
वैधानिक इशारा* जड-आध्यात्मिक लेख आहे, परत फिरा. 
डेकार्टच्या मते आपण विचार करतो म्हणून आपण 'असतो', I think therefore I am ! पाश्चिमात्य तत्त्वज्ञान कुठेतरी विचारांतच अडकून पडले आणि पौर्वात्य त्यामानाने कितीतरी पुढे 'निर्विचारी' अवस्थेत गेले. अद्वैतवाद हा त्याहीपुढे जाऊन आत्म्याचे खरे रूप दाखवतो. त्यामुळे ज्यांना खऱ्याखुऱ्या अध्यात्माची ओळख हवी आहे, त्यांना जगभर फिरून पुन्हा घरी परतावेच लागते. पण फिरावंही लागतं , कारण इतर संस्कृतीतील अध्यात्मिक गूढ हे आपल्या आयुष्यातही टप्प्यांसारखे येतच असते.
एका भटक्यानी एकदा बुद्धाला थेट विचारलं , 'परमात्मा' अशी काही गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते का ? बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्रज्ञेच्या प्रांतात येणाऱ्या गोष्टी ह्या त्या अनुभूती दरम्यानच अस्तित्वात असतात. जेव्हा आपण त्याला काही तरी नाव देत असतो ती अनुभूती नष्ट होत असते. जरा-व्याधी-मृत्यू यांच्यापासून अलिप्त असणाऱ्या तेजस्वी परमतत्त्वाला बौद्धप्रणालीत 'तथागत-गर्भ' असेही म्हणतात.
एखादी गोष्ट गूढ असली की आपण आपल्या सोयीसाठी त्याला पटकन नाव देऊन व्याख्येत अडकवतो. मग आपल्याला फार खोलात जायची गरज पडत नाही. त्यामुळे 'ब्रह्म' आणि 'भ्रम' एकदाच प्रकट झाले आहेत असंही म्हणता येईल. सुरवातीच्या संशोधनानुसार आपले ब्रह्मांड हळूहळू आकुंचन पावत जाईल असे गृहितक होते. पण प्रत्यक्षात बिग बॅन्ग(विश्वनिर्मिती) नंतर ते प्रसरण पावत चालले आहे. भौतिकशास्त्रातल्या थेअरीजपेक्षा कितीतरी अधिक वस्तुमान अस्तित्वात आहे. त्यामुळे आपल्या कल्पनेच्या पकडीत न आलेले जे वस्तुमान आहे, ती अशी ऊर्जा आहे ज्याने विश्वाच्या चेतासंस्थेसारखे प्रत्येक जड-सूक्ष्म अस्तित्वाला धरून ठेवले आहे. ही ऊर्जा कालातीत(timeless) आणि अ-मितीय(dimensionless) आहे. या ऊर्जेने सगळ्या दृष्यादृष्याला जोडले आहे. हे तेच 'नादब्रह्म' आहे, जे सर्व आध्यात्मिक अनुभवाच्या मूळाशी आहे. ज्या नादब्रह्माच्या लहरींवर हे ब्रह्मांड श्वास घेते, तोच प्रत्येक धर्माचा कणा आहे. ह्याच नादब्रह्माचे अवकाश आपल्या आत आणि बाहेर आहे. ह्या नादब्रह्माचा शोध घेण्यासाठी अनेक योगी, साधू, शमन, लामा यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
वैदिक परंपरेतील मिथकानुसार यालाच 'इंद्रजाल'ही म्हटले जायचे. कारण इंद्र हा पृथ्वीचा राजा. ह्याच्या कृपेने पाऊस पडतो, ह्यानेच सूर्याला जन्म दिला. त्याच्यामुळे सृष्टी निर्माण झाली. याने पाडलेल्या पावसाच्या दवबिंदूत एका नव्या सृष्टीचे प्रतिबिंब पडते. सर्व दवबिंदूंचे प्रतिबिंबही एकाचवेळी एकमेकांवर पडते, त्यामुळे अनंतसृष्टींचा आभास निर्माण होतो.

