Submitted by द्वैत on 28 October, 2023 - 11:50
संध्येचा विझतो तारा
एकाकी दूर नभात
अन ओल्या कातरवेळी
हातातून सुटती हात
स्वप्नांचा चंचल पक्षी
घरट्याशी परतून येतो
क्षितिजाचा रंग गुलाबी
मग धूसर धूसर होतो
मोडून घरे वाळूची
माघारी फिरती लाटा
या कुठवर नेतील आता
थकलेल्या पाऊलवाटा
मी मिटून माझे डोळे
ओंजळीत धरतो पाणी
स्वर कंपीत अंधाराचा
मज ऐकू येई कानी
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्नांचा चंचल पक्षी
स्वप्नांचा चंचल पक्षी
घरट्याशी परतून येतो
क्षितिजाचा रंग गुलाबी
मग धूसर धूसर होतो >>>
वाह ! ग्रेसजींची आठवण झाली.
सुंदर
सुंदर
वा!
वा!
नेहमीप्रमाणे एक सुंदर
नेहमीप्रमाणे एक सुंदर शब्दरचना..!