विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय

Submitted by स्वरुपसुमित on 10 January, 2024 - 09:23

Breaking News
एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्या बाबत निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदें गट तसेच उद्धव ठाकरे गट अश्या दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र ठरले.
आता सरकार बदलणार नाही त्यामुळ राज्यसेवा/Combine/सरळसेवा भरतीसाठी जे प्रयत्न करणे सुरु आहे ते करत रहावे

टिप :- या निकाला बाबत कोणीही आपापसांत वाद घालु नका कारण हे राजकारणी कोणाचेच नसतात त्यामुळे आपल्याला अगोदर आपली हक्काची नोकरी मिळवणे महत्वाचे आहे**.**.

https://www.reddit.com/r/mipa/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सेना ठाकरे न चीच आहे हे सर्वांना माहीत आहे,राहुल नार्वेकर ला पण माहीत आहे.
तरी स्व स्वार्थ आणि दबावात न्याय बुध्दी ला तिलांजली देवून न्यायाची कठोर चेष्टा नार्वेकर ह्यांनी केली आहे.

खऱ्या ची दुनिया नाही आता

चेष्टा आहे का काय हे सुप्रीम कोर्टात ठरेलच. किंवा लवकरच मतपेटीतून कळेल.

ते तर कळेल च पण निर्लज्ज राजकारणी लोकांना तरी सुद्धा आपण कशी कायद्याची न्यायाची मस्करी केली ह्याची लाज वाटणार नाही.
निर्लज्ज पने तेव्हा पण सारवसारव करतील

या निर्णयाने शिवसेनेतली घराणेशाही आणि एकाधिकारशाही संपली - इति एकनाथ शिंदे.

बाळ ठाकरे सेनाप्रमुख होते, तेव्हाही शिवसेनेत एकाधिकारशाही होतीच. उलट आतापेक्षा कितीतरी जास्त आणि उघड उघड होती. त्यांनीच उद्धव ठाकरेंची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली. २०१० मध्ये आदित्य ठाकरेंची युवासेना म्हणून निवड केली गेली. तेव्हा घराणेशाही नव्हती?

आणि शिंदेंचा मुलगा खासदार आहे. ती घराणेशाही नाही?

फिल्मस्टारच्या मुलाने फिल्मस्टार होऊ नये का ? राजकारण्यांच्या मुलांनी राजकारणात येऊ नये का ?
अलिकडचा टाहो.

आमदारांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊ नये म्हणून व्हिप आणि अपात्रतेचा धाक दाखवणे अयोग्य. - राहुल नार्वेकर

अध्यक्ष महोदय, ईडी, सीबीआय, आय टी यांचा धाक दाखवलेला चालेल ना?

आयटी सेल काहीतरी फालतू पॉइंट काढते ते भक्तना पाठवले जातात भक्त काहीच विचार न करता ते मुद्दे घेवून समाज माध्यमात येतात आणि स्वतःचे हसे करून घेतात.
पण किती ही लोक आपल्या बुद्धीवर हसले तरी निर्लज्ज पना सोडायचा नाही ह्याचे ट्रेनिंग ह्यांना दिलेले असते.
सत्ता असेल तर च घराणेशाही निर्माण होते.bjp कडे आता दहा वर्ष च झाली सलग सता आली आहे ती पण बाबरी मशिदीच्या कृपेने..
ह्या दहा वर्षात च गुजरात लॉबी नी पूर्ण केंद्र सरकार वर नियंत्रण निर्माण केले आहे.
सत्ता अशीच राहिली तर घराणे शाही तिथे पण निर्माण होणारच आहे.
मोदी आणि अमित शाह bjp वर ची सत्ता कधीच सोडणार नाहीत.

थोडक्यात ज्याच्या कडे सत्ता असते ,संपत्ती असते तिथे वारसा साठी धडपड चालू असते.
रस्त्यावरील भिकाऱ्या च्या घरात घराणे शाही निर्माण होत नाही.
Bjp ची अवस्था काल पर्यंत रस्त्यावरील भिकार्या सारखी च होती .
देशातील जनता त्यांना हिशोबत च धरत नव्हती

काँग्रेस चे वर्चस्व भारतावर स्वतंत्र पूर्व काळापासून आहे काँग्रेस चा भारतीय लोकांवर प्रभाव स्वतंत्र पूर्व काळापासून आहे.

निकाल लागल्यानंतर एकच मीम खूप आवडलं.

बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून गीता वाचून घेतली त्यानंतर थेट आज...

बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून गीता वाचून घेतली त्यानंतर थेट आज...

मोजक्याच शब्दात योग्य वर्णन केले आहे.
पण इथे ज्ञानेश्वर नी नाही रावणाने

राज्याशी गद्धारी करणाऱ्या लोकांचे फोटो त्यांची मुल पुढे घरात पण लावणार नाहीत.
जे असतील ते नदीत विसर्जन करतील

रेडा नाही गाढवाच्या तोंडून गीता बोलून दाखवली हे लिहून पण चालणार नाही.
गाढव पण स्वाभिमानी असतात त्यांची स्वतःची मतं असतात.

मग कोणता प्राणी गीता बोलण्यासाठी नेमावा?