झिम्मा - १ चा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80649
आता झिम्मा २ कडे वळूया.
मी कालच सकुसप बघून आलो. काही निरीक्षणे.
१) झिम्मा १ जिथे संपतो त्याच पानावरून पुढे झिम्मा २ सुरू होतो.
२) झिम्मा १ ज्यांना आवडला त्यांना झिम्मा २ किंचित कमी किंवा किंचित जास्त आवडू शकतो. पण आवडेल हे नक्की.
ज्यांना झिम्मा १ आवडला नाही त्यांना देखील आवडण्याची शक्यता आहे. प्रयत्न सोडू नका.
३) मी सकाळच्या शो ला लेकीसोबत गेलो होतो. मी झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ किंचित कमी आवडला या गटात मोडतो.
माझी बायको तिच्या आईसोबत रात्रीच्या शो ला गेली होती. ती झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ किंचित जास्त आवडला या गटात मोडते.
तर माझी लेक जिन्हे झिम्मा १ पाहिलाच नव्हता तिला एक स्वतंत्र चित्रपट म्हणून झिम्मा २ आवडला.
मॉरल ऑफ द स्वानुभव - तीन पिढ्यातील बायकापोरींनी एंजॉय केलेला हा झिम्मा देखील महिलावर्गाने डोक्यावर घेण्याची शक्यता आहे.
४) मला झिम्मा २ किंचित कमी आवडला, किंबहुना मी तितका समाधानी झालो नाही, याचे कारण कदाचित या चित्रपटात वेगळेपणा किंवा फ्रेशनेसपणा नसल्याने असेल. एखाद्या छानश्या सिरीयलचा पुढचा एपिसोड बघतोय असे वाटले. कदाचित माझ्या अपेक्षा वेगळ्या आणि कदाचित चुकीच्या देखील असाव्यात.
५) आजूबाजूची पब्लिक मात्र चित्रपट फार एंजॉय करत होती. बरेच प्रसंगात खिदळून हसत होती. स्पेशली निर्मिती सावंतने काहीही केले तरी हसायला सुरुवात करत होते. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायला हरकत नाही. मराठी चित्रपट चालला तर आनंदच आहे. माझी वैयक्तिक आवड-नावड तितके महत्व राखत नाही.
६) परीक्षण लिहायचे सोडून मी असली निरीक्षणे कसली लिहितोय असे तुम्हाला वाटत असेल. पण हे वाचणार्या बहुतांश जनतेने झिम्मा १ पाहिला आहे, आणि त्यांना चित्रपटाची कथा आणि जातकुळी माहीत असेल हे गृहीत धरले आहे.
७) वेगळेपण घेऊन येतात ती दोन नवीन पात्रे. त्यातील एक म्हणजे शिवानी सुर्वे. तिला साजेसे असे फटकळ आणि माणूसघाणे कॅरेक्टर दिले आहे. ते तसे असण्यामागे एक ट्रॅजेडी दिली आहे. ओवरऑल तिचे कॅरेक्टर आणि तिच्या स्टोरीचा ट्रॅक चांगला जमला आहे.
८) दुसरी नवीन पाहुणी आहे सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू. जी निर्मिती सावंत यांची सून दाखवली आहे. तिची काही स्पेशल अशी स्टोरी नाही. एक चुणचुणीत पोरगी दाखवली आहे. जिची आपल्या नुकतेच मॉडर्न बनू पाहणार्या सासूशी केमिस्ट्री जुळताना दाखवली आहे. मला या दोन्ही नवीन एंट्री आवडल्या.
९) पहिल्या भागात क्षिती जोग ही नवर्यापश्चात आत्मविश्वासाच्या अभावापायी धडपडणारी एक अबला नारी दाखवली होती. त्यात पुरेसा आत्मविश्वास कमावल्याने आता दुसर्या भागात तिच्यावर दुसरा जोडीदार शोधायची जबाबदारी टाकली आहे. ती तिला पेलवते की नाही, तिला तसाच साजेसा कोणी भेटतो की नाही हे चित्रपटातच बघा.
१०) सुहास जोशी सुरुवातीलाच डिक्लेअर करते की ती सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. जे देते त्याला pleasant surprise तर नाही म्हणू शकत. पण त्यातूनही काहीतरी सकारात्मक शोधणे हा झिम्माचा युएसपी इथेही आहेच.
११) सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांचा पत्ता या चित्रपटात कटला आहे.पण त्यामुळे कोणाचे काही अडू नये. मृण्मयी गोडबोले मिसिंग आहे हे मी घरी आल्यावर माझ्या डोक्यात आले.
१२) सिद्धार्थ चांदेकरचा सतत हेवा वाटत राहतो. ही भुमिका (भले आपण कलाकार का नसेना) आपल्याला मिळायला हवी होती असे सतत वाटत राहते. पण ते शक्य नाही. कारण त्याचे काम ईतके सहज सुंदर झाले आहे की झिम्मा-३ मध्ये ईतर कोणी बाया नसल्या तरी हा बाप्या असणारच.
१३) संगीत सुमधुर आहे. झिम्मा टायटल ट्रॅक, तसेच अध्येमध्ये येणारी एखाद दुसरी गाणी आता शब्द आठवत नसले तरी छान वाटतात. "मराठी पोरी दुनियेला दाखवती माज" हे गाणे शेवटी येते. तोपर्यंत चित्रपटाचा मूड तयार झाला असल्याने मी त्याचा अर्ध्या एक मिनिटभराचा विडिओ काढला. हे बेकायदेशीर असेल तर क्ष्मस्व. व्हॉटसप स्टेटसवर शेअर करून झाला की डिलीट मारतो.
१४) बायकांच्या कपडेपटाबद्दल बायकांनाच जास्त कौतुक असते. पुरुष त्या फंदात पडत नाहीत. तरी मराठी पोरी या गाण्यातील सर्वांचे कपडे आणि स्पेशली त्या कपड्यांचे रंग मला फार्र आवडले.
१५) परदेशातली मोजकी निसर्ग द्रुश्ये छान चित्रित केली आहेत. ती मोठ्या पडद्यावर बघायला मजा आहे. एकूणच चित्रपटाची फ्रेम सुखद आहे. तर चित्रपट ओटीटीवर यायची वाट न बघता थिएटरला जायला हरकत नाही. जितके लवकर बघाल तितके यावर स्पॉईलरची भीड न बाळगता चर्चा करायला मजा येईल.
१६) अखेरीस भाग एक प्रमाणेच झिम्मा ग्रूपची व्हॉटसप चॅट दाखवली आहे. सगळे अनुभवी, सुज्ञ आणि रसिक प्रेक्षक ती चॅट थांबून वाचत होते. मी सुद्धा वाचत थांबलो तसे लेकीने मला हटकले. म्हणाली, आता हे कश्याला वाचतोयस? एवढे पडले आहे तर तू सुद्धा त्यांचा व्हॉटसप ग्रूप जॉईन कर ना... मग काय, अशी गूगली आल्यावर नाईलाजाने विकेट टाकून बाहेर पडावे लागले. आता तेवढ्यासाठी ओटीटीवर चित्रपट कधी येतोय याची वाट बघणे आले.
१७) ही निरीक्षणे लिहिता लिहिता मला जाणवले की मी उगाच मला दुसरा भाग पहिल्यापेक्षा किंचित कमी आवडला असे समजत आहे. कदाचित मला देखील हा भाग किंचित जास्त आवडला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे..
छे, जरा कन्फ्यूजनच आहे,
पण सारांश असा - एकूणात कोणी माझ्याकडे रिव्यू मागितल्यास - चित्रपट छान आहे, चित्रपटगृहात जाऊन बघायला हरकत नाही. हे माझे उत्तर तयार आहे.
सतरा तिथे खतरा म्हणत ईथेच थांबतो.
अजून काही अठरा-एकोणीस लिहावेसे वाटले तर प्रतिसादात भर टाकत जाईन.. माझे प्रतिसाद आवर्जून फॉलो करा. या पोस्टला बदाम लाईक करा. मराठी चित्रपटांवरचे प्रेम दाखवण्याची हिच ती वेळ
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
ट्रेलर ईथे बघू शकता
https://www.youtube.com/watch?v=t4fRUhn-KvA
दुसरा ट्रेलर इथे
https://youtu.be/MCrA8dFHG4E?si=8fpR4Whv7wagzG6v
मराठी पोरींचे तडकते फडकते गाणे इथे ऐकू शकता
https://www.youtube.com/watch?v=90cVpTfjfDY
पुन्हा एकदा,
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
अर्र्, मी मैत्रिणीबरोबर
अर्र्, मी मैत्रिणीबरोबर थेटरात जायचा प्लान करत आहे. सुरुंग लागलाय त्याला.
