Submitted by रघू87 on 1 November, 2023 - 07:31
जमलच तर....
जमलच तर.....
द्या पोटासाठी दोनवेळची, भाकर..
म्हणजे तुमच्यापाठून जिंदाबाद मुर्दाबाद
करत मूर्खासारख फिरता येईल
जमलच तर.....
द्या चार भिंती, हक्काच्या
म्हणजे मान खाली घालून जगणारी
नवी पिढी जन्माला घालता येईल
जमलच तर.....
द्या दिशाभूल करणार, शिछण
जे बुद्धीला चालना देणार नाही
कुठलाच नवा प्रश्न विचारण्याची
जमलच तर.....
द्या एक अशी आरोग्यव्यवस्था
ज्यात असेल एक खाट शेवटी
जिथे मरण थोड सुसह्य होईल
आणि शेवटी जमलच तर....
द्या एक अस् स्वप्न
जे ठेवेल कायमस्वरूपी आम्हाला
एका कधी न पूर्ण होणार्या स्वप्नात
अखंड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा