अजून किती बळी जाणार?

Submitted by केअशु on 23 October, 2023 - 02:59

आज हे वृत्त वाचले.

https://www.livemint.com/companies/people/parag-desai-wagh-bakris-ed-pas...

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यांच्यामुळे लोकांचा जीव जातो किंवा लोक जखमी होतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पुरेशा क्षमतेने काम होत नाही. दरवेळी पेटावाले किंवा प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलत राहतात. मुक्या प्राण्यांना समजून घ्या. भटकी कुत्री का पिसाळतात , रात्रीबेरात्री का भुंकतात हे समजून घ्या वगैरे टेपा लावतात. अगदी न्यायालयापर्यंत लढत राहतात भटक्या कुत्र्यांसाठी. माणसांमधे बलात्कारी , मनोरुग्ण , सणकी अशा स्वभावाचे लोक असू शकतात मग भटक्या कुत्र्यांनी असं वागलं तर त्यांना ठार का मारता? वगैरे विचारणा प्राणीमित्र करतात.भटकी कुत्री रात्रीबेरात्री भुंकतात त्याचा त्रास होत असेल तर सणासुदीला मोठमोठ्यानं डॉल्बी लावले जातात ते कसे चालतात अशीही विचारणा होते.
भटक्या कुत्र्यांची पैदास शून्यावर आणण्यात खरा अडथळा हे प्राणीमित्रच आहेत. एखाद्यादिवशी या प्राणीमित्रांचाच बळी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानं गेल्याशिवाय यांना त्या विषयाचे गांभीर्य समजणार नाहीये.
प्राणीमित्रांच्या या अतिरेकी प्राणीप्रेमाला पायबंद घालू शकेल असा एखादा नियम , कायदा भारतात का असू नये?

Group content visibility: 
Use group defaults

माझा नाहक उल्लेख कश्याला आता...>> एकाखाली एक आलेले प्रतिसाद म्हणून हो नैतर तुम्हाला फाट्यावर मारण्यात जास्त आनंद मिळतो, काळजी करू नका
Happy

माझा प्रतिसाद बिलकुल चूक नाही. >>> सर तुम्ही आजवर कधी चुकीचे बोललाय का की आता बोलाल
उद्या तुम्ही म्हणालात की मधूच्या आत्याबाईना मिशा असतात तर आम्ही तेही मान्य करू

एकाखाली एक आलेले प्रतिसाद म्हणून हो नैतर तुम्हाला फाट्यावर मारण्यात जास्त आनंद मिळतो, काळजी करू नका
>>>>>>

तसे असते तर शाहरूख उल्लेख टाळता आला असता.
आणि आताही फाट्यावर मारणे वगैरे शब्दप्रयोग टाळला असता.
पण तुम्हाला उगाच गरज नसताना मला उकसवून धागा भरकटवायचा आहे हेच यातून सिद्ध होते.
असो, चालू द्या. यातच आनंद मिळत असेल तर मी तुमच्या आनंदाच्या आड येत नाही Happy
हेमाशेहपो !

त्या सरांची स्टाईल ढापु नका सर (शरूखवले)
ते आरशात बघून बोलायची वाक्ये लोकांना बोलतात
स्वतःचे काहीतरी ओरिजिनल ठेवा की

Pages