे, आणि साधताही आला पाहिजे, नै का? ग्रेट दॅट यू क्रॉस्ड द डिव्हाइड! आता जगण्याची मजा आणखी वाढते की नाही बघा! पॉसिबिलिटीज गॅलोर..."
चित्रांगदा, अवंतिका आणि अर्जुन असे तिघे एकमेकांना बिलगून समोरच्या नितळ पाण्यात उतरलेल्या सूर्यकिरणांचा जललहरींबरोबर चाललेला खेळ निःशब्दपणे पहात होते. नुकताच टेंटमधून बाहेर आलेला उदयन ते डोंगर, तो झाडांतून झिरपत असलेला सूर्यप्रकाश, ते विस्तीर्ण निळंहिरवं पाणी आणि काठावरचं हे मानवशिल्प या निसर्गानं रंगवलेल्या चित्राचं अनिमिष नेत्रांनी आकंठ रसपान करत होता.
(समाप्त)
छान जमले होते चारही भाग.
छान जमले होते चारही भाग.
खूपच आवडली कथा.
खूपच आवडली कथा.
सगळे भाग वाचले. छान झाली आहे
सगळे भाग वाचले. छान झाली आहे गोष्ट!
छान, अतिशय सुंदर शब्दात वर्णन
छान, अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे, कॅम्पिंग हा एक वेगळाच अनुभव असतो, ही कथा वाचताना माझ्या आठवणी पुन्हा डोळ्या समोर आल्या.
मैत्री कशी असावी हे कथेचं सार खूप छान उलगड आहे.
पूर्वार्ध वाचला, उलपी च लग्न दुसऱ्या कुणाशी झाल्याचा उल्लेख होता, उलपी, अवंतिका, चित्रांगदा ह्यांच्या तिन्ही जोड्या आनंदात राहोत
अर्जुन उलुपी चं जमलं होतं
अर्जुन उलुपी चं जमलं होतं बहुतेक.

(त्यामुळं मला या कथेतल्या पात्राचा (लेखक/कथेचा नव्हे) राग आला, but thats completely on me and my mental upbringing.)
कथा भारी जमलीय.
सायो, कंसराज, वावे, manya,
सायो, कंसराज, वावे, manya, mi_anu सगळ्यांना उत्साहवर्धक प्रतिसाद प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
mi_anu त्याच पूर्वपीठिकेत जो कॅम्पिंगचा उल्लेख आहे, तो कालमानपरत्वे अगोदर येतो. ती ही कथा आहे.
बघू या ही पात्रं काय काय गुल खिलवतात पुढे! पुनश्च एकवार सर्वांना धन्यवाद!
कालमानपरत्वे अगोदर > हो, ते
कालमानपरत्वे अगोदर > हो, ते लक्षात आलं होतं.
मस्त झाली कथा
मस्त झाली कथा
छान गोष्ट.
छान गोष्ट.

पण तुमच्या वरील चित्रातला अर्जुन अगदीच 'हा' वाटतो बुआ!! काहीतरी करा.....!!
फारच जबरदस्त लिहिलंय.
फारच जबरदस्त लिहिलंय.
निसर्गाचं वर्णन आणि भावनिक आंदोलनाचे वर्णन एकदम भारीच.
ते पहिल्या 2 भागातले निसर्ग फोटो मस्तच...
बघू या ही पात्रं काय काय गुल खिलवतात पुढे!>>>>>म्हणजे पुढे आणखी भाग लिहिणार आहात का?>>>>पु ले शु
पण तुमच्या वरील चित्रातला अर्जुन अगदीच 'हा' वाटतो बुआ!! काहीतरी करा.....!! >>>>>खरंच....
वा गोड गुलाबी कथा
वा गोड गुलाबी कथा नोव्हेंबर मध्ये अभिमन्यु पदार्पण करेल ना
वा गोड गुलाबी कथा नोव्हेंबर
वा गोड गुलाबी कथा नोव्हेंबर मध्ये अभिमन्यु पदार्पण करेल ना>>>>>> बभृवाहन ना?
बभृवाहन ना?>> शृतकर्मा,
बभृवाहन ना?>> शृतकर्मा, बब्रुवाहन अभिमन्यु आणि इरावन. काफी बिझी है मैत्री करनेमें अर्जुन सर.
(No subject)
खूप छान खुलवली आहे कथा! कथेचं
खूप छान खुलवली आहे कथा! कथेचं नाव असं का? वाचक वाढवण्या साठी का?
कथेचं नाव असं का? वाचक
कथेचं नाव असं का? वाचक वाढवण्या साठी का? >> हो???
त्यात एक शृंगारिक, दिलखेचक आवाहन आहेच. जर बघितलंत तर पूर्ण कथा त्या अंगानं मांडली (फुलवली?) आहे. कदाचित समागम या शब्दाचा जो सर्वसाधारण अर्थ आहे तो सार्थ ठरवणारा प्रसंग या कथेचा उत्कर्ष बिंदू असू शकतो. पण लेखक म्हणून मी तो प्रसंग घडला की नाही या विषयी संभ्रम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. (वरच्या अभिमन्यू/बब्रुवाहन उल्लेखानं तो म्हणावा तितका यशस्वी झाला नसावा असं वाटतंय
) पण येस, कथेच्या शीर्षकाने तेच घडले असावे असा ग्रह होणं साहजिक पण लेखकाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे.
गंमत सांगतो: पुण्यात सध्या निरंकारी संत समागम या कार्यक्रमाचे फलक लागले आहेत. कदाचित विश्वास बसणार नाही, पण मला स्वतःला अभिप्रेत असलेला या शब्दाचा अर्थ या फलकावर सापडला. मैत्री या संकल्पनेवर मी कथेच्या शेवटी जे मत मांडलेलं आहे ते या मैत्र (समागम) आणि त्यातून घडणारे उन्नयन याच अर्थाने आहे. इतकं विवेचन करायची गरज नव्हती खरं, पण सहज दृष्टिपथात आलेल्या फलकांतून एक चपखल शीर्षक सापडलं हे सांगावस वाटलं!
@Abhuva
@ Abhuva
पुढील भाग येवुद्यात.
मला तो यथा काष्ठम च काष्ठम च
मला तो यथा काष्ठम च काष्ठम च श्लोक आठवला, त्यात पण शेवटी समागम आहे.
काहीतरी गडबड वाटतेय
काहीतरी गडबड वाटतेय
हिंदी मध्ये समागम चा अर्थ gathering होतो, (जस निरंकारी संत समागम) , तर मराठी मध्ये हा शब्द मिलन(शारीरिक) ह्या अर्थाने वापरला जातो.
इथे लेखकाने मैत्री - मनाच मिलन असा वापरलेला दिसतो.
रात्री काय घडलं हे वाचकाने आप आपल्या विचार सरणी नुसार समजून घेण्याची मुभा लेखकाने दिली आहे
समागम संस्कृत मध्ये पण
समागम संस्कृत मध्ये पण इंटरऍक्शन या अर्थाने आहे बहुधा.
लेखक म्हणून मी तो प्रसंग घडला
लेखक म्हणून मी तो प्रसंग घडला की नाही या विषयी संभ्रम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे>>> तुमचा प्रयत्न यशस्वी झालाय की हो..
सर्व अर्जुन उलुपी
सर्व अर्जुन उलुपी चित्रांगदा सुभद्रा ह्यांना प्रेम दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. मैत्री अबाधित राहो.