पुण्यातील चांगल्या त्वचा रोग तज्ञ (Dermatologist) डॉक्टरांचे नाव सुचवावे

Submitted by चैतन्य रासकर on 17 November, 2023 - 06:54

माझ्या एका मित्राच्या (मला नाही) अंगावर पांढरे चट्टे आले आहेत.

एक चट्टा कपाळावर आहे, एक मानेवर आहे, एक दंडावर आहे आणि एक मांडीवर आहे.
थँक गॉड त्याने फक्त कपाळावरचा चट्टा दाखवला.

मित्राचे वय २३-२४

या चट्टयांना खाज येते, पण तो हे चट्टे खाजवत नाही
चट्ट्यानां काही लोशन लावलं की, थोडा वेळ बरं वाटतं आणि खाजवत नाही

कृपया पुण्यातील चांगल्या त्वचा रोग तज्ञ (Dermatologist) डॉक्टरांचे नाव सुचवावे.
जर यावर कोणताही आयुर्वेदिक उपाय असला तरी कृपया कळवावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ रश्मी गुंजलवार
आम्ही या डॉ कडे एक दोन वेळा गेलो आहे.अनुभव चांगला वाटला.क्लिनिक पिंपळे सौदागर स्टार बाजार च्या वर आहे.
https://maps.google.com/?cid=9230086994259862357&entry=gps

Dr अमेय केळकर
Derma solutions
कोथरूड, शिव तिर्थ जवळ आहे

डॉ. अश्फाक सय्यद, व्हिक्टरी थिएटरच्या अपोजिट, कॅंप.‌
हे बेस्ट आहेत.‌ पण अपॉइंटमेंट मिळण्याचा प्रॉब्लेम आहे.

चेहऱ्यावर किंवा ओठांच्या आजूबाजूला पांढरे डाग आलेले असतील आणि जास्त खाजवत नसतील तर ते कुपोषणाचे लक्षण असते
सुज्ञ व्यक्तींनी प्रकाश टाकावा

डॉक्टर विनय कुलकर्णी. - ८६०५८८२६४९

२००८ सालापर्यंत थंडी जवळ आली की मला दोन्ही हाताच्या अंगठ्याना एका विशिष्ट जागी ड्रायनेस यायचा आणि ते जखमेप्रमाणे व्हायचं. खूप दुखायचं. एकदाच त्यांना दाखवले आणि त्यांचे निदान अतिशय उत्तम आहे त्यांनी सांगितलेली उपाययोजना केल्यावर मला परत कधीच तसे झाले नाही. दवाखाना डेक्कन ला पांचाळेश्वर मंदिराजवळ आहे. मशिदीला लागून (लकडी पूल) प्रयास नाव आहे.

पांढरे डाग हे कॅल्शियम डेफिशीयंसि पण असू शकते.
स्वतःला कल्पना येऊ न देता(झोपलेलं असताना) कोणाला तरी स्वच्छ टाचणी टोचायला नक्की सांगा प्रत्येक डागावर.दुखलं किंवा जाणवलं पाहिजे.(मी डॉक्टर नाही.)