#Indra's net of jewels विकी
अवकाश(ether?) ही अशी पोकळी आहे की ज्यात पंचमहाभूतांचे अधिष्ठान झाल्यावर त्याला एक जड- अस्तित्व येते व नादाने त्यात चैतन्य निर्माण केले जाते. त्यामुळे त्याला काही ठिकाणी yin and yang किंवा शिव(शून्यता) आणि शक्ती(ऊर्जा) म्हटले आहे. 'अवकाश' आणि 'नादब्रह्म' या संकल्पनांना समजण्यासाठी फ्रॅक्टल हा आकार उदाहरणादाखल घेऊ. Fractal हा एक गुंतागुंतीचा भूमितीय आकार आहे, यात दरवेळी एक पूर्ण आकार व नव्या आकाराचे बीज दिसते. प्रत्येक आकारात आणखी एक आकार असं ते अविरत अनंतापर्यंत उकलत जातं. प्रत्येक आकार हा एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असतो. ज्याच्या वापर पुरातन वास्तूकलेत आणि मूर्तिकलेत बुद्धप्रतिमा घडवण्यासाठी केला जायचा. पीठ पाण्यात कालवून सरबरीत भिजवले व त्याला एका भांड्यात घातले व त्या भांड्याच्या काठाला tunning fork पुन्हापुन्हा आदळला तर ते पातळ पीठ वर उडून विशिष्ट आकार घेईल. तसाच या नादाने आपल्या अवकाशाला तात्पुरता स्थूल-आकार दिला जातो.(Timeless world of waves and the Solid world of things.) ज्याला नाव नाही त्याला नाव देऊन, जे सतत बदलत असतं त्याचा काळ निमिषार्ध थांबवून आपण आपल्या दृष्टीने त्याला 'स्थूलत्व' देतो. For our perception defining to exist by imagining a solidity??

#Fractal साभार विकी.
अगदी विश्वाच्या प्रारंभी बिंदूचा महास्फोट झाला तेव्हा तो बिंदू अतिशय घन -सूक्ष्म होता, त्यापासून म्हणजे त्या अद्वैतापासून- singularity पासून हे बिंदूकण भौतिकदृष्ट्या 'द्वैत' झाले. ह्या द्वैतावस्थेआधी जे होते, ते ज्यु आणि ख्रिश्चन धर्मात 'लोगोस' किंवा हिंदू धर्मात 'आद्य ओमकार' असे मानले जाते. 'कुन फाया कुन' या सूफी गाण्यातही 'जब कुछभी नहीं था, वही था वही था' सांगून तेच समजावले आहे. बायबलमध्ये ह्याला In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God” (John 1:1). This one verse establishes the Word as being both divine and eternal in nature असे विशद केले आहे. जे काही पवित्र व चिरंतन आहे ते हे 'नादब्रह्म'. ज्यापासून सगळं अस्तित्वात आलं ते हे 'नाम', आवाजाला शब्दात बांधणं कठीण आहे, त्यामुळे 'नाम' ही व्याख्या सुद्धा मर्यादित आहे . कदाचित यामुळेच गौतम बुद्धांनी मौनाने उत्तर दिले असावे. 
-अस्मिता
मला पूर्ण समजलं आहे असं नाही. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचाही प्रयत्न केलेला नाही. अमर्याद गूढाचं अशक्य स्पष्टिकरण द्यायचा मनापासून प्रयत्न केला आहे. 
त्यातही माहितीपट इंग्रजीत असल्याने मला मराठीत कितपत समजवता आले शंकाच आहे. जिथे शक्य नव्हतं तिथे इंग्रजीतच लिहिलं.
संदर्भ-
१. Inner worlds outer worlds माहितीपट. नक्की बघा. वरचा लेख त्याचाच परिचय आहे , ह्या मालिकेत अजूनही माहितीपट आहेत. तिथे आकाश हा शब्द ether साठी वापरला , तो मी 'अवकाश' केला.
https://youtu.be/aXuTt7c3Jkg?si=i2Zs7IsmLlzuYAqm
https://awakentheworld.com/series/inner-worlds-outer-worlds-series/
२. "Can you hear the music" हे शीर्षक 'ऑपनहायमर' चित्रपटामधील पार्श्वसंगीतावरून दिले आहे, जे नादब्रह्मासाठी चपखल वाटले. सध्या रिपीटावर आहे.
Ludwig Göransson https://youtu.be/vQu5RQA_XN0?si=XM7LX8a_ni7pQANP
अस्मिता आभार
अस्मिता आभार
नंद्या यांचे म्हणणे खरे आहे. या गोष्टी समजणे शक्य नाही. पण पारावर बसून या विषयावर शिळोप्याच्या गप्पा करू शकतो ना ?
इथे जर कुणी अध्यात्मातली अधिकारी व्यक्ती येणार असेल किंवा वैज्ञानिक भाग घेत असतील तर आपले काम फक्त ऐकायचे (वाचायचे). पण जर असे वक्ते नसतील तर मग आमच्या सारख्या अज्ञानी लोकांना मैदान मोकळे असते.
@अस्मिता
@अस्मिता
लेखाचा आत्मा पोहोचलेला आहे. व्हिडीओ पाहिला होता.