बघुन ये ग! त्याशिवाय निट पिस
बघुन ये ग! त्याशिवाय निट पिस कशी काढता येतिल?
या सुनिधी बघून.
या सुनिधी बघून.
वरील सर्व प्रतिसादातील तार्किक मुद्दे मलाही पटले आहेत. पण तरीही चित्रपट आवडेल असा आहे.
जर मैत्रिणीच जाऊन बघून आल्या आणि त्यांनी येऊन आवडला असे सांगितले तर... हा देखील विचार करा
कारण मुळात पिक्चर लॉजिकवर नाही तर मॅजिकवर चालतो. आणि त्यावरच आवडणे न आवडणे ठरते. चित्रपट ही एक fantasy असते. झिम्मा १ वर देखील अशीच घमासान चर्चा झाली आहे. तरीही लोकांना तो आवडला होता. म्हणूनच झिम्मा २ बघायला लोकं एवढ्या मोठ्या संख्येने थिएटरात जात आहेत. अन्यथा पाठ फिरवली असती.
>>मुळात पिक्चर लॉजिकवर नाही
>>मुळात पिक्चर लॉजिकवर नाही तर मॅजिकवर चालतो
खरयं!!
<<<महिला प्रधान सिनेमा म्हटलं
<<<महिला प्रधान सिनेमा म्हटलं की हलकाफुलका असेल तर 'मेरी सहेली किंवा गृहशोभिका' करून टाकतात, गंभीर असेल तर एकदम 'उंबरठा', सरासरी काढून पिळायचं असेल तर चिमणी पाखरं/अशी असावी सासू/मला आई व्हायचंय.>>>
“माहेरची साडी” राहिलं, तेवढं कुठे फिट्ट बसताय का बघा
मला सिनेमाला जावं लागेल कारण
मला सिनेमाला जावं लागेल कारण ग्रूपवर मीच पहिल्यांदा येणार येणार म्हणुन नाचले होते. शनिवारी असेल तर मात्र नाही कारण पाहुणे येतील घरा.
ते मराठी पोरी गाणं 'नवराई
ते मराठी पोरी गाणं 'नवराई माझी लाडाची' सारखं वाटलं नाही कुणाला?
मी बघितला नाहीये अजून पण
मी बघितला नाहीये अजून पण मैत्रेयीच्या पोस्टींवरून गृहशोभिका-वाईब्ज आल्या. महिला प्रधान सिनेमा म्हटलं की हलकाफुलका असेल तर 'मेरी सहेली किंवा गृहशोभिका' करून टाकतात, गंभीर असेल तर एकदम 'उंबरठा', सरासरी काढून पिळायचं असेल तर चिमणी पाखरं/अशी असावी सासू/मला आई व्हायचंय. >>>
बिनधास्त चान्गला होता.
ठल्याशा ट्रिपला पैसे नाहीत आणि कुणाकडून घेणार नाही हे सागणारी मनाली(शिवानी)लंडनला कुणाच्या पैशाने आली हे कळत नाही. >>>> +१
मी अक्खा सिनेमा बघितलाच नाही बहुतेक ... डुलक्या काढल्या... इतका कंटाळवाणा होता.
आत्मापाम्पलेट पण सुरुवातीला
आत्मापाम्पलेट पण सुरुवातीला छान वाटला. तो मुलगा एकदम तरतरीत आणि रेफेरेंन्सस पण आम्ही शाळेत असतानाच्या काळातले पण नंतर कधीतरी एकदम पकाऊ वाटायला लागला.
ते एक फॉर्मुला काढतात आणि तो
ते एक फॉर्मुला काढतात आणि तो चालतोय म्हंटल्यावर सगळे त्याच वाटेने जातात.
गुलाबी फित लावलेली गिफ्ट्
गुलाबी फित लावलेली गिफ्ट् रॅप्ड ‘व्हिल चेअर‘ सरप्राssssज गिफ्ट देतात तिला >>>>> ई...काहीही..
