' आणखी एक वर्ष सरले
नव्याच्या स्वागतास जग सज्ज जाहले,,,,, ' त्या निमित्ताने जे सहजच मनात आले -
सन २०२३ जणू त्याचे क्षणभंगुर अस्तिव राहिल्याची साक्ष देत आपला निरोप घेत चालते झाले आहे . खरेतर हा एक कालचक्राचा अविरत चालणार खेळ . दिवस उगवतो दिवस मावळतो पण वर्ष सरत आले कि जी हुरहूर मनात दाटते त्या मनःस्थितीला शब्दात मांडणे खरेच कठीण जाते.
मग जेंव्हा मन असे सैरभैर होते तेंव्हा व्यक्त होण्यापेक्षा अव्यक्तच राहावे असे वाटते. या मनःस्थितीत मित्र असण्यात जे भाग्य आहे ते काही वेगळेच . या ठिकाणी पार्टी नाही तर गप्पांची मैफिल हवी . चकण्यातील चवी पलीकडे आयुष्यातील मसालेदार क्षण चवीने ज्याच्या बरोबर चर्चिले जातील असे मैत्र हवे.
वाढत्या वयाबरोबर , 'चार पावसाळे जास्त पाहिलेत , केस काही फक्त ऊन लागून नाही पांढरे झालेत , असे हक्काने सांगत आपलेच गत आयुष्य कसे आवाहनात्मक होते यावर भाष्य करण्याची सुरसुरी ज्या मैफिलीत येते ती मैफिल हीच खरी वर्ष अखेरची पार्टी ' .
पण तरीही जशी जशी कातरवेळ जवळ येते तसे तुमच्या मनात हुरहूर दाटून आली अचानक मनाच्या कॅनव्हासवर गत स्मृतींची चित्रे उमटली किंवा अरविंद गोखले यांच्या ' कातरवेळ ' या कथेची आठवण मन बेचैन करून गेली किंवा भा. रा . तांबेंच्या - मावळत्या दिनकरा या कवितेच्या ओळी आठवताना त्यातील -
उपकाराची कुणा आठवण?
‘शिते तोवरी भुते’ अशी म्हण
जगात भरले तोंडपुजेपण
धरी पाठीवर शरा... मावळत्या दिनकरा...
या कडव्याने काही कडवट आठवणी मनास स्पर्शून गेल्या असतील तर अजूनही तुमच्यातील बेचैनी टिकून आहे आणि हि अंतर्मुखता या सरत्या वर्षाला आणि कातरवेळेला निरोप देताना -
जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवी मावळत्या...... या जगरीतीची पण जाणीव आपल्याला होईल आणि मग मैफिल कितीही रंगली ,गप्पांचा फड कितीही बहरला तरी मन
स्वतःशीच बोलताना सहजतेने गुणगुणेल -
" या कातर वेळी पाहिजेस तू जवळी ... "
मग ती हाक एखाद्या मैत्रा साठी असेल किंवा तुमच्या श्रद्धेय अंतरात्म्याने भगवंताची केलेली आळवणी असेल , पण तुमचे मन सरत्या वर्षातील सरत्या दिवशी असे हुरहुरले तर नवीन वर्षात पुन्हा एकदा नव कल्पना , नव संकल्पना , नव आव्हाने याना सामोरे जाण्यास आपण नकीच तयार आहात , कारण या प्रचंड स्पर्धेच्या जगात तुमच्यातील संवेदनशीलता अजूनही टिकून आहे . या विश्वासाने आपण सर्वांना येत्या नव वर्षांच्या शुभेच्छा मनपूर्वक देतो आणि २०२३ च्या मावळत्या दिनकरास -
असक्त परि तू केलीस वणवण
दिलेस जीवन हे नारायण
मनी न धरले सानथोरपण
समदर्शी तू खरा!... मावळत्या दिनकरा...
असे म्हणत अर्घ्य त्यास जोडुनि दोन्ही कर देत या वर्षी आपण सर्वांचा जड अंतःकरणाने निरोप घेतो
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
सामो - धन्यवाद आणि नववर्ष
सामो - धन्यवाद आणि नववर्ष शुभेच्छा !
किंकर तुम्हालाही नववर्षाच्या
किंकर तुम्हालाही नववर्षाच्या खूप शुभेच्छा.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
साद - प्रतिसादासाठी धन्यवाद
साद - प्रतिसादासाठी धन्यवाद आणि नववर्ष शुभेच्छा !
उत्तम !
उत्तम !
खूप हृदयस्पर्शी !!!
खूप हृदयस्पर्शी !!!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
कुमार१ - धन्यवाद आणि नववर्ष
कुमार१ - धन्यवाद आणि नववर्ष शुभेच्छा !
रेव्यु - धन्यवाद आणि नववर्ष शुभेच्छा !
छान लिहिलायं लेख..! अगदी
छान लिहिलायं लेख..! अगदी भावस्पर्शी..
छान लिहिलायं लेख..! अगदी
.
रूपाली विशे - पाटील -धन्यवाद
रूपाली विशे - पाटील -धन्यवाद आणि नववर्ष शुभेच्छा !