पण दिलेले प्रतिसाद हे वाहत वाहत गेल्याप्रमाणे आहेत. हे विषयांतर नसेल ही आशा आहे....
अध्यात्म आणि विज्ञान याबद्दल खूप पूर्वी य ना वालावलकरांशी चर्चा झाली होती. त्यावेळी वैज्ञानिक दृष्टीकोणावर त्यांनी प्रकाश पाडला होता.
खूपदा आपण अध्यात्म आणि विज्ञान यांची गल्लत करतो जे अ तुल यांच्या प्रतिसादात आलेले आहे.
अगदी नास्तिकवादाचा विचार केला तरी अनेक गृहीतकं असतात त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत.
नास्तिकवादात चार्वाकाचे तत्त्वज्ञान आज उपलब्ध नाही. पण एकाने सांगितले कि चार्वाक हा सर्वात जास्त रॅशनल होता. त्याला चार्वाकाचे विचार विचारले तर त्याने उपलब्ध नसल्याचे सांगितले. मग चार्वाक हा सर्वात मोठा रॅशनल हे कसे ठरवले ?
बुद्धाचे विचार उपलब्ध आहेत. यातले रॅशनल म्हणून जे आहे ते
अ त्त दीप भव - स्वयंप्रकाशी व्हा. मी सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका. मी जे सांगितले ते सत्याच्या कसोटीवर घासून पहा.जर पटले तर ग्रहण करा.
आता यात सत्याच्या ठिकाणी विज्ञान असा शब्द सर्रास वापरला जातो. त्या वेळची सत्याची कसोटी ही निरीक्षण आणि आकलन हीच असणार. आजच्या वैज्ञानिक कसोट्या त्या वेळी उपलब्ध असणे शक्य नाही.
दुसरे बुद्धाने आत्मा नाकारला. त्यामुळे पुनर्जन्म नाकारला. त्या ऐवजी स्कंधांचा पुनर्जन्म होतो असे सांगितले.
स्कंध म्हणजे काय ? तर रंग, रूप, आवाज, स्वभाव अशा पाच गोष्टी. या पुढच्या पिढीत दिसतात. हे निरीक्षण आहे.
पण यावरून बुद्धाला डीएनए माहिती होते असे कुणी म्हणेल तर ते स्युडो सायन्स झाले. निरीक्षण जे सत्य आहे ती सत्याची कसोटी.
उपलब्ध साधन सामग्रीनुसार तत्कालीन वैज्ञानिक दृष्टीकोण.
तिसरे - बुद्धाने सांगितले जगाचा नाश अटळ आहे. जे जे निर्माण झाले ते ते नष्ट होणार.
यावरून बुद्धाला बिग बँग थिअरी माहिती होती किंवा ब्लॅक होल, सुपरनोव्हा, तार्याचे मरणे माहिती असेलच असे नाही. हा निव्वळ तर्क आहे. जीव ,जंतू जन्माला येतो आणि मरतो. यावरून काढलेले ते अनुमान आहे.
अशा वचनांना थोर पुरूषाचे वचन म्हणून जर पुढे अनुयायांनी ब्रह्मवाक्य बनवले तर त्यातून एक दर्शन बनते ज्याला नंतर चॅलेंज केले जात नाही. ही गोष्ट अध्यात्माला ब्रह्मवाक्य बनवत नेते. ..
पुढे पुरूषसूक्ताबद्दल बोलू. तोपर्यंत पुढे न्या ही चर्चा.
ही दर्शने किंवा त्यावर टीका
ही दर्शने किंवा त्यावर टीका स्वरूपात कुठे वाचायला मिळेल? काही पुस्तके सुचवाल का? ( फॉर डमीज असेल तर उत्तम)
गुगल बुक्स मधे आहेत देऊ शकतो
गुगल बुक्स मधे आहेत देऊ शकतो. लायब्ररीतून आणलेल्या पुस्तकांची नावे, लेखक इ. शोधावे लागेल.
यदुनाथ (जदुनाथ) सिन्हा
https://www.google.co.in/books/edition/Indian_Realism/G5bp4-j2AA0C?hl=en...
सर्वपल्ली राधाकृष्णन
https://www.google.co.in/books/edition/The_Philosophy_of_Hinduism/Q32Ijw...
https://www.google.co.in/books/edition/Bharatiya_Darshan_Indian_Philosop...
दर्शनशास्त्र
https://www.google.com/search?sca_esv=589425481&sxsrf=AM9HkKnNEOSOAbqqzc...
ओशोंची ऑडीओ बुक्स आहेत. नंतर देईन.
लेख आवडलाच.
लेख आवडलाच. नादब्र्ह्मापेक्षाही नादलहरी शब्द जास्त योग्य होईल का असा विचार आला.
अस्मिता, तुझ्या आणि सामोच्या विचारांची एक घट्ट अध्यात्मिक बैठक आहे. तुमचे लेख, चिंतन हे त्यातून आलेलं असतं. मला किमान दोन-तीनवेळा वाचावे लागतात. वाचल्यावरही काय लिहावं कळत नाही. समजतं पण आणि समजतही नाही. पण तुमच्या लेखांत मांडलेल्या विचारांत गटांगळ्या खायला आवडतात. लिहित रहा.
अतुल, तुमचा प्रतिसाद फार आवडला. रघु आचार्यांचेही प्रतिसाद आवडले.
मामीला मम...
मामीला मम...
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार. थोडक्यात शेवट करतो.
पुरूषसूक्त मुळातून देण्यापेक्षा त्यासोबत लेख द्यावा असे वाटल्याने हे देत आहे. https://www.sanatanveda.com/mantra/marathi/purusha-suktam-in-marathi/
इथे पुरूषसूक्त देण्याचे एकमेव कारण व्हिज्युअलायजेशन. विश्वाच्या निर्मितीबाबत त्या त्या काळात जे काही ज्ञान उपलब्ध होते त्यानुसार केलेले कल्पनाचित्र. पुरूषसूक्त हे काव्यशास्त्राचे नियम पाळून केलेले असल्याने त्याचे अर्थ लावणे हे कधीच एकसमान होणार नाही. पण विविध विद्वानांनी या सूक्ताचे जे अर्थ लावले आहेत त्यातले समान किंवा एकमेकांच्या जवळ जाणारे अर्थ पकडून हे कल्पनाचित्र कसे आहे याकडे पाहणे आणि अस्मिताच्या लेखाचा आत्मा एकच आहे असे वाटते. या काळात विज्ञान खूप पुढे गेलेले आहे. युट्यूबवर सुद्धा व्हिज्युअल्स सहजासहजी उपलब्ध आहे. त्यामुळे आताच्या पिढीच्या व्हिज्युअल्सला सत्याच्या कसोटीवर घासून पाहणे शक्य आहे. त्या काळात काय ?
समोर स्पष्ट दिसणारी आकाशगंगा, दिवसा दिसणारे निळे आकाश, सूर्य चंद्र आणि रात्रीचे तारे, ढग या सर्वांचे कोडे असेल. त्याबाबत वेगवेगळे तर्क करून झाल्यावर प्रत्येक कवीने आपापल्या पद्धतीने विश्वाच्या निर्मितीचे सिद्धांत मांडले.
पुरूषसूक्तातली कल्पना विराटरूप मांडते. कुणी पुरूषाला परमात्मा म्हणते. आजची पिढी तिला अविनाशी शक्ती म्हणते. हे उशिरा सुचलेले शहाणपण देखील असेल. ऋग्वेदातल्या पुरूषसूक्तापेक्षा यजुर्वेदातले सुटसुटीत आहे. दोन्हीत फरक देखील आहे. याशिवाय विश्वाच्या निर्मितीचे अन्य काही सिद्धांत स्मृती आणि पुराणात आहेत. पण त्यात या लेखापमाणे विराट रूप दर्शन नाही. या लेखाचा संबंध नाही.
अन्य धर्मातल्या विश्वनिर्मितीच्या सिद्धांतात असे व्हिज्युअल्स आहेत का याबद्दल कल्पना नाही. नंतर कधी वेळ मिळाला नाही आणि एव्हढे जाणून घेऊन त्याचा उपयोग काय म्हणून सोडून दिलेले. पण आता कुतूहल वाटतेय. कुणाचा अभ्यास असेल तर इथे द्यावे ही विनंती.
वेगवेगळ्या पुरूषसूक्तांचा
वेगवेगळ्या पुरूषसूक्तांचा (मराठीत) घेतलेला गोषवारा असा. (ऋग्वेदातले प्रमाण धरून त्याचा जास्तीत जास्त भाग विचारात घेतल्यास).
पुरूषाने पुन्हा जन्म घेतला ( हे इथे आलेले नाही)).
त्या (पुरुषाला) हजार डोके, हजार डोळे आणि हजार पाय होते. त्याने पृथ्वीला सर्व बाजूंनी व्यापले आणि दहा दिशांना व्यापले.
त्याचे (मनुष्याचे) परम वैभव महानतेपेक्षा मोठे आहे. सर्व प्राणी त्याच्या निर्मितीचा एक भाग आहेत, आणि त्याच्यापैकी फक्त एक चतुर्थांश या जगात प्रकट आहे; त्याच्यापैकी तीन चतुर्थांश लोक आकाशीय क्षेत्रात (स्वर्गात) राहतात.
