Submitted by लंपन on 29 January, 2024 - 08:30

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बाजरी पीठ - दीड वाटी
गहू पीठ - अर्धी वाटी
ताजी मेथी - १ १/२ ते २ वाट्या
कोथींबीर - १/२ वाटी
दही ताजे (आंबट नको) - वरील पीठ मळण्यासाठी
आले मिरची पेस्ट - आवडीनुसार
धणे जिरे पूड - १ चमचा
काळीमिरी पूड - १/२ चमचा
ओवा - १ चमचा
तीळ - २ चमचे
गूळ पाणी - २ ते ३ चमचे
तूप - १ चमचा
हळद, हिंग
मीठ- चवीनुसार
क्रमवार पाककृती:
दही सोडून सर्व जिन्नस एका परातीत एकत्र करावेत. आता लागेल तसे दही घालून पीठ पराठ्या सारखे मळून घ्यावे. आता मळलेल्या पिठाचे ठेपल्याच्या साईजचे ढेबरे लाटावेत. एकदम पातळ लाटू नका. कडा फाटतात त्यामुळे एकसारखा आकार येण्यासाठी डब्याच्या झाकणाने कडा कापाव्यात. लाटलेले ढेबरे तवा गरम झाला की मंद आचेवर तूप लावून दोन्ही बाजूने भाजून घ्यावेत.
वाढणी/प्रमाण:
३ ते ४
अधिक टिपा:
पाणी अजिबात घालायचे नाही. दही जास्त आंबट नको, ताजे दही घ्यावे. मिरचीचे वाटण थोडे जास्त घातले तरी चालेल.
माहितीचा स्रोत:
धर्मिज किचन
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Ama धन्यवाद. हो हल्ली सिजनल
Ama धन्यवाद. हो हल्ली सिजनल रेसपी लोक टाकत असतात. सगळीकडे तेच असते मग. ढेबरी शद्ब ऐकला आहे चाबरी ढेबरी
आता होळीच्या वेळी गुजिया, थंडाई चे पेव येईल थोड्याच दिवसात..
Pages