महाराष्ट्रात खरोखर न्याय झाला का ?

Submitted by ashokkabade67@g... on 11 January, 2024 - 11:18

आमदार अपात्रतेचा चेंडु उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षाकडे टोलावला कारण घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून पण आधीच चार पक्ष फिरत शेवटी भाजपवासी झालेल्या नार्वेकरांनी बराच काळ तारीख पे तारीख देत सुनावणी लांबवत ठेवली सरते शेवटी न्यायालयाने तंबी देत निकालासाठी कालमर्यादा ठरवून दिल्यावर केवळ नाईलाजाने सुनावणी करणे अपरीहार्य झाल्याने सुनावणी सुरु केली ऐथेच निकाल काय लागणार हे जनतेला कळले त्यातच न्यायदानाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीने आरोपी वा फीर्यादीला भेटु नये हा महत्त्वाचा संकेत पायदळी तुडवत यांनी आरोपीसोबत बैठक घेत वजहापानाचा आस्वाद घेत संशयास्पद स्थिती निर्माण केली तेंव्हाच जनतेच्या मनात निकालाबाबत संशय निर्माण झाला आता एकदाचा निकिल देत त्यांनी शिवसेना शिंदेगटाला बहाल केली त्यावर ठाकरे गट फरत उच्च न्यायालयात जाईलही कदाचित निकालही वेगळा असेल पण तोपावेतो निवडणूक लागेल.आणि भाजपला जे साध्य करायचे ते साध्य करता येईल .
त्यामुळेच खरोखर न्याय झाला का हा प्रश्न जनतेच्या मनात येणे सहाजिकच आहे ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काश्मीर प्रश्न भारताने युनोत नेला होता त्याची आठवण झाली हा सगळा प्रकार बघून. उठांकडे कंट्रोल असताना ज्या स्टेप्स घ्यायला हव्या होत्या त्या घेतल्या नाहीत. नंतर सुद्धा बंडखोरांचे परतीचे दोर लगेच कापून टाकले. सगळा कंट्रोल दुसर्‍या पार्टीज कडे जाउ दिला आणि मग तेथे त्यांनी इन्फ्लुएन्स वापरून निर्णय स्वतःच्या सोयीचे करून घेतले. युद्धात जिंकले आणि तहात हरले टाइप.

एकतर आमदारांत असंतोष आहे याचा पत्ता लागला नाही किंवा गाफील राहिले. नंतर गौहत्ती नाट्य सुरू असताना सुद्धा ४-५ दिवस नक्की हातात होते. तेव्हा "सेनागिरी" करून ते ही व्हायचे चान्सेस घालवले.

उठांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाल चांगला होता. अजूनही त्यांच्याबद्दल वैयक्तिक आदर आहे. पण हे असले धंदेही करायची गरज असते राजकारणात.

उठांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाल चांगला होता>>> हो अगदी अगदी! वर्ल्ड मधले बेस्ट (वर्किन्ग फ्रॉम होम) सीएम.

वर्ल्ड मधले बेस्ट (वर्किन्ग फ्रॉम होम) सीएम. >>> मी अगदी सिरीयसली लिहीले आहे Happy कोव्हिडकाळात महाराष्ट्रातील व्यवस्था आपल्याकडे जितके रिसोर्सेस आहेत त्यामानाने चांगली होती. त्याबद्दल त्या काळात अनेक लोकांकडून वाचले/ऐकले आहे आणि ते सगळे सेना समर्थक नव्हते.

इव्हन कोव्हिड हॅण्डलिंग सोडून विचार केला तरी तसेच म्हणेन.

Biggrin
वाजे जिलेटीनच्या कांड्या केतकी चितळे मनसुख हिरेन सुशांत सिंग राजपूत दिशा सलीयन.
अर्णब गोस्वामीला अन्वय नाईक आत्महत्या साठी अटक.नाईक यांच्या जमिनी ठाकरेंच्या नावावर सापडणे. संजय राऊत विश्वप्रवक्तेची अनसेन्सॉर्ड भाषा. अनंत करमुसे प्रकरण. सोशल मीडिया पोस्टवरून अटक किंवा मारहाण केली गेल्याच्या असंख्य केसेस. अंबानी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार पेशंट मुख्यमंत्री.
सुवर्णकाळच की हो तो महाराष्ट्र राज्याचा.

अशी प्रकरणे प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या कार्यकालात सापडतील. मला फडणवीसांची पाच वर्षेही ओव्हरऑल चांगलीच वाटली होती. त्यातही त्यांचे विरोधक अशी प्रकरणे शोधून काढतील.

बाय द वे, तुम्ही जे क्रायटेरिया लावले आहेत ते सध्याच्या केंद्रसरकारबद्दल लावून बघा Happy

बिल्किसबानू खटल्यात न्यायालयाने मोदी आणि भाजपसह गुजरात न्यायालयाचे जे वाभाडे काढले त्याबाबतही कुणी बोलाकी राजेहो ,दोन दलित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या बँक खात्यात पुरेसे हजार रुपयांचा ही नाही अशाशेतकऱ्यांची चारचार एकर जमीन भाजपतील वजनदार नेत्याला हवी म्हणून त्या शेतकऱ्यांवर ईडीची धाड पडते त्याबाबतही काही बोलाकी राव .