(पुरूषाने पुन्हा जन्म घेतला )
पुरुषाने विश्वाचा तीन चतुर्थांश भाग एका पायाने व्यापला . हे संपूर्ण विश्व त्याच्या एक चतुर्थांश पासून आहे. आणि तीन चतुर्थांशांसह, पुरुष अमर क्षेत्रामध्ये राहतो. त्या त्रैमासिकात तो सर्वत्र संवेदनाशील प्राणी आणि संवेदनाहीन जीवांमध्ये व्याप्त होतो.
(पुरूषाने पुन्हा जन्म घेतला )
त्याच्यापासून (पुरुष) विशाल विश्वाची उत्पत्ती झाली आणि विश्वातून विराट पुरुष (विराट) उत्पन्न झाला. ( स्वतःतून स्वतः - महात्मा फुले याला निर्मिकम्हणतात). अशाप्रकारे जन्मलेल्या विराटपुरुषाने पुढे आणि मागे विश्व व्यापले आपले बाहू पसरले आणि पृथ्वीला सर्व बाजूंनी व्यापले.
(पुरूषाने पुन्हा जन्म घेतला )
(जेव्हा) विराटपुरुषाची पूजा केली , तेव्हा त्याचा (पुरूषाचा) किती प्रकारे विचार केला गेला (व्हिज्युअलायजेशन ) ? त्याचा चेहरा काय आहे? शस्त्रे म्हणजे काय? त्याच्या मांड्या काय आहेत? त्याचे पाय काय आहेत?
(पुरूषाने पुन्हा जन्म घेतला )
त्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, मांड्यातून वैश्य आणि पायातून शूद्र उत्पन्न झाले.
(पुढच्या काही ऋचांमधे विविध प्राणी, जल, जीव, जंतू, पक्षी, सागरी जीव, डोंगर,जमीन इत्यादी कसे उत्पन्न झाले याचे विचेचन याच प्रकारे येते)
(पुरूषाने पुन्हा जन्म घेतला )
पुरुषाच्या मनातून चंद्राचा जन्म झाला आणि त्याच्या डोळ्यांतून सूर्याचा उदय झाला. त्याच्या मुखातून इंद्र आणि अग्नी (अग्नी) जन्मले आणि त्याच्या श्वासातून वायू (वायू) प्रकट झाले.
(पुरूषाने पुन्हा जन्म घेतला )
त्याच्या नाभीतून अत्रिक्षा (वातावरण) उत्पन्न झाले. त्याच्या डोक्यावरून स्वर्ग पसरला. त्याच्या पायापासून पृथ्वीने त्याचे रूप घेतले. आणि त्याच्या कानातून अवकाशाच्या दिशा निर्माण झाल्या. अशा प्रकारे विराट पुरुषाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली.
(पुरूषाने पुन्हा जन्म घेतला )
निर्मात्याने ब्रह्मांड प्रक्षेपित केले आणि इंद्राने चारही दिशा व्यापल्या. हे सत्य समजून घेतल्याने माणूस या जगात अमर होतो. पुरुषाच्या ज्ञानाशिवाय मुक्तीचा दुसरा मार्ग नाही.
इथे थांबतो नाहीतर आयडी मधे आपोआप एक आकडा तीन वेळा घाला अशा तक्रारी वेमांकडे जातील).
नास्तिकांचे विश्वाबद्दलचे दर्शन, वेदांचे दर्शन इतके पुरे.
त्या काळात मूळ फरक म्हणजे कवीकल्पना, काव्यासाठी लागणारी प्रतिभा आणि दुसरीकडे निरीक्षणे आणि सर्वांना येणारी अनुभूती यावरचे सिद्धांत.
कणाद ऋषींचे अणूरेणूचे प्रारूप किंवा संतांच्या ओव्यात असलेले रेणू, अणू हे विज्ञानापेक्षा वेगळे असावेत. या कवीकल्पना. त्यावरून बुद्धाला, संतांना, वेदांना आजचे विज्ञान ठाऊक होते असे सांगणे हे टोक आहे.
>>>>>विचारांची एक घट्ट
>>>>>विचारांची एक घट्ट अध्यात्मिक बैठक आहे.
नाही मामी माझी नाही. मला स्तोत्रे आवडतात दॅट्स ऑल देअर इज.
