Submitted by स्वरुपसुमित on 6 January, 2024 - 03:51
२०१९ मधेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून उमेदवार आयात केले ,तरी फक्त १०५ झाले
आता निम्म्या शिवसेना ला तोडले
तरी पण मग राष्ट्रवादी तोडायची गरज भासली
जे मुळात भाजप मध्ये होते ते २०१४ पासूनचे बहुतेक लोक गायब झालेत
का भाजप मुळात हिमती वर लढू नाही शकत ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सहकारी संस्था आणि त्यास
सहकारी संस्था आणि त्यास जोडलेले सभासद हा उर्वरित महाराष्ट्राचा पाया आहे. त्यात पूर्वीपासून कॉंन्ग्रेस घट्ट पाय रोवून आहे. भाजपा त्यात नव्हतीच. राष्ट्रवादी ही एक फुटलेल्या कॉंन्ग्रेसचाच एक अवतार आहे. ती जोडून भाजपने आइपीएल टीम बनवली.
मराठी जनते मध्ये धार्मिक
मराठी जनते मध्ये धार्मिक उन्माद यूपी,बिहार पेक्षा खुप कमी आहे.
अनेक संत,महापुरुष ह्या मातीत जन्माला आले आणि त्यांचा लोकांवर प्रभाव आहे.
जात,धर्म ह्या वर मराठी लोक मत देत नाहीत.
यूपी,बिहार ही दोन्ही राज्य फक्त आणि फक्त .
जात आणि धर्म बघून मतदान करतात.
Bjp च जीवच धार्मिक उन्माद मध्ये आहे.
त्या मुळे bjp कधीच महाराष्ट्र आणि दक्षिण भारत ह्या क्षेत्रात स्वतःच्या हिमती वर कधीच बहुमतात निवडून येणार नाही.
उत्तर भारतात हा अडाणी लोकांचा भाग आहे .तिथेच फक्त bjp ची जादू चालणार
सहकारी संस्था आणि त्यास
सहकारी संस्था आणि त्यास जोडलेले सभासद हा उर्वरित महाराष्ट्राचा पाया आहे. त्यात पूर्वीपासून कॉंन्ग्रेस घट्ट पाय रोवून आहे. >>>>>>>
महाराष्ट्रातील काँग्रेसचा हा इतिहास झाला की
त्यामुळेच भाजप आणि सेनेला स्वतःचा मतदार घडवायला वेळ लागला .
गांधी घराण्याच्या राक्षशी महत्वकांक्षे मुळे महाराष्ट्रातून काँग्रेस मरणपंथाला लागली
महाराष्ट्रातील जनतेला पूर्वी भक्कम पर्याय नव्हते , नंतर काँग्रेस मधून फुटलेल्या नेत्यांनी काँग्रेसचा गळा घोटून जनतेला पर्याय दिला तशीच परिस्थिती शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत देखील झाली .
भाजपचा उदय झाला पण एक हाती
भाजपचा उदय झाला पण एक हाती सत्ता मिळवू शकली नाही हे मात्र कटू सत्य आहे .
ग्रामीण अर्थ व्यवस्था फक्त
ग्रामीण अर्थ व्यवस्था फक्त काँग्रेस मुळेच भक्कम झाली होती.
काँग्रेस चा हा पाया धर्म जात ह्या वर अवलंबून नाही.
त्या मुळे महाराष्ट्र मध्ये काँग्रेस( राष्ट्रवादी) हे दोन्ही पक्ष ग्रामीण अर्थ व्यवस्था शी सबंधित आहेत.
Bjp असू किंवा सेना किंवा मनसे ह्यांच्या नेतयर महाराष्ट्र ची ग्रामीण अर्थ व्यवस्था विषयी एक रुपयाचा ज्ञान नाही
उत्तर भारतात हा अडाणी लोकांचा
उत्तर भारतात हा अडाणी लोकांचा भाग आहे .
Submitted by Hemant 333 on 7 January, 2024 - 20:42
उचलली जीभ लावली टाळ्याला. अहो सर, काहीही काय लिहिताय.
उमेदवाराचे चारीत्र,लोकांचे
उमेदवाराचे चारीत्र,लोकांचे काम करतो की नाही, गुंड तर नाही ना .
