- बिछडे सभी बारी बारी- पंडिता प्रभा अत्रे

Submitted by रेव्यु on 13 January, 2024 - 12:21

अत्यत सृजनशील आणि सुरेल गायकी आज पोरकी झाली आहे.
आजे विदुषी प्रभा अत्रे यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन.
माझी पिढी प्रभाजींच्या जागू मै सारी रैना ने अभिजात मारु बिहाग ऐकत वाढली .हा आज देखील लॅंडमार्क समजला जातो.
सदा स्मित हास्य आणि विवेकी बोलणे, अभ्यासपूर्ण शैली आणि उत्साहाने भरलेल्या प्रभाजींनी अनेक मैफिली गाजवल्या.
त्यांची अनुपस्थिती जाणवेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावपूर्ण श्रद्धांजली.

कौन गली गयो श्याम...
कधीही कोणत्याही वेळी ऐकायला सुरू केलं तरी मधुरच वाटतं.

साधारण १९८५च्या आसपास प्रभा अत्रेंचं गाणं कल्याणला सुभेदार वाड्यात गणेशोत्सवामध्ये ऐकलं होतं. फार छान कार्यक्रम झाला होता. तेव्हा १० पर्यंत कार्यक्रम संपवण्याची मर्यादा नव्हती. त्यामुळे खूप उशिरापर्यंत गाणं रंगलं होतं. 'सावरे ऐजय्यो' तिथे पहिल्यांदा ऐकलं होतं.

नंतर कॉलेजमध्ये असताना एकदा चर्चगेट परिसरातून चालत जात होते. मी फुटपाथवर होते आणि शेजारच्या भुयारी मार्गाच्या पायऱ्या चढून प्रभा अत्रे आल्या. त्या कोण आहेत, हे कळायच्या आधीच मी त्यांच्याकडे बघून हसले. त्याही हसल्या. पुढे गेल्यावर डोक्यात प्रकाश पडला!! अर्थात मी त्यांच्याशी काही बोलायची हिंमत केली असती, असं वाटत नाही.

मला आणि अनेकांना शास्त्रीय संगीत ऐकायची गोडी लावणाऱ्या मोठ्या कलाकार गेल्या. श्रद्धांजली