त्या माहितीपटात अध्यात्म आणि
त्या माहितीपटात अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला नाही, निदान मला तरी ओढूनताणून असं केलं आहे असं काही जाणवलं नाही. त्यात जितका व्यापक दृष्टिकोन आहे तितका मी यापूर्वी कधीही वाचला -ऐकला-बघितला नव्हता. एवढा तौलनिक अभ्यास बघून मी प्रभावित झाले होते, माझा कशालाच विरोध किंवा कशाचाच आग्रह नसतो. तसं केलं तर 'जस्ट बी' ला काय अर्थ राहणार. विषय कुठलाही असो, पझलचे तुकडे आपापले पडल्यासारखे वाटले की आवडतात व नैसर्गिक वाटतात. मी त्या मालिकेतील एकुणएक माहितीपटाची पाचसहा वर्षांपासून पारायणे केली आहेत. मला स्तोत्रे, नामस्मरण, वाणीचे प्रकार, बीजमंत्र, शब्दांच्या फोडी(गु+रू), देव ही मर्यादित संकल्पना, आस्तिक-नास्तिक वाद, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा या विषयांचा (राग नाही) मनापासून कंटाळा आला आहे, यात काहीच नाविन्यपूर्ण राहिले नाही. It doesn't excite me anymore. त्यापेक्षा समाधानकारक आणि सर्वव्यापी म्हणावं असं यात दिसलं. 'Everything is connected' सांगणारं काही तरी हवं होतं आणि ते सापडलं.
जर 'ऑपनहायमर' बघितला असेल तर तो ज्या तगमगीतून जातो, तो त्याचा 'आत्मशोध'च होता हे लक्षात येईल. ते फक्त अण्वस्त्र बनवण्यासाठी नव्हतं, ते तर त्या ध्यासाचं बायप्रॉडक्ट होतं. Even he was playing a role... you can not get away without the churning. नंतरही सुटका नसते, फक्त तगमग थांबते. Hence, before enlightenment chop wood carry water, after enlightenment chop wood carry water. Thanks to Nolan, I have an example to share..!
जागृती किंवा अवेअरनेस ही असंवेदनशील, दया-माया-माणूसकी नसलेली, डिल्यूजनल-भ्रमिष्ट नसते. जाणिवांच्या कक्षा रुंद झाल्या की जगातील प्रत्येक घटना- प्रत्येक दुःख त्यांच्या जाणिवेच्या कक्षेतच येते. 'जागृती' अंध-अज्ञ कशी असेल, ती तर अंधकार दूर करते. त्यामुळे ज्यांना संगीत ऐकू येत असावं, त्यांना आक्रोशही ऐकू येणारच. पण या कोलाहलात सुद्धा नादानुसंधान केले जात असावे.
अर्थात ही संपूर्ण पोस्ट हे पूर्ण माझं आकलन आहे. समजून घेणे.
धन्यवाद मामी आणि धनवन्ती,
धन्यवाद अमित, मामी आणि धनवन्ती,
असाच लोभ असू द्या.
माझा प्रतिसाद खूपच लाऊड आणि
माझा प्रतिसाद खूपच लाऊड आणि विज्ञान व अध्यात्म यांना जोडण्याचा आरोप करत असल्यासारखा टोन झाला आहे. तो बराच ट्रिम आणि माईल्ड करायला हवा पण आता एडिट करता येत नाही. तो मुद्दा तुम्ही फार माईंड करू नये ही विनंती.
र आ आणि तुमचे प्रतिसाद जरा सवडीनुसार वाचतो.
माईन्ड मुळीच केलेलं नाहीये,
माईन्ड मुळीच केलेलं नाहीये, अतुल. माझ्या मनातही तसं काही आलं नाही. मला प्रतिसाद आवडलेलाच आहे, शब्दनशब्द.
आचार्य, प्रतिसाद स्वस्थ चित्ताने नंतर वाचेन. अजून वाचले नाहीत, आधी जे लिहायचं होतं ते लिहून टाकलं.

------
वरची आणि ही पोस्ट स्वतंत्र आहे.
