कलाम कि गुलाम

Submitted by sawantrl on 29 November, 2023 - 02:13

लालसे पाई मला माझा धर्म सुद्धा कळत नाही
कोण हिंदू कोण मुस्लिम
जाती धर्माशिवाय राजकारणच होत नाही
मी कलाम कि गुलाम माझं मलाच कळत नाही

आरक्षण आरक्षणाचा खेळ आहे चालू
समाजाची दिशाभूल अन पुढाऱ्याच पिल्लू
उद्धाराची वाट पाहणंच संपत नाही
मी कलाम कि गुलाम माझं मलाच कळत नाही

दादा काका बाबा मामा साहेब सारे संधी साधू
हातावर घड्याळ बांधू कि धनुष्याने कमळ तोडू
हेच आता उमगत नाही
मी कलाम कि गुलाम माझं मलाच कळत नाही

आता मात्र, आयुष्याच्या वाटेवर निर्भीडपणे चालावं लागेल
इमानदारीची कास धरून वागावं लागेल
त्यासाठी शिकावं लागेल वाचावं लागेल
गुलाम नाही कलाम व्हावं लागेल

डॉ रमेश सावंत

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मात्र, आयुष्याच्या वाटेवर निर्भीडपणे चालावं लागेल
इमानदारीची कास धरून वागावं लागेल>> छान लिहिलयं.
कविता वास्तववादी..