Submitted by अंतिम on 29 November, 2023 - 13:54
सांगशिल जर मला कधी तू
कशी निरागस कळी उमलते
मी ही सांगिन कशी अनामिक
जाणिव कातर शब्द शोधते
मी ही ऐकले आहे कितिकदा
मुग्ध कळीचे मोहक गाणे
आणि ऐकले असशील तू ही
प्रसन्न पक्षांचे किलबिलणे
पण खुडली गेली कशी कळी ती
मलाच गेले पक्षी सांगून
एका कातळ सायंकाळी
नभही गेले अश्रू ढाळुन
इंद्रधनुष्यी रंग ढगांचे
जसे उतरती फुलाफुलांतुन
करुण स्वर ते तसेच स्त्रवती
शब्द होऊनी माझ्या हातून
वचन दिले मी आहे त्यांना
जपेन त्यांची मूक भावना
म्हणूनच नाही सांगत मी ती
करुण कहाणी कधीच कोणा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान...
छान...
इतकी सुंदर कविता आहे! वाचायची
इतकी सुंदर कविता आहे! वाचायची कशी राहून गेली? बहुधा बर्याच धाग्यांच्या गुंत्यात खाली खाली दडली असावी.
>>>इतकी सुंदर कविता आहे!
>>>इतकी सुंदर कविता आहे! वाचायची कशी राहून गेली? >>>+1
सुंदर कविता !!
सुंदर कविता !!
सुंदर कविता
सुंदर कविता
सुंदरच.
सुंदरच.
छान!
छान!