काल लेख पुन्हा वाचून प्रथमदर्शनी लेखही तसा वाटू शकतो असं लक्षात आलं म्हणून स्पष्ट केलं आहे. कधीकधी वाटतं असं लिहिण्याने लोक लिहिणाऱ्यालाच देवभोळं, निष्क्रीय, उदासीन,
बोअरींगव अंधश्रद्ध समजतील. कारण हे सगळं एकच असल्याचं कंडिशनिंग आपल्याकडे आहे. (माझ्याबद्दल म्हणून नाही) पण एकुणात चुकीच्या धारणा असू शकतात, त्याही स्वच्छ केल्या.मी माझे प्रतिसाद या पोस्टच्या
मी माझे प्रतिसाद या पोस्टच्या निमित्ताने अन्यत्र जे वाचनात येते त्या अनुषंगाने दिले आहेत. पोस्टमधे नादब्रह्म आणि विश्वनिर्मिती याबद्दल सत्याच्या आजच्या कसोट्या तत्कालीन कसोट्या, समजून घेण्याची पद्धत याचा आढावा घ्यावासा वाटला.. विश्वाचा आवाज , सॉनिफिकेशन इ. स्वतंत्र पोस्टमधे देण्याचा कंटाळा असल्याने इथेच दिले. कदाचित त्यामुळे पोस्टच्या लेखिकेवर आरोप केलेत असा समज होत असेल तर त्याबद्दल क्षमस्व,
हा पोस्टमधला भाग वाचतानाच पुरूषसूक्त आणि त्यानिमित्ताने प्राचीन काळातले विश्वनिर्मितीचे आकलन, त्याचे व्हिज्युअलायझेशन हे सर्व डोक्यात वाजू लागले होते. त्यावरून असलेले वाद विवाद , मतमतांतरे यावरून पूर्वी सुद्धा विज्ञान प्रगत नसताना मानव बुद्धीमत्ता, प्रतिभा,काव्यप्रतिभा याचा वापर करून विश्वाचा,निर्मितीचा कसा शोध घेई हा भाग मांडावासा वाटला. अचूक लिहायचे तर पुस्तकच लिहावे लागेल.
नंतरच्या प्रतिसादाच्या ओघात मूळ लेख मागे पडला जे इथे नेहमीच होते. अशा विषयावरच्या लेखात सगळेच म्हणणे मांडणे शक्य नसते. प्रतिसादात प्रत्येकाचे आपापले आकलन येऊ शकते.
मला असं काहीही वाटलं नाही, मी
@आरोपबिरोप ,
मला असं काहीही वाटलं नाही, मी माझ्याच नादात लिहितेय. चिल पिप्स
अशा विषयावरच्या लेखात सगळेच म्हणणे मांडणे शक्य नसते. प्रतिसादात प्रत्येकाचे आपापले आकलन येऊ शकते.>>>+१
शिवाय माझा धागा आहे तर मलाही लिहू द्या की जरा.
शिवाय माझा धागा आहे तर मलाही
शिवाय माझा धागा आहे तर मलाही लिहू द्या की जरा >> अर्रर्र !

म्हणून दर वेळी आवाहन केलेलं कि न्या पुढे, न्या पुढे चर्चा. पण बहुतेक सगळेच लेख लिहून हिमालयात साधनेसाठी गेले असतील तर आता आपले म्हणणे पूर्ण करून समाधी घ्यावी असे वाटले... शिवाय आपणच लिहीतोय तर आयडीत एकच अंक तीन वेळा एडीट करून टाकतील ही भीतीही वाटलेली.
बहुतेक सगळेच लेख लिहून
बहुतेक सगळेच लेख लिहून हिमालयात साधनेसाठी गेले असतील तर आता आपले म्हणणे पूर्ण करून समाधी घ्यावी असे वाटले..
>>>
म्यांडलब्रोट फ्रॅक्टल ला एका
म्यांडलब्रोट फ्रॅक्टल ला एका विशिष्ट प्रकारे काढलं (रेंडर केलं) तर ते बसलेल्या बुद्ध प्रतिमेसारखे दिसते यात एक अचानक लक्षात आलेली, आपल्या मेंदूला दिसलेली गंमत सोडून काही आहे का?
) वाटू लागतं. ते गणित इतकं सोपं ही वाटत नाही की बुद्धाने ते १०००० इटरेशन साठी काही मागमूस न ठेवता सोडवलं असेल.
म्हणजे बुद्ध प्रतिमा काढायला ते गणित वापरलं जायचं असा अर्थ अभिप्रेत आहे का? जे बिंदू त्या गणिती सूत्रातून एस्केप होतात तो बुद्धाचा आकार... मग माया, संसार यातून एस्केप... हे आता स्केची ( पन इंटेंडेड
अर्थात एक गंमत म्हणून मला ही ते रोचक वाटलं.
किंवा जिझस म्हणतो त्याने सहा दिवसात वेठबिगारी करून एकेक एकेक करत जग निर्माण केलं. आता लोगोस बद्दल मला काही फार माहीत नाही पण त्यात आणि नादब्रह्म यात साम्य माणसाला पॅटर्न रेकाग्निशन चे वेड असल्याने, आपला मेंदू उत्क्रांतीत पॅटर्न रेक. साठी बनत गेला असल्याने, आपण लावले की ते खरेच तसे आहे? कारण धार्मिक गोष्टी भयंकर व्हेग असतात आणि त्यांना आपण देऊ त्या आकाराची मूर्त मूर्ती बनत जाते.
