Submitted by लंपन on 29 January, 2024 - 08:30

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बाजरी पीठ - दीड वाटी
गहू पीठ - अर्धी वाटी
ताजी मेथी - १ १/२ ते २ वाट्या
कोथींबीर - १/२ वाटी
दही ताजे (आंबट नको) - वरील पीठ मळण्यासाठी
आले मिरची पेस्ट - आवडीनुसार
धणे जिरे पूड - १ चमचा
काळीमिरी पूड - १/२ चमचा
ओवा - १ चमचा
तीळ - २ चमचे
गूळ पाणी - २ ते ३ चमचे
तूप - १ चमचा
हळद, हिंग
मीठ- चवीनुसार
क्रमवार पाककृती:
दही सोडून सर्व जिन्नस एका परातीत एकत्र करावेत. आता लागेल तसे दही घालून पीठ पराठ्या सारखे मळून घ्यावे. आता मळलेल्या पिठाचे ठेपल्याच्या साईजचे ढेबरे लाटावेत. एकदम पातळ लाटू नका. कडा फाटतात त्यामुळे एकसारखा आकार येण्यासाठी डब्याच्या झाकणाने कडा कापाव्यात. लाटलेले ढेबरे तवा गरम झाला की मंद आचेवर तूप लावून दोन्ही बाजूने भाजून घ्यावेत.
वाढणी/प्रमाण:
३ ते ४
अधिक टिपा:
पाणी अजिबात घालायचे नाही. दही जास्त आंबट नको, ताजे दही घ्यावे. मिरचीचे वाटण थोडे जास्त घातले तरी चालेल.
माहितीचा स्रोत:
धर्मिज किचन
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही दिसताहेत ढेबरे..तोंपासू
सही दिसताहेत ढेबरे..तोंपासू एकदम...
तुमच्या एकेक पाककृती करायच्या राहिल्यात माझ्या..
सोपा साधा चविष्ट पदार्थ.
सोपा साधा चविष्ट पदार्थ.
मस्त दिसताहेत! मेथी आणली की
मस्त दिसताहेत! मेथी आणली की करतो.
तुझ्या रेसीपीने पनीर घोटाला परवाच केलेली आणि छान झालेली. पोरांनी पण खाल्ली.
मस्त दिसतायत ढेबरा. इकडे
मस्त दिसतायत ढेबरा. इकडे फ्रोजन मिळतात ते ही खूप आवडतात.
छान पाककृती..
छान पाककृती..
आत्ताच केले, आणि मस्त झाले!
आत्ताच केले, आणि मस्त झाले!
बाजरीच्या ऐवजी ज्वारीचं पीठ आणि मेथीच्या ऐवजी कसुरी मेथी आणि भरपूर कोथिंबीर. आणि मिरची-कोथिंबीर-पुदिना-लिंबू-बारिक लसुण अशी फ्रीज मध्ये चटणी होती ती घातली.
पटकन चविष्ट आणि पोटभरीचं जेवण झालं. धन्यवाद!
बाजरी मेथी पुर्या करून
बाजरी मेथी पुर्या करून पाहिल्या होत्या पण तेलकट पेक्षा हा पर्याय बरा आहे. ठेपलाचं नवीन नाव आहे का हे ढेबरा?
मॉडीफाईड वर्जन आज करून बघणेत येईल
बाजरी पीठ नाहीये घरात म्हणून ज्वारीचे आणि मेथी ऐवजी पालक
ह्याच कृतीने पुऱ्या केल्या
ह्याच कृतीने पुऱ्या केल्या होत्या. जरा तेलकटचं होतात पण टिकतात जास्त दिवस. उरलेल्या पीठाचे आज ढेबरे.

पोपटी भात ,फोडणीचे ताक, टोमॅटो चटणी
वा वा खूपच छान मेनू आम्ही
वा वा खूपच छान मेनू आम्ही याला पावट्याच्या शेंगा असे म्हणतो.
याला ढेबरा म्हणतात हे माहीत
याला ढेबरा म्हणतात हे माहीत नव्हते.बाजरीचे पीठ संपवायला मेथी आणि बरेचसे वरचे साहित्य घालून थालीपीठ केले होते.एकदम मस्त लागते.
मस्त दिसते आहे.
मस्त दिसते आहे.
मस्त.
मस्त.
काल केले. एकदम मस्त झालेत
काल केले. एकदम मस्त झालेत चवीला. थँक्यू फॉर रेसिपी.
बाजरी पीठ नाहीये घरात म्हणून ज्वारीचे आणि मेथी ऐवजी पालक>>>>>> असे केले.