गृहशोभीका, उंबरठा आणि मला आई व्हायचंय >>>
ते मराठी पोरी गाणं 'नवराई
ते मराठी पोरी गाणं 'नवराई माझी लाडाची' सारखं वाटलं नाही कुणाला? >> होय , अगदी खरंय.
पिच्चर चे तुकडे तोडु तोडू
पिच्चर चे तुकडे तोडु तोडू रील्स बनवुन टाकले आहेत. ते बघि तले तरी काही कळत नाही. माबो लॉयल्टी म्हणून बघत आहे. मध्येच ढोम्याला फॉलो करा म्हणून फेसबुक वर येत आहे. त्याचे मनोगत तोडु तोडू टाकले आहे.
ह्या वेळची ट्रिप कुठेशीक आहे?
परीक्षण निरीक्षण हा शब्द सतत
परीक्षण निरीक्षण हा शब्द सतत वाचून
चुपके चुपके जुना आठवत आहेत.
'गाडी के डिफरेनशियल मे लफडा है '
>>>>>>गुलाबी फित लावलेली
>>>>>>गुलाबी फित लावलेली गिफ्ट् रॅप्ड ‘व्हिल चेअर‘ सरप्राssssज गिफ्ट देतात तिला
हे वाचूनच सिनेमा पहायची इच्छा मेली.
जावंच लागणार … पोरींनी लगालगा
जावंच लागणार … पोरींनी लगालगा तिकिटं काढली सर्वांची.
एकंदरीत असे वाटतेय की ज्याला
आधीच का नाईलाजाचा सूर...
एकंदरीत असे वाटतेय की ज्याला झिम्मा आवडेल तो काही आता इथे ते कबूल करणे अवघड
जसे मी वर माझ्या याच लेखाची फेसबूक लिंक दिली होती तिथे सारे चांगलेच बोलत आहेत. कोणी आवडला नाही असा सूर लावायची हिंमत करत नाहीये
असं काही नाही. तुम्ही
असं काही नाही. तुम्ही आवडल्याचे लिहून पण वर काही पोस्ट्स न आवडल्याच्या आल्याच, तसे उलटेही होईलच.
माझी गोष्ट वेगळीच आहे. मला
माझी गोष्ट वेगळीच आहे. मला शाहरूख आवडतो आणि मी त्याचे कौतुक करतो म्हणून इथे काही लोकांना शाहरूख आवडेनासा झालाय. हे खरे मानले तर मी झिम्माचे कौतुक केले म्हणून लोकांना आवडेनासा झाला असण्याची शक्यता आहे
जोक्स द अपार्ट,
मुद्दा असा आहे की एक ठराविक सूर लागला की कोणी वेगळे मत मांडेपर्यंत राहतो हे आपण इतर धाग्यावर देखील बघतोच. मग कोणीतरी ते मांडले की बाकीचे पुढे येतात. मला वाटलेले मीच इथे वेगळ्या मताचा आहे असे म्हणत...
हेच मी वर सांगत आहे. एका ग्रूपवर सारे आवडले म्हणणारे प्रतिसाद येतं आहेत तर एकीकडे नावडला.. एकच चित्रपट एकीकडे सर्वानाच आवडेल आणि तोच दुसरीकडे सर्वाँना नावडेल हे शक्य नाही. म्हणजेच दोन्हीकडे बहुमताच्या भिन्न मत असणारे लिहिते झाले नाहीत.
पण या दोन्ही अनुभवावरून मला एक समजले की हा चित्रपट चांगला आहे पण तुमची आवड काय आहे हे मॅटर करते.
तुम्हाला झिम्मा १ आवडला असेल तरच हा बघायला जा. जर तोच आवडला नसेल तर ओटीटी वर यायची वाट बघा..
झिम्मा १ आवडला म्हणून हा बघायला गेलो आणि हा अगदीच सुमार निघाला असे कोणी इथे आहे का?
कोणी आवडला नाही असा सूर
कोणी आवडला नाही असा सूर लावायची हिंमत करत नाहीये>>>
माझी गोष्ट वेगळीच आहे. मला शाहरूख आवडतो आणि मी त्याचे कौतुक करतो म्हणून इथे काही लोकांना शाहरूख आवडेनासा झालाय. हे खरे मानले तर मी झिम्माचे कौतुक केले म्हणून लोकांना आवडेनासा झाला असण्याची शक्यता आहे>>>>>
तुम्हाला असे वाटत नाही का की तुम्ही स्वतःच स्वतःला वाजवीपेक्षा खूप जास्त महत्त्व देत आहात.
