नमस्कार मंडळी,
मला तातडीने मदतीची गरज आहे. थोडी पार्श्वभूमी -
माझे बाबा, वय वर्ष ९२, आई वय ८४
आई आणि बाबा दोघांनी पॅन कार्ड काढले होते आणि आधार प्रकरण आले तेव्हा त्या साठीही सेंटरला गेले. आईला आधार कार्ड मिळाले पण बाबांचे काही आधार कार्ड होवू शकले नाही. आईचे पॅन आणि आधार लिंकही केले. त्याचे सगळे बँक अकाउंट वगैरे जॉइंट आहे. जॉइंट पैकी एकाचे आहे तेव्हा काळजी नको असे सांगितले गेले.
या महिन्याच्या सुरवातीपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालत होते. मात्र आता गेल्या आठवड्यात मदतनीस पैसे काढायला गेली असता बँकेने केवायसी हवे आणि बाबांच्या आधार कार्डाशिवाय खाते ऑपरेट करता येणार नाही असे सांगितले. बाबांना आधार कार्ड कसे मिळावे? सरकारी माणसे घरी येवून वृद्द्ध व्यक्तीचे आधार कार्डाचे काम करतात असे ऐकले. तर असे करता येते का? त्यासाठी काय करावे लागेल? आई- बाबा मदतनीस मुलीच्या सोबतीने ठाण्यात रहातात. मी परदेशात असल्याने आईबाबांना सर्व व्यवहारासाठी गावात रहाणारा माझा चुलत भाऊ मदत करतो, पण तो देखील सिनीयर सिटीझन आहे. हे असे अचानक झाल्याने एकदम गोंधळायला झाले आहे. इथे मायबोलीवर योग्य माहिती मिळाली तर पुढे काय कसे करायचे ठरवायला मदत होईल.
जेष्ठ नागरिक आधार कार्डासंबंधी माहिती हवी आहे
Submitted by स्वाती२ on 22 December, 2023 - 07:49
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२०१३ च्या आसपास सरकारी
२०१३ च्या आसपास सरकारी कर्मचारी सोसायटी मध्ये घरी घरी जाउन आधार कार्ड नसल्यास काढुन देत होते. ही सुविधा चालु आहे का ते माहित नाही.
हल्ली प्रत्येक क्षेत्रात काही खाजगी बॅका अधारकार्डाची सुविधा देतात. ह्या बॅका बदलत असतात. सध्या आमच्या घराच्या बाजुला ईड्स ईड आणि RBL बॅक ही सुविधा देतात. दोन वर्षापुर्वी कोटक आणि ICICI बॅक ही सुविधा देत होते. तुमच्या भागात जी बॅक ही सुविधा देते त्याचाशी संपर्क साधुन ते घरी येउन हाताचे ठसे आणि डोळ्याचा स्कॅन घेउन जातात का ते विचारणे. ते झाल्यास दोन कामाच्या दिवसात ऑन लाईन नंबर येईल आणि २ आठवड्यात कार्ड येईल. आधार ला ५० ते १०० रुपये आणि कार्ड ला ५० रुपये लागतिल. जर घरी माणुस येणार असेल तर exact change तयार ठेवणे. वडलाचा राहायच्या पत्त्याचे प्रुफ लागेल. ( latest bank statement or pass book with address चालेल . पास पोर्ट, घराचे डॉक्युमेंट पण चालेल. आईचे आधार कार्ड आणि रेलेशन प्रुफ पण चालेल ) . अधार कार्ड वर रिलायबल माणसाचा नंबर टाकणे कारण पुढच्या प्रत्येक adhar transaction ला ओटिपी येतो.
बॅका सिनियर सिटीझन लोकाना घरी येउन सेवा देण्यासाठी बांधिल आहे. आणि खाजगी बॅका ती सर्विस देतात. पण आधार च्या बाबतीत ही सुविधा देतिल का नाही ते फोन करुन विचारणे.
आधार वर नाव पॅन कार्ड सारखेच ठेवणे. थोडा जरी फरक असेल तर लिंक होणार नाही. लिंक करायला १००० रुपये लेट फी आहे. ऑनलाईन लगेच लिंक होते.
इथे विचारा
इथे विचारा
Toll free 1947
Email.. help@uidai.gov.in
सहकार नगर पुणे येथे पवार
सहकार नगर पुणे येथे पवार नावाचे गृहस्थ अशी कामे करतात , घरी जाऊन . त्याअर्थी ठाण्यातही अशी सुविधा असणारच. जवळच्या वॉर्ड ऑफिस मधे जाऊन चौकशी करायला सांगा .
धन्यवाद साहिल शहा, दत्रात्रय
धन्यवाद साहिल शहा, दत्रात्रय साळुंके आणि पशुपत. दादाला कळवते ही माहिती.
आता १८ वर्षांवरील कोणाचेही
आता १८ वर्षांवरील कोणाचेही आधार कार्ड काढायचे असल्यास पासपोर्ट प्रमाणे पडताळणी होणार आहे. याकरीता जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमलेले आहेत.
घरी येऊन आधारकार्ड काढायचे असल्यास या प्राधिकृत अधिकाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन जेष्ठ नागरिकाकरीता अशी सुविधा हवी आहे हे अर्जाद्वारे कळवावे लागते. मग ते अर्जाची छाननी करून कॅम्प मोडमधील आधार ऑपरेटर घरी पाठवून नोंदणी पूर्ण करुन घेतात.
पॅन -आधार जोडणी ८०-८५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना सक्तीची नाही. तपासून मगच करावे. करायचेच असल्यास त्यांना कदाचित उशिराच दंड नाही. डिमॅट अकाउंट अथवा शेअर संबंधित गुंतवणूक असल्यास पॅन-आधार जोडणी लागतेच.