मुळात singularity संकल्पना आज आपल्याला जशी माहीत आहे तशीच वेद उपनिषदे बायबल मध्ये अभिप्रेत आहे असं असेल का? नसेल. वरचा र.आ. चा कणाद/ अणू रेणू प्रतिसाद चपखल आहे. तो ' शब्द ' रीयुज झाला तरी त्याचा अभिप्रेत अर्थ माहित असावा हे शक्य वाटत नाही.
म्हणजे बुद्ध प्रतिमा काढायला
@स्केची,
good one !
म्हणजे बुद्ध प्रतिमा काढायला ते गणित वापरलं जायचं असा अर्थ अभिप्रेत आहे का?
>>>>
मला खरंच तसं वाटलं. वास्तुकलेत-मूर्तिकलेत गणिताचा वापर होतच आला आहे, आणि गणित निसर्गात आढळलेलं आहे. Ex. Fibonacci sequence in flower petals , golden ratio in nature किंवा वरचं फ्रॅक्टल.
संदर्भ - https://www.mathnasium.com/blog/14-interesting-examples-of-the-golden-ra...
त्यामुळे ते हळूहळू जोडलं गेलं असावं. मानवी प्रेरणा आदिम असू शकतात. कुठलाही निष्कर्ष काढण्याइतका अभ्यास किंवा उत्क्रांतीचा प्रवास अजून झालेला नाही पण साधर्म्य बघूनही गंमत वाटते, त्यामुळे रोचकला मम.
असंच तुकडे जोडत मागेमागे जात राहिलो तर कधीतरी एकसंध चित्र बघायला मिळेल व सगळ्या शंकाकुशंका दूर होतील. तेच कदाचित भगवद्गीतेत वर्णन केलेलं मर्यादित मानवी मनाला न सोसणारं 'विराटरूप' दर्शन असेल.
-----------------------
आता (सध्या तरी) अजून काही सांगण्यासारखं राहिलं आहे असं वाटत नाही, एकदा सगळे प्रतिसाद आणि लिंक्स बघून-वाचून घेईन व चिंतन-मनन करेन. एक इंपल्सिव्ह पोस्टही लिहिल्या गेली होती, त्यावरही आत्मपरीक्षण करेन.
धन्यवाद सर्वांना.


अतुल, एवढ्या मुद्देसूद आणि माहितीपूर्ण पोस्टसाठी तुमचेही अजून एकदा मनापासून आभार. पुन्हा वाचावीच लागणार आहे.
आचार्य, तुम्ही तर खरोखरच 'आचार्य' आहात.
थांबा थांबा इतक्यात
थांबा थांबा इतक्यात आभारप्रदर्शन आणि "कार्यक्रम संपन्न झाला" असे म्हणू नका. आता कुठे कार्यक्रम सुरू झालाय
मी तुमचे, रआ, अमित व इतर प्रतिसाद वाचून जिरवून मनन करून लिहिणार आहे. व पुढेही जमेल तसे व विविध स्पिरिच्युल गुरूंचे ऐकेन वाचेन तसे लिहीत राहणार आहे अजून
अमितव, काही संज्ञा मला नव्या
अमितव, काही संज्ञा मला नव्या आहेत. पाहतो.
अ तुल, अंग ठणकतंय आता लिहून लिहून.
तुम्ही (कुणीही) लिहा , मी
तुम्ही (कुणीही) लिहा , मी वाचेन. खरोखरच काही नवीन भर घालता आली तर घालेन. उलट लिहिण्याच्या गडबडीत वाचनाची एकाग्रता रहात नाही. 'I wasn't listening, I was just waiting to talk' म्हणतात, तसं होतं मला. पन्नास प्रतिसादात चौदा अब्ज वर्षांची चर्चा अशीही शक्यच नाही.
मला
मला
सिर्फ अहसास है ये रुहसे महसूस करो या ओळी आठवल्या .
छान लेख .
सुंदर ओळी आहेत. शायरी आहे का
वाचनीय लेख आणि प्रतिसाद.
वाचनीय लेख आणि प्रतिसाद. गम्मत अशी कि या विषयावरचे लेख वाचताना किंवा विवेचन ऐकताना एक मस्त गुंगी येते. यालाच साधक लोक समाधी अवस्था म्हणत असतील का?
हम ने देखी है इन आँखों की
हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
क्या बात है
क्या बात है
प्याज को प्याज ही रहने दो कोई दाम ना दो
विचारांना चालना देणारे लिखाण
विचारांना चालना देणारे लिखाण आणि प्रतिसाद. पुढील चर्चा वाचण्यास उत्सुक.
Pages