Submitted by बोकलत on 4 January, 2024 - 06:29
चला मित्रांनो आता मायबोली सोडून जायची वेळ आली. गेले काही दिवस माझे प्रतिसाद उडवले जात आहेत त्यामुळे आता शहाण्या मुलासारखं. इथून निघालेलं बरं कळत नकळत कोणाला दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. पृथ्वी खूप छोटी आहे पुन्हा कधीतरी भेटूच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शाळेत नवीन नवीन मॉनीटर झालेले
शाळेत नवीन नवीन मॉनीटर झालेले पोर कसे जरा काही काळ रुबाब दाखवतात तसे कोणी नवीन भरती एडमिन टीम असावे हे. थोडं सबुरीने घ्यावे म्हणजे त्यानाही वर्गात रुळायला मदत होईल.
अहो बोकलत, माबोवरच्या भूतांना
अहो बोकलत, माबोवरच्या भूतांना तुमची गरज आहे.
Don't quit please
कुठले प्रतिसाद बोकलत?
कुठले प्रतिसाद बोकलत?
राजकारणवरचे की कुठलेही?
बाकी मायबोली admin team चा आजवरचा अनुभव खूप चांगला आहे. जरा सबुरीने घ्यावे हेच उत्तम.
कुठे जाताय बोकलत?
कुठे जाताय बोकलत?
गेल्या घरी सुखी राहा
गेल्या घरी सुखी राहा
बोकलत, नवीन रूपात भूत बनून या
बोकलत, नवीन रूपात भूत बनून या.
बोकलत
बोकलत
सगळ्या भुतांना तुम्ही लोळवले आणि माबोभुतांच्या समोर तुम्ही हरताय? एटा चोलबे ना. तुम्ही तर सिल्वर लायनिंग टू द ब्लाक क्लाउड. कुठेही जाऊ नका. पकडलेले झाड सोडाच नाय. काय?
कुठले प्रतिसाद डिलिटले? काही
कुठले प्रतिसाद डिलिटले? काही कुठे जाऊ नका तसंही माबोच भूत लवकर उतरत नाही
टाटा कार बाय करायला चालले
टाटा कार बाय करायला चालले असतील.
पृथ्वी खूप छोटी आहे पुन्हा
पृथ्वी खूप छोटी आहे पुन्हा कधीतरी भेटूच.>> म्हणजे तुम्ही नवीन अवतार धारण करून परत येणार आहात.
ठीकच झालं. एका गल्लीत एकच बरं
ठीकच झालं. एका गल्लीत एकच बरं. बाकी भुतांबद्दल बोलायचं तर मलाच लोक भूत समजतात. किती जणांना घाबरवणार?
(टाटांनी 'टाटा पे' सुरू केलंय अशी बातमी आहे तिकडे बाय?)
तुम्ही तुमचे प्रतिसाद तुमच्या
तुम्ही तुमचे प्रतिसाद तुमच्या हस्ताक्षरात लिहून इथे टाकायला हवे होते. इतकं सुंदर मोत्यासारख अक्षर आहे की कुणालाही डिलीट करावेसे नसते वाटले. यापुढे इथे हस्ताक्षर स्पर्धा झाल्या आणि तुम्ही (कुठल्याही अवतारात) सहभागी नसाल, तर बक्षीसं ही थेट दुसऱ्या क्रमांकावरून पुढची द्यावीत अशी माझी मागणी राहील.
तुमच्या कॉमेंट्स भारी असतात
तुमच्या कॉमेंट्स भारी असतात हो !
तापलेल्या धाग्यांवर थंड पाण्या प्रमाणे पडून धागा थंड करतात . नका जाऊ हो
बाय बोकालत… उशीर केलात
बाय बोकालत… उशीर केलात मायबोली सोडायला.. इतके इग्नौर मारत होते लोक.. आपण कधीच सोडली असती….
मी काल दुःखद घटना या धाग्यावर
मी काल दुःखद घटना या धाग्यावर एक कमेंट केली होती. ती कमेंट अशी होती की आज रविवार उद्या सोमवार ऑफिसात जायला लागणार. माझी ही कमेंट admin यांनी उडवली. ठीक केलं कारण माझी ती कमेंट अर्धवट होती. चार तास उलटून गेले होते आणि ती एडिट करता येत न्हवती. पण उद्या म्हणजे आज, खरं तर गेले दोन तीन दिवस ऑफिसात जायला नको वाटतंय कारण यायच्या जायच्या रस्त्यावरच ती ब्लास्ट झालेली जागा आहे. नातेवाईक बाहेर उभे राहून बॉडी मिळायची वाट बघत असतात, त्यांचे ते चेहरे आणि बाजूला उभी असलेली शव वाहिका आणि एकंदरीत ते सगळं वातावरण अंगावर येतं आणि ती जागा पण अशी आहे की ठरवूनही टाळता येत नाही. शनिवारी संध्यकाळी पण हीच परिस्थिती होती आजही असेल कदाचित.
ओह
ओह
खरंच खूप ट्रॉमा असणार आहे, त्या एरियात काम करणाऱ्या लोकांना.सर्वांनी काळजी घ्या, सांभाळून राहा.
बोकलत, तुमच्या स्टेटस ला
बोकलत, तुमच्या स्टेटस ला घराच्या खिडकीतून दिसणारा धूर पाहिला होता..
बोकलत,
बोकलत,
अमानवीय धाग्यावरची एक कमेंट मला असंवेदनशील वाटली. तसे तुम्हाला सुचवल्यावर तुम्ही ती डिलीट पण केलीत. हे खूप आवडले.
त्यामुळं येत जा असं लिहीले होते. विनोद कधी फसतो, कधी चालून जातो अशा अर्थाची कमेण्ट होती.
तुमचा फॅन आहे म्हणून नाही.
------------------------------------------------------------------
या जगात कुणी कुणाचा पंखा असू नये, अगदी स्वतःचाही.
पंखे असावेत तर फक्त ओरिएण्ट,बजाज आणि उषाचे.
पुण्यातला धडाका कोणता?
पुण्यातला धडाका कोणता? डोंबिवलीतला माहीत आहे. आमच्या आणि बऱ्याच लोकांच्या घरातून धूर दिसत होता.
मृणालीजी तो स्टेटस ऑफिसच्या
मृणालीजी तो स्टेटस ऑफिसच्या खिडकीतला होता.
आचार्यजी जाऊ द्या त्यांचं कुठे एव्हडं मनाला लावून घेताय. मी काँग्रेस आणि रागाची खिल्ली उडवतो म्हणून माझ्यावर डूख धरून असतात ते. तरी आता भरपूर दिवस/महिने झाले असतील मी राजकारणी धाग्यावर काही बोलत नाही तरीपण माझ्यावर राग धरून आहेत.
नाही नाही. मनावर घेतले नाही.
नाही नाही. मनावर घेतले नाही.
मी ती कमेंट बदलली कारण तुम्ही विनंतीला मान दिलात आणि संपादन केले. हे लक्षात आणून दिले फक्त.