हतबल ती

Submitted by दत्तात्रय साळुंके on 8 October, 2023 - 23:12

हतबल ती
गोंदण गोंदवणारी ती युवती
जर्मनीतून इस्राएली आली होती
कलाकारच ती जोपासले हुनर तीने
भरायाची रंग चित्रात निगुतीने

कुठे कुणाची प्रीत चितारत
रंगवले त्यातले हळवेपण
कुठे रंगले वीरांचे रणकंदन
तर कुठे प्रेषीतांचे दयाळूपण
कुठे रानपाखंरांचे कुजन
कुठे वृक्षवेलींचे वर्षा वन

असीच सारी शरीरे लेपत
मनात आनंद गोदंणं गोंदत
सुंदर माणसांचे, सुंदर विश्व
तिला जगाया होते खुणावत

संगीत सोहळा अनुभवायला
आली होती ती इस्राएलला
अनभिज्ञ ती मरणा बद्दल
तसे ते नसते ठाऊक कुणाला

क्रौर्याची परी परीसीमा झाली
मरणालाही तिच्या लाज आली
पालथे नग्न कलेवर वाहनात
त्यावर होती उद्दाम, उन्मत्त लाथ

ना सरला भोग तिचा मरणोपरांत
मानवतेची नग्न धिंड भर रस्त्यात
काय असेल तिच्या डोळ्यात मरताना
भीती, विवशता की माणूसपणाची घृणा

निरपराधांवर संगीनी रोखत
होते ते अल्लाहू अकबर कोकलत
विकृतच ही ईशभक्ती, त्या परीस
दयाळू नास्तिकपण बरं सांप्रत

देव, देश, धर्माचा दमणासाठी वापर
अशा माणसां पुढं देवच लाचार
भेटलाच जर देव तिला मरणोत्तर
म्हणेल उगा भजलं तुला हयातभर

अरे सजा द्यायचीच होती मला तर
ते हातही निवडले कसले‌ टुकार
त्यांचीही असेल कुणी माता, भगिनी
भ्याडच ते, माताही मादीच त्यांना, ते नर

© दत्तात्रय साळुंके
८-१०-२३

( X वरच्या त्या व्हिडिओने खूप विव्हळ केलं. मनातली खदखद वर आली. माणसं इतकी विकृत होत चालली देव, देश, धर्माच्या नावानं सगळीकडं विषवल्ली जोपासली. जे माणसांच्या कल्याणासाठी असावं तेच जीवघेणं ठरतंय. पण कुठेतरी असंही वाटतं सगळा वाद संपत्तीसाठी, वर्चस्वासाठी अगदी पुरातन काळापासून. याच वादातून कुटूंबच्या कुटूंब उध्वस्त होतात. सख्खे भाऊ पक्के वैरी....घरातून लागन झालेली विषवेल तिचा मांडव विश्व व्यापतोय. माणसाला माणूस सोडून कुठलं दुसरं नाव द्यावं हे शोधतोय. सुचवा काही तरी.)

त्या विवश जर्मन भगिनीला श्रध्दांजली....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users