
सुधा राणीसोबत खूप खुश होती. तिच्या जिवनातील एकटेपणाची पोकळी राणीने भरुन काढली होती. राणीला प्रेमाने कुरवाळत सुधा आपल्या भुतकाळाचा मागोवा घेत होती. काय मिळालं होतं तिला या भुतकाळातुन दु:ख, विरह, ऐकटेपणा. पण तिला त्यांची परवा नव्हती. ती आहे त्या परिस्थीतीत खुश होती. आजही तिला तो दिवस जसाच्या तसा आठवत होता. ती आज पहिल्यांदा त्याला भेटली होती. भेट कसली धडकलीच होती म्हणा त्याला. ती सायकल घेऊन कॉलेजला निघाली होती. पण वाटेत कुत्रा मागे लागला व तिने जोरात सायकल पळवली. ती इतकी घाबरली होती की समोरुन येणाऱ्या विनोदच्या अंगावर जाऊन ती धडकली. दोघेही सावरले. सुधा खुप लाजल्यासारखी झाली. विनोदने कुत्र्याला घालवले. सुधा विनोदला सॉरी म्हणून पुढे निघुन गेली. विनोदच्या मनात मात्र सुधा घर करुन गेली होती.
दुसऱ्या दिवशी सुधा सारिकाकडे गेली. सारिका तिची आवडती मैत्रीण. तिच्या घरी पोहचल्यावर बघते तर काय विनोद तिथेच होता. त्याला पाहताच तिला घडलेला प्रसंग आठवला व परत लाजल्यासारखं झालं. तिने सारिकाला घडलेला प्रसंग सांगीतला व व तो मुलगा कोण हे विचारले. तर तो सारिकाचा आतेभाऊच निघाला. सारिकाने सुधाची विनेाद सोबत ओळख करुन दिली. सारिकाचे लग्न असल्यामुळे विनोद आला होता. मैत्रिणीच्या लग्नानिमित्त सुधाचं सारिकाकडे जाण येण वाढलं होतं. विनोद आणि तिची सारखी भेट होत होती. हळुहळु चोरुन होणाऱ्या नजर भेटीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते कळलचं नाही. या ना त्या कारणाने भेटी व्हायला लागल्या. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. पण प्रेमाचे हे गुलाबी दिवस फार काळ टिकले नाही. प्रेमाला गालबोट लागलचं. विनोदच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली व त्यांनी विनोदला माघारी बोलवून घेतलं. विनोदने सुधाला लवकर परत येतो असं वचन देऊन तो गावी गेला. इकडे सुधा विनोदच्या प्रेमात धुंद होऊन गुलाबी स्वप्न पाहत होती. पण हे स्वप्न जास्त काळ टिकल नाही. विनोद आला नाही पण त्यांच्या लग्नाची बातमी तिच्या पर्यत पोहचली पण ती डगमगली नाही.तिचा प्रेमावर पूर्ण विश्वास होता. सुधाच्या घरच्यांनीही तिच्या मागे लग्नाचा तकादा लावला. पण सुधानी लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं. घरच्यानी खुप समजवलं. पण ती ऐकायला तयार नव्हती.
एकदा विनोद गावी आला तेव्हा तिला भेटला . घरच्याच्या दबावामुळे लग्न करावं लागलं असं त्यांनी सांगितलं. पण ती त्यांच्यावर चिडली नाही की ओरडली नाही. विनोदनी समजवण्याचा प्रयत्न केला. लग्न करण्यास सांगितले . पण ती तयार झाली नाही ती म्हणाली प्रेमाचा शेवट म्हणजे लग्न च असतो असं नाही. मी तुझ्यावर प्रेम करते आणि करत राहिल.तू तुझ्या संसारात सुखी राहा. मी कधी तुझ्या संसाराच्या आड येणार नाही. विनोद गेला खरा पण सुधाचं पुढ काय हा विचार त्याची पाठ सोडेना. इकडे घरचे लग्न कर म्हणुन पाठीमागे लागले त्यामुळे सुधानी घर सोडलं. विनोद ला हे कळल्यावर त्याने तिला एका सेवाभावी संस्थेत काम मिळवुन दिलं. तिथेच तिची राहण्याची सोय पण झाली. तिच्या जिवनाचं नंदनवन झालं. सेवाभावी संस्थेतील लोकांची सेवा करत तिला तिच्या जिवनाचं एक नव ध्येय मिळाल. .
पुढे सुधानी एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं. तिच नाव राणी. राणीनी सुधाच्या जिवनातील एकटेपणा दुर केला. विनोदच्या प्रेमाच्या शिदोरी सोबत तिने पुर्ण आयुष्य काढलं. पण रडत कुढत न राहता. प्रेमाचा हा ठेवा सेवाभावी संस्थेतील लोकांना त्याच बरोबर एक अनाथ जिवाला देऊन त्याच्याही जिवनाचं सोनं केलं. स्वत:ला प्रेमवीर समजणाऱ्या आजकालच्या तरुण-तरुणीना जे फक्त " तु नही तो और सही" किंवा " तु माझी नाही तर कोणाची नाही " असं खुनशी प्रेम करणाऱ्यांना सुधा सारखं निस्वार्थ प्रेम एक नवीन धडा नक्कीच देईल.
आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कोणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा....
आव्हान करा त्या सुर्याला,
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन,
अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून.
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
नवीन ध्येयाचा सुगंध घेऊन.
आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कोणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा....
आवडली. सकारात्मक कथा आहे.
आवडली. सकारात्मक कथा आहे.
छान कथा...
छान कथा...
त्रिशूल चित्रपटाची सुरूवात अशीच आहे साधारण...