ह्यालाच आत्मकेंद्री पणा म्हणतात ना??
Self obsession kinva
Self obsession kinva आत्मप्रौढी??
हो, मी तसा आहे
हो, मी तसा आहे
मला आवडते स्वतःबद्दल बोलायला आणि स्वतःवर प्रेम करायला. स्वतःला अंडरएस्टीमेट करून जगणे मला जमत नाही. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा मला स्वतःचे कौतुक करायला आवडते. माझी स्पर्धा स्वतःशीच असते. निसर्गाने प्रत्येकात एक गुण दिला असतो जो जगात कोणाकडे नसतो यावर माझा ठाम विश्वास आहे. निदान माझ्याकडे तरी असा एखादा गुण आहे असे मला वाटते. म्हणून मी रोज सकाळी उठल्यावर आरश्या समोर उभा राहून एकदा I am the Best असे बोलतो आणि मगच दात घासतो
आता झिम्मा वर बोलूया
Self appreciation and self
Self appreciation and self obsession madhye फरक असतो.
जग स्वतः भोवती फिरतय अस वाटून बोलणे- वागणे म्हणजे आत्मकेंद्रित पणा!
शहाण्यास अधिक बोलणे न लगे!
असं काही नाही. तुम्ही
असं काही नाही. तुम्ही आवडल्याचे लिहून पण वर काही पोस्ट्स न आवडल्याच्या आल्याच, तसे उलटेही होईलच. >> अगदी!
आधीच्या पोस्ट जशा आहेत तसे सायलोत लिहायचे कॉन्फर्मेशन बायस प्रकार फेबुवर होईल.
इथे माबोवर जे काय असेल ते खुलेआम लिहिते की जन्ता. फारतर तुला आवडला की समस्त माबोवर न आवडण्याचं प्रेशर येतं. पण तरी पठाण भारी होता आणि आवडलेला तर आवडला असंच लोकांनी म्हटलेलं आणि 'जवान' डब्बा म्हणजे अगदी टाकाऊ प्रकार आहे तर लोक डब्बाच म्हणतात.
मला विचारशील तर झिम्मा आवडला न्हवता. पण झिम्मा-२ थेटर मध्ये पुढच्या आठवड्यात जाऊन नावडायची शाश्वती असली तरी नक्की बघणार आहे.
झिम्मा १ आवडला म्हणून हा
झिम्मा १ आवडला म्हणून हा बघायला गेलो आणि हा अगदीच सुमार निघाला असे कोणी इथे आहे का?
Zimma2 lacks a lot of detailing, editing is poor, choppy watto. Ani ugich odhun tanun kela aahe. Too much dependency on Nirmiti Savant to create humor too.
Zimma1 had newness, Zimma2 was an overkill
आधीच का नाईलाजाचा सूर >> थोडा
आधीच का नाईलाजाचा सूर >> थोडा आहे खरं.
खरंतर झिम्मा१ पण फार आवडला होता असा नाही. काही सीन आवडले होते. तसे यातही आवडतील अशी आशा करुन, मैत्रिणींबरोबर पाहिल्याची मजा घ्यायला व मराठी सिनेमाला, त्यातुन बायाबाया असलेल्या सिनेमाबद्दल नाही म्हटलं तरी सॉफ्ट कॉर्नर आहे त्यामुळे जाईन. बोरिंग ढोमेपत्नी सोडुन इतर बाया पाहीन. रडारड सुरु झाली की झोप काढीन.
सुरु झाली की झोप काढीन>>>
सुरु झाली की झोप काढीन>>> :हाहा
रडारड नाहीये.
रडारड नाहीये.
ती जवान मध्ये होती.
काय सुंदर कथा आहे। ढोमेने ३
काय सुंदर कथा आहे। ढोमेने ३ रा काय चौथा , पाचवा पण काढावा अगदी सिरीजच।
अजनबी
अजनबी
+786
तिसरा भाग नक्की येणार..
मी सुद्धा तेव्हा थिएटरला नक्की जाणार
Pages