बिगबॉस हिन्दी : सिझन १७

Submitted by दीपांजली on 15 October, 2023 - 16:33

बिगबॉस हिन्दी सिझन १७ वर गप्पा मारायला हा धागा :
या सिझनची हाइप कमी केली असली तरी बरीच इंट्रेस्टिंग मोठी नावं आहेत ..
सर्वात चर्चित नाव मुनव्वर फारुकी !
मुनव्वर स्टँडप्कॉमेडियन आहे , याच्या एका नावावर हा अख्खा सिझन चालेल असे एक्स्पर्ट क्रिटिक्सचे म्हणणे आहे !
तो लॉक अप सिझन १ चा विनर आहे , जबरदस्तं मास अपिल आहे त्याच्याकडे, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि अर्थात सेन्स ऑफ ह्युमर !
साधासुधा फॅनबेस नसून फॅन आर्मी आहे त्याची, अर्थात हेटर्स पण आहेत कारण हिन्दू देवदेवतांचा रेफरन्स वापरून त्याने केलेले काही स्टँडप्स वादात अडकले होते, युट्युबने डिलिट केले होते , त्याच्यावर केसेस झाल्या होत्या आणि जाहिर माफीही मागावी लागली होती पण टी आर पी खेचण्यात नं १ फॉर शुअर !
युके रायडर ०७हा अजुन एक सोशल मिडिया इन्फ्लुअन्सर पण मोठ्ठा फॅनबेस घेऊन येणार आहे म्हणे, मी त्याच्या विषयी काही वाचले नाही पण स्टॅन सारखा छपरी स्टार आहे असं ऐकलय !
अन्किता लोखंडे तिच्या नवर्‍या सोबत येणार आहे, सर्वात हाय्येस्ट पेड या सिझन मधे , अर्थात बहुतेक हय्येस्ट पेड लोक इमेज कॉन्शस होतात आणि कन्टेन्ट देत नाहीत असं दिसलय !
जिग्ना व्होरा काँट्रोव्हर्शिअल पत्रकार जिच्या आयुष्यावर नेटफ्लिक्स सिरीज ‘स्कुप’ बनली आहे.

या खेरीज ऐश्वर्या शर्मा ,निल भट्ट, जुन्या स्वाभिमान मधली रिंकु धवन असे टि.व्ही कलाकरही आहेत .
बघुया कसा रंगतो हा सिझन, लेट्स गो !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण करमरकर ने ती अफवा आहे असे म्हटले आहे इतक्यातच मुलाखतीत.
हो नील -ऐश्वर्या नवरा बायको आहेत.
बोअर झाला हा सीझन सो फार. पूर्ण बघणे सोडलेच. अधून मधून थोडा वेळ पाहिले तरी काही मजा नाही येत. अपेक्षा जास्त होत्या बरीच माहितीची आणि मोठी नावे बघून.

सिझन वगैरे अजिबात बघत नाहीये. मला न आवडणारी ऐश्वर्या evict झाली म्हणजे ईशाने केलं तिला तो शॉट बघितला. ज्या रिझनच्या आधारे ईशाला पॉवर दिली ती बघता एथीकली ऐश्वर्या जायला नको होती, अनुराग जायला हवा होता आणि bb ला त्यालाच काढायचे होतं हे दिसून येत होतं (अनुराग, ईशा कोण किंवा यातले बरेच जण मला माहितीच नाहीयेत) . ईशाने bb चा पचका केला, तिने सरळ सांगितलं मला हिला काढायचे आहे. बिग बॉस गेम मध्ये नैतिकता पाळतात का, तिने नाही पाळली. ती कटकटी, आगाऊ ऐश्वर्या गेली मला फार बरं वाटलं. अर्थात सगळेच तसे असावेत, मागे एकदा बघण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांची कटकट चालली होती. त्यामुळे जिओवर खूप दिवसांनी हा सीन बघितला.

आता bb ह्याचा बदला घेऊ शकतात.

हा सिझन सुपरफ्लॉप आहे, एकही कॉन्टेस्टन्ट विनर मटेरिअल नाहीये , तरी बघतेय एपिसोड्स फॉर्व्वर्ड करत Happy
ऐश्वर्या तशीही पब्लिक व्होटिंगने झालीच असती एलिमिनेट , तो टास्क अनुराग युके रायडर ला काढायला डिझ॑इन केला होता कारण पब्लिक व्होट्स आधारावर तो कधीच एलिमिनेट होणार नाही.
सर्वात अनॉयिंग मुनावर आणि मनारा आहेत , बिगबॉस सिझन त्यांच्या भोवती फिरतोय पण किती पकाउ किती रिपल्सिव परसनॅलिटीज आहेत , अन्किताही अनॉयिंग !
सिझन लो टी आर पी आहे म्हणून बिबॉने मुनावरचे पर्सनल लाइफ बाहेर आणलेय, अनेक मुलींना फसवल्याचे पुरावे घेऊन एक व्हिक्टिम/एक्स लव्हर वाइल्डकार्ड म्हणून घरात आणली जी आधी रिव्ह्४न्ज मोड मधे आली आणि दुसर्‍य्॑अच दिवशी पासून रिव्हेन्ज विसरून मुनावरच्या मागेमागे फिरु लागली.
मला त्यातल्या त्यात इशा समर्थ आवडातायेत, १९ व्या वर्षी इशाचा कॉन्फिडन्स आणि ठाम मतं कमाल आहेत !
समर्थ कॉमेडी करतो, मुन्नाच्या गेमला डिकोड करतोय ते पहायला मज्जा येतेय !
अनुराग आवडला होता जेंव्हा सलमानला टशन देत होता पण बाकी काही गेम नाही त्याच्याकडे !

ईशाने बिग बॉसचा पचका केला ते मात्र आवडलं मला. पुर्ण गेम उलटवला. आतमधे नील आणि रिंकूला वाटतंय आता ऐश्वर्या महान होईल पब्लिकमधे. बहुसंख्य लोकांना तिचा डिसिजन आवडला. ईशा पहील्या तिघांत येत नाही मात्र, कलर्स हिंदीची असेल तर पाचात ठेवतील. एवढा सीन बघण्यासाठीच मी जिओवर गेलेले. परत बिग बॉसच्या वाटेला गेले नाही.

माझे पहिले पाच- मुनावर, अंकिता, अभिषेक, ईशा आणि मनारा अभिषेक च्या जागी विक्की असू शकेल
आवडत एकही नाही.

हा सिझन बोरिंग झालाय तरीपण सालाबादप्रमाणे घेतला वसा टाकणार नाही या उक्तीप्रमाणे स्पीड वाढवून रोज बघणे सुरू ठेवले आहे.
एकही जण अपील होत नाहीये. मनारा, ऐश्वर्या आणि अंकिता खूपच अनॉयिंग.
विक्की आधी आवडायचा पब बिबॉने त्याची हवाच काढून टाकली.
बिबॉचे मधेमधे बोलणे सुरवातीला चांगले वाटत होते पण आता नको वाटतयं. सगळा गेम खराब करुन ठेवतात नको तिथे पचकून.
सलमान तर आपण काय बोलतोय याबद्दल विचार तरी करतो कि फक्त स्क्रिप्ट वाचतो काय माहित? एकदा एकाची बाजू तर पुढील वेळी त्याच्या
विरुद्ध. स्पर्धकपण कन्फ्युज होतील कसे वागायचे ते. सगळ्यांचा सगळा गेम फोडला तर ते आतमध्ये काय करणार? भांडणांशिवाय काही ऑप्शन आहे का त्यांच्याकडे टीव्हीवर दिसण्यासाठी. नंतर मग ये सिर्फ झगडे का खेल नही है वैगरे तत्वज्ञाव पाजाळणार.

हाहाहा.

त्यांना अंकिता किंवा मुन्नावरला जिंकवायचं आहे.

कोणी पाहिला नाही का हा season ?...मी नाही पाहिला पण शेवटचे 4 ,5 episodes पाहिले....मुनव्वरला जिंकवायला नको होते...अंकिता व्यक्ति म्हणुन आवडली...

Pages