केतकी चितळे अनंत करमुसे अर्णब गोस्वामी सचिन वाजे या categoryचीi उदाहरणे फडणवीस किंवा मोदी सरकार मध्ये आहेत,?
याच फोरमवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मोदी, भाजप आणि ब्राम्हण समाज यांच्याबद्दल लिहिणारे लोक १० वर्षात अधिकाधिक cheap होत गेलेत. त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलं गेलंय.

फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. बिल्किसच्या गुन्हेगारांना सन्मानाने सोडून द्यायची पॉवर त्यांच्याकडे आहे. हेही होऊन जाऊ दे.

महाराष्ट्रात खरोखर न्याय झाला का ? >>> शीर्षकात खरोखर न्याय म्हटलेय. प्रतिसादात उत्तर नाही असेच अपेक्षित असावे.
तसे ते येईल का ? हो आणि नाही असे कोणत्याही कारणाशिवाय उत्तर देणारे दोन गट असताना !
जे दोन्ही गटात नाहीत त्यांना दर दोन चार महिन्यांनी मागच्या सुनावणीला काय झाले होते, नेमका घटनाक्रम काय होता, शिवसेनेची घटना काय होती ?ते पक्षाच्या नोंदणीच्या अटीत बसते का या सर्वांची उजळणी करायला वेळ नाही. सेमिस्टर संपली कि त्या सेमिस्टरचं काही आठवत नाही. पुढच्या सेमिस्टरचा अभ्यास सुरू होतो.

अशात या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर कसे मिळणार ?

फडणवीस ह्यांना मामु बनवले ह्याची खदखद अजून निघतेय.
कोविड काळात आणि एकंदरीत उठा ह्यांनी चांगली कामगिरी केली. राजकारणात मात्र तर कमी पडले हे खरं आहे. पण अस्तानीत असलेले साप त्यांना समजले नाहीत हे खरं. असंतोष वगैरे ह्या नंतर सुचलेल्या बाता आहेत. जे काँग्रेस सोबत जाणे रुचले नव्हते तर शिंदे आणि बाकीच्यानी सत्तेत सहभागी व्हायला नको होते. खोके आणि सत्ता ह्यांनी मती भ्रष्ट झाली

केतकी चितळे अनंत करमुसे अर्णब गोस्वामी सचिन वाजे या categoryचीi उदाहरणे फडणवीस किंवा मोदी सरकार मध्ये आहेत,?## वेगळा धागा काढा, ढीगभर येतील

आणि स्वतःची ओळख उघड करून लिहा हिंमत असेल तर

New Delhi: The Supreme Court on Wednesday came down heavily upon the Gujarat police for arrest and the police remand of a businessman, even after it had granted him anticipatory bail, saying it was the “grossest of contempt” and “sheer abuse of power”.

ADVERTISEMENT

गुजरात मध्ये भारतीय कायदे लागू नाहीत काय असे कॉमेंट सर्वोच्च न्याालयाने केली आहे

महाराष्ट्रात खरोखर न्याय झाला का ?

खरा न्याय अजुन बाकी आहे.

सुशांत सिंग आणी दिशा सालियान, पालघर मध्ये मारलेले दोन साधु, असे अनेक लोक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

सुशांत सिंग आणि दिशा Lol

दोन साधू Lol त्यांना काय ठाकरेंनी जाऊन मारले? मग अखलाखला मोशानी मारले का?

शहाजीना केंद्रीय पर्यटन मंत्री केले पाहिजे. एकटे मोदीजी किती प्रोमोशन करणार. बापु बटर वर्णन पण करु शकतात

भाजपनेच नव्हे तर माननीय पंतप्रधान मोदींनी स्वता ज्यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच फडणवीस प्रणीत भाजप सरकारमधे उपमुख्यमंत्री आहेत यापेक्षा मोठा भ्रष्टाचार कुठला असु शकतो याचे उत्तर ज्यांना केतकी ,वाजे ,सुशांतसिंग आठवतो त्यांनी द्यायला हरकत नाही तसे शैतकरी आत्महत्येविषयी कधीही ब्र न काढणाऱ्या फडणवीस सह साऱ्या भाजप नेत्यांनी रस्त्यावर गळा काढल्याने केंद्रीय सरकारने सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी की ली होती पण हाती काही लागले नाही म्हणून भाजप नाही ते गप्प बसले आणि फोडाफोडीचे राजकारण करत सत्तेत आले तेही त्यांनीच ज्यांना भ्रष्ट ठरवले त्यांच्यासोबत भाजपने आता एक नवा नारा द्यावा कीतीही भ्रष्टाचार करा आणि भाजपत या तुम्ही पवित्र व्हाल व मानसन्मानासह तुम्हाला पावित्र्याचे प्रमाणपत्र भाजप देईल असा।

श्री मोदींजींच्या हस्ते
ईंदीरा/ राजीव/ राहुल गांधी / नेहरु नव्हे
अटल सेतुचे आज उद्घाटन !!