अजून थोडे जाड लाटले असते तर चालले असते पण पिकी ईटर्स ने जाडीवरून (ढेबर्यांच्या) काही बोलायला नको म्हणून मिडीयम केले. चव झक्कास आली !
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
मंजूताई, मेनू आवडला!
(ढेबर्यांच्या) >>
(ढेबर्यांच्या) >>
छान रेसिपी
छान रेसिपी
लोकहो खूप धन्यवाद. अमित,
लोकहो खूप धन्यवाद. अमित, धन्यवाद दोन्ही रेसिपी आवडल्या वाचून छान वाटले. पुढल्या वेळी बाजरी पीठ वापर. अंजली मस्त दिसत आहेत ढेबरे. तुम्ही पण पुढल्या वेळी नक्की बाजरी पीठ वापरून करा. नाव असे का माहीत नाही
ठेपला पातळ लाटतात, हा जरा जाडसर. मंजुताई मस्त ताट. मला पावटा भात आणि टो चटणी बास 
Mru, Srd, sparkle, सायो, अमुपरी, सस्मिता, देवकी, मनिम्याऊ, सुनिधी, स्वाती धन्यवाद.
ढेबरा फारच rough नाव आहे, बुश
ढेबरा फारच rough नाव आहे, बुश ने दो ढोकले गिरा दिये types.
पाकृ छान आहे
तुम्ही पण पुढल्या वेळी नक्की
तुम्ही पण पुढल्या वेळी नक्की बाजरी पीठ वापरून करा>>> येस्स.
मस्त दिसतायेत.
मस्त दिसतायेत.
दही आणि गुळ एकत्र वापरत नाही आमच्याकडे. असे ढेबरे मिक्स पिठाचे आई करायची, गुळ किंवा साखर नव्हती घालत, ताक घालायची थोडं. तसेच करायचा प्रयत्न करते मी.
नुसत्या बाजरीच्या पिठाचे करून बघेन. गूळ किंवा साखर नाही घालणार.
मंजुताई, अंजली मस्तच.
मी मेथी आणलीये. उद्या परवात
मी मेथी आणलीये. उद्या परवात करते हा जिन्नस.
किल्ली गुज्जू पदार्थांची
किल्ली
गुज्जू पदार्थांची नावं अशीच जड असतात ढोकळा, ठेपला, ढेबरा, खाक्रा, उंधियु, ढोकली
अंजू ताई, सामो धन्यवाद.
लंपन,काल आणि आज दिवस
लंपन,काल आणि आज दिवस नाश्त्यासाठी ज्वारीचे ढेबरे बनवले.मला लाटता ना आल्याने थापले.छान झाले.
सॉरी उशीरा कळवतेय.फोटो नंतर टाकेन.
ढेबरे, ठेपले दोन्ही फरक आणि
ढेबरे, ठेपले दोन्ही फरक आणि नावं आईमुळे व्यवस्थित माहिती कारण ती बडोद्याची होती.
सुंदर
सुंदर
आज ढेबरे केले. पण बाजरीचे पीठ
आज ढेबरे केले. पण बाजरीचे पीठ न मिळाल्याने, बेडगी पुरीचे पीठ वापरले.
मला वाटतं मामी गूळ घालत नसे आणि अगदी याच पदार्थाला , ती धपाटे म्हणत असे बहुतेक.
छान पाकृ आणि रेसिपी फोटो.
छान पाकृ आणि रेसिपी फोटो. मंजुताई, अंजली छान दिसतायत ताटं.
देवकी, कुंद, वर्णिता , सामो
देवकी, कुंद, वर्णिता , सामो खूप धन्यवाद. अंजुताई बरोबर. सामो धपाटे थाप्तात, हे आपल्याला लाटायच आहे. आणि धपाट्याला बरीच पीठ घेतात. देवकी गहू पीठ लाटता यावे म्हणून ऍड करायचं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
होय होय नंतर मलाही वाटलेले की
होय होय नंतर मलाही वाटलेले की धपाटे थापतात/धपाटतात
मामी थापायची.
लंपु परवा शेफ अजय चोप्राने
लंपु परवा शेफ अजय चोप्राने एक्क्षा ट सेम टु सेम रेसीपीचा व्हिडीओ टाकला आहे.
ढेबरा/ ढेबरी जराशी जाड व्यक्ती ह्या अर्थाने पण वापरतात. आमच्या कामाच्या मावशी मूळ गाव भालकी. समव्हेअर डाउन इन मराठ वाडा त्या कधी कधी कोणाला ढेबरी म्हणत.
मेथी बाजरी तीळ वाल्या रेसीपी अचानक खूप दिसत आहेत इन्स्टावर सुद्धा.
Pages