Submitted by अनन्त्_यात्री on 16 November, 2023 - 11:13
चांदणठिणग्यांचे नभझुंबर
पहाटफुटणीत विझता विझता
शब्द गवसले- त्यांची पडझड
बघत राहिलो दिवस उगवता
शब्दाशब्दामधुनी वाटले-
येईल काही अमोघ उसळत
पण निष्प्रभ अर्थाचा खुर्दा
आला हाती.. बसलो मोजत
साखरझोपेच्या काठावर
शब्द भासले होते ओतीव
धग दिवसाची सोसून कळले
ते ही निपजले पोकळ, निर्जीव
लख्ख समजले पुन्हा यापुढे
भ्रमनिरास ना होऊ देणे
ओलांडून शब्दांचे कुंपण
अर्थनिरर्थापल्याड जाणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारच सुंदर, अर्थपूर्ण आणि
फारच सुंदर, अर्थपूर्ण आणि आशयघन..!
आहा मस्त.
आहा मस्त.
अस्मिता, सामो धन्यवाद
अस्मिता, सामो धन्यवाद
मस्त.
मस्त.
मस्त.
मस्त.
सुंदर शब्दरचना..!
सुंदर शब्दरचना..!
मानव पृथ्वीकर, रूपाली धन्यवाद
मानव पृथ्वीकर, रूपाली धन्यवाद!
अर्थनिरर्थापल्याड जाणे >>>
अर्थनिरर्थापल्याड जाणे >>> फारच सुरेख
आवडली कविता!
आवडली कविता!
सुंदर सुंदर!!
सुंदर सुंदर!!