केतकी चितळे अनंत करमुसे अर्णब गोस्वामी सचिन वाजे या categoryचीi उदाहरणे फडणवीस किंवा मोदी सरकार मध्ये आहेत,? >>>

विरोधातील लोक भरपूर देतील. त्यांच्या लक्षात बरोबर असतील तुमच्या नसली तरी. नाहीतर बिल्किस बानो केस, ब्रिजभूषण यांची उदाहरणे आहेत.

मुद्दा आहे की असले क्रायटेरिया वापरून जर तुम्ही एक सरकार वाईट ठरवणार असाल, तर ते दुसर्‍या एखाद्या अगदी तुमच्या फेवरिट सरकारलाही तितकेच सहज लागू होईल.

तितकेच सहज लागू होत नाही. अन्यथा इथले कायम मोदी भाजप ब्राम्हण विरोधात सर्व पातळ्या सोडून विकृत लिहिणारे चार प्रमुख आयडी आज जेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये असते हो. केतकी चितळे अर्णब गोस्वामी अथवा अनंत करमुसेसारखा प्रकार नाही झालेला त्यांच्याबरोबर. केवळ सोशल मीडियावर विरोधात काहीतरी लिहिलं किंवा शेअर केलं म्हणून महाराष्ट्रात अटक करून अनेक महिने जेलमध्ये ठेवणं, मारहाण होणं हे रुटीन झालं होतं मविआच्या काळात. तसं शिंदे सरकारच्या काळात अजिबातच नाहीये.

अनेक 'आत्महत्या' समोर येणं, प्रत्येक अशा प्रसंगी वाजे तिथे असणं - असा वेबसिरीज लेव्हलचा क्रिमिनल कंटेंट पण नाहीये आता.

सुशांत ने आत्महत्याच केली आहे हे आता बहुतेक सर्व सेन्सिबल माणसांनी मान्य केले आहे. ( यू ट्यूब वरच्या पाल्हाळीक लोकांचे विकृत भक्त वगळता) . दिशा सालियन च्या आईबाबांनी तर अक्षरशः हात जोडले आहेत की आमच्या मुलीच्या आत्महत्येच्या दु:खाच्या जखमेवर मीठ चोळू नका म्हणून. पण गिधाडांना चोची मारण्यावाचून चैन पडत नाही.

कर्नाटकात प्रस्तावित कायद्याविरोधात लिहीले म्हणून शाळकरी पोरांवर देशद्रोहाचे चार्जेस लावले होते. ते कोर्टाने रद्द केले. केतकी चितळेपेक्षा काय वेगळे आहे?
https://indianexpress.com/article/cities/bangalore/karnataka-hc-sets-asi...

मी मोदीविरोधक नसून मला सहज सापडतात. इतर तर भरपूर लिन्का आणतील Happy

व्याख्या बदलल्या आहेत.
दडपशाही सुरू आहे याची काही पुराव्यानिशी उदाहरणे दिली आणि लगेच चार लोकांनी अशाच परिस्थितीत इतरत्र इतर कोणावर दडपशाही झाली नाही असे दाखवून दिले तर दडपशाही नाहीच असा अर्थ होतो.

विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पर्यन्त आत टाकल्या जात नाही तो पर्यंत दडपशाही आहे असे म्हणता येणार नाही.

संपली नाही व्याख्या:
जर हे तुमच्या आवडत्या पक्षाचे सरकार नसलेल्या ठिकाणी होत असेल तर मात्र जुनी व्याख्याच लागु होते.

केतकी चितळेच्या पराक्रमांची लिस्ट मोठी आहे.>>
-६ डिसेंबर ला फूकट रेल्वे वापरतात असा तीने आंबेडकरी जनतेचा अपमान केला होता.
-मराठी भाषेचा अपमान करून समस्त मराठीजन आणी महाराष्ट्राचा अपमान केला होता.
- पवारांवर विकृत पातळीची कविता शेअर केली होती.

कर्नाटकमधील घटना अनेक वेळा मायबोलीवर उदाहरण म्हणून दिली जाते. पण तेही सोशल मीडियावर पोस्ट केली किंवा दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून अरेस्ट आणि/किंवा मारहाण या category मध्ये येत नाही. तशा घटना मविआ सरकारच्या काळात सतत होत होत्या व मायबोलीवर मविआ समर्थक तशा धमक्याही सातत्याने देत होते.
मनसुख हिरेनची पण आधी आत्महत्याच सांगितली होती वाजेनी.

https://www.newsclick.in/5-years-FB-post-modi-UP-man-arrested-charged-se...
यात यादी आहे.

https://www.news18.com/politics/maha-man-held-for-objectionable-social-m...

https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-live-updates-bmc-...

https://www.indiatoday.in/india/story/assam-lecturer-held-derogatory-pos...

किरिट सोमैंयांची बातमी देणाऱ्या लोकशाही चऍनएलवर एक महिन्याची बंदी.

एल्गार परिषद प्रकरणी अनेक जण केस चालवल्या शिवाय तुरु़ंगात आहेत.