ह्याला कमी महत्व देवून फक्त जातीय आणि धार्मिक उन्माद ल बळी पडून स्व जातीय ,धर्मीय गुंड पण व्यक्ती ला निवडून देण्याचे प्रकार उत्तर भारतात चालतात.
म्हणून "अडाणी,: हा शब्द वापरला आहे.
दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्र मध्ये असे प्रकार चालत नाहीत
महाराष्ट्र हा पुरोगामी
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. तिथे भाजप सारखे अधोगामी/ चातुरवर्णव्यवस्था समर्थक कार्यकर्ते असलेले, मनूवाटी प्रवृत्तीचे संघी थेरडे खच्चून भरलेत तीथे भाजप स्वबळावर सत्तेत येणार नाही, येऊही नये. हे थेरडे गचकतील पण महाराष्ट्राची वाट लावून.
उमेदवाराचे चारीत्र,लोकांचे
उमेदवाराचे चारीत्र,लोकांचे काम करतो की नाही, गुंड तर नाही ना .
ह्याला कमी महत्व देवून फक्त जातीय आणि धार्मिक उन्माद ल बळी पडून स्व जातीय ,धर्मीय गुंड पण व्यक्ती ला निवडून देण्याचे प्रकार उत्तर भारतात चालतात.
म्हणून "अडाणी,: हा शब्द वापरला आहे.
दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्र मध्ये असे प्रकार चालत नाहीत
Submitted by Hemant 333 on 8 January, 2024 - 16:08
पुन्हा एकदा काहीपण
अहो, दक्षिणेत तर अशी जातीच्या आधारावर आणि गुंड लोकांना निवडून देण्याची उदाहरणे आहेत पण दूर कशाला जाता, त्यासाठी येवा आमच्या कोकणात, नाव लिहीत नाही पण सगळ्यांना माहिती आहेत कोण कसे आहेत.
जातीच्या आधारावर म्हणाल तर वऱ्हाडात बघा, दिग्रस मध्ये संजय राठोड आहेत, बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून तिकीट दिले जाते.
2004 ते 2023 या काळात महाराष्ट्रातून निवडून आलेल्या आमदार आणि खासदार पैकी 715 लोकांवर गुन्हेगारी केसेस आहेत तर 422 लोकांवर गंभीर गुन्हे नोंदविलेले आहेत.
अजूनही बरीच माहिती लिहिता येईल पण ती राहूदे. त्यामुळे मध्या भारतात आणि दक्षिणेत सगळ आलेबेल आहे ह्या गैरसमजातून बाहेर या.
उडदात काळे, गोरे ठरवत आहे
उडदात काळे, गोरे ठरवत आहे आपण .
तुलना केली तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात स्थिती उत्तम च आहे
उडदात काळे, गोरे ठरवत आहे आपण
उडदात काळे, गोरे ठरवत आहे आपण .
तुलना केली तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात स्थिती उत्तम च आहे >>> अहो एक ठरवा, कोणत्या विषयात तुलना करायची आहे ते. मतदार आणि राजकीय बाबतीत की आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत.
आणि बर का जर उत्तर भारत मागास असेल तर अजून का तसा आहे ह्याचा विचार करा, ते मागास आहेत तर त्यांना वाळीत न टाकता ते ही प्रगत कसे होतील हा विचार करा.
भारतातील सगळीच राज्ये प्रगत झाली तरच भारताची प्रगती होईल ना?
Submitted by स्वरुपसुमित on 6
Submitted by स्वरुपसुमित on 6 January, 2024 - 14:21
२०१९ मधेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून उमेदवार आयात केले ,तरी फक्त १०५ झाले
आता निम्म्या शिवसेना ला तोडले
तरी पण मग राष्ट्रवादी तोडायची गरज भासली
जे मुळात भाजप मध्ये होते ते २०१४ पासूनचे बहुतेक लोक गायब झालेत
का भाजप मुळात हिमती वर लढू नाही शकत ?
>>>>>>
माझ्या मतानुसार तरी सरळ उत्तर आहे की महाराष्ट्रात भाजपाचा म्हणावा तेवढा बेस नाहीये, त्यामुळे एकहाती सरकार येणे कठीण आहे.
दुसऱ्या धाग्यावर लिहिले तसे शिवसेना आणि भाजपा एक सारख्या विचारसरणीच्या पार्टी आहेत, त्यामुळे त्यांनी युतीत असणे हेच योग्य होते. दोघांचे भांडण तिसऱ्याच लाभ अशी परिस्थिती आता आहे आणि नेहमीच असते. आताही शिवसेना तोडून आणि एनसीपी तोडून त्यांना फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल असेच वाटते. राजकारण हा कॉर्पोरेट कंपनी सारखा झाला आहे. जे performing आहेत त्यांना ओढून आणा पण ते आपल्याकडे आल्यावर तेवढेच performing राहतील (त्यांची मदत होईल) की नाही याची खात्री जसी कॉर्पोरेट मध्ये नसते तशी राजकारणात ही नसते. राजकारणात आज चालणारा फॅक्टर उद्या चालेलच ह्याचीही शाश्वती नसते.
आणि बर का जर उत्तर भारत मागास
आणि बर का जर उत्तर भारत मागास असेल तर अजून का तसा आहे ह्याचा विचार करा
सर्वांना माहीत आहे यूपी आणि बिहार का मागास आहे.
गैर समज नको म्हणून स्पष्ट राज्यांची नाव लिहली.
उत्तर भारतात पंजाब,हरियाणा,हिमाचल, जम्मू काश्मीर , ही पण राज्य येतात पण हि राज्य सर्व बाबतीत वेगळी आहेत आणि प्रगत पण आहेत.
यूपी बिहार ही फक्त लोकसंख्येने मोठी राज्य अप्रगत आहेत .
खूप मागे आहेत.
सर्व बाबतीत .
आर्थिक,सामाजिक ,सर्व बाबतीत ( आयएएस आयपीएस चे आकडे सांगू नका आपलीं प्रशासन व्यवस्था काय दर्जा ची आहे हे देश प्रसिद्ध आहे)).
ही दोन लोकसंख्येने मोठी असलेली राज्य मागास आहेत त्याचे एकमेव कारण आहे.
जातीय ,आणि धार्मिक द्वेष लोकांच्या मनात खोलवर भरलेला आहे .
आणि राजकारण पण तिथे त्याच पॉइंट वर होते
आणि bjp साठी अशीच राज्य निवडून देतात.
महारष्ट्र तोच फॉर्म्युला bjp वापरत आहे.विकास काम न करता फक्त उन्माद निर्माण करून निवडून येण्यासाठी.
जातीय,धार्मिक राजकारण bjp नी महाराष्ट्रात चालू केले आहे.
पण महाराष्ट्र चा पाया मजबूत असल्या मुळे हवं तितके यश त्यांना मिळत नाही.
दक्षिणेतील राज्य तर त्यामा उभ च करत नाही.
फक्त जास्त लोकसंख्या असलेली धार्मिक मुद्द्यावर गंडणारी राज्य च bjp साठी आशेची स्थान आहेत
योगेंद्र यादव, आशूतोष, अशोक
योगेंद्र यादव, आशूतोष, अशोक वानखेडे
ह्याच्या म्हणण्या प्रमाणे कॉंग्रेस येत्या निवडणुकीत भाजपाला हरवुन सत्त्येत येणार कॉंग्रेसला कोणत्याही गठबंधनाची गरजच नाही. >>>> अगदी बरोबर
महाराष्ट्रात भाजप कधीच
महाराष्ट्रात भाजप कधीच स्वबळावर सरकार बनवू शकत नाही कारण महाराष्ट्रात धार्मिक राजकारण कधीच यशस्वी ठरले नाही महाराष्ट्र हे वैचारिक द्रुष्टीने प्रगल्भ असे राज्य आहे म्हणून च महाराष्ट्रात ईडी सिबिआयची मदत घेत भाजप ईतर पक्ष फोडत असतांनाही फारसा फायदा मिळत नाही आताही शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपला राजकीय लाभ द्रुष्टीपथात येत नसल्याने मोदींच्या महाराष्ट्रात चकरा वाढल्या आहेत तरीही भाजपला स्वबळावर सत्ता मिळवणे